शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

बदललेल्या वातावरणामुळे हिवाळा लांबणीवर पडण्याचे संकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2017 20:17 IST

पावसाळा संपून हिंवाळा सुरू झाला असल्यामुळे लोकांना प्रतीक्षा आहे ती थंडीची. परंतु अद्याप वा-याची दिशा ही नैऋत्य - इशान्य अशीच असल्यामुळे गोव्याला परतीचा पाऊसही मिळाला नाही आणि उत्तरेहून सुटणारा गार वाराही मिळाला नाही. 

पणजी - पावसाळा संपून हिंवाळा सुरू झाला असल्यामुळे लोकांना प्रतीक्षा आहे ती थंडीची. परंतु अद्याप वा-याची दिशा ही नैऋत्य - इशान्य अशीच असल्यामुळे गोव्याला परतीचा पाऊसही मिळाला नाही आणि उत्तरेहून सुटणारा गार वाराही मिळाला नाही. एकूणच ऋतुचक्रातच आमुलाग्र बदल व्हावा अशी परिस्थिती असून, वेळेवर मान्सुनचे आगमन, वेळेवर मान्सूनचे परतणे आणि वेळेवर देशातून हटणे या गोष्टी तर अलिकडील ८ वर्षांत झालेल्या नाहीत. वेळ चुकणे आणि तोही एक दोन दिवसांनी नव्हे तर तब्बल २० ते २५ दिवसांचा फरक पडतो आहे. विशेष करून परतीच्या मान्सूनच्या बाबतीत हा विलंब अधिकच होत असल्याचा हवामान खात्याचा निष्कर्श आहे. पावसाच्या उशिरा आगमनामुळे परतणे उशिरा होते. उशिरा परतल्यामुळे गोव्यात उशिरा पोहोचतो आणि  संपूर्ण हटणेही उशिरा होते.  १ जूनला होणारे पावसाचे आगमन ८ जून नंतर होत आहे आणि १ सप्टेंबरला राजस्थानहून परतणारा पाऊस आता १५ सप्टेंबरनंतर परतीचा प्रवास सुरू करतो. गोव्यातही उशिरा पोहोचतो आणि देशातून पूर्णपणे हटण्यासाठीही विलंब लागतो. त्यामुळे आॅक्टोबर महिना संपायला आला तरी हिंवाळा लागल्याच्या खाणाखुणाही दिसत नाहीत. हे सर्व  मान्सून पुढे सरकल्यामुळे होत असल्याचा हवामान खात्याचा निष्कर्श आहे.

परतीचा पाऊस महाराष्ट्रातच महाराष्ट्रात दाखल झालेला परतीचा पाऊस अद्याप गोव्यात पोहोचला नसल्याचे हवामान खात्याचे म्हणणे आहे.  १५ आॅक्टोबर रोजी परतीचा पाऊस महाराष्ट्रातील विदर्भ आणि उत्तर व पश्चीम भागात पोहोचला होता. तसेच १६ ते २० आॅक्टोबरपर्यंत तो आणखी दक्षीणेला सरकून पूर्वेला तेलंगणा व इतर भागापर्यंत पोहोचला होता. गोव्यात पोहोचण्यासाठी आणखी दोन ते तीन दिवस लागतील अशी अपेक्षा आहे. मात्र या बाबत हवामान खाते काहीच अंदाज वर्तवित नाही. हवामान खात्याकडून केवळ परतीच्या पावसाच्या सामान्य तारखा आणि प्रत्यक्ष परतीचा पाऊस दाखल झालेल्या तारखा दिल्या जात. गोव्यात सामान्य तारीख आहे १ आॅक्टोबर.

टॅग्स :goaगोवाIndiaभारतNatureनिसर्ग