शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

कलेच्या वृद्धीसाठी जे करता येतील ते प्रयत्न करणार: मंत्री सुभाष शिरोडकर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2023 10:45 IST

गिरीजाताई केळेकर संगीत संमेलनाला प्रतिसाद.

लोकमत न्यूज नेटवर्क फोंडा : सरकार दरबारी कलेच्या वृद्धीसाठी जे काही करता येईल, ते आम्ही करत आलो आहोत. यापुढेसुद्धा करत राहू, असे उद्‌गार जलस्रोत खात्याचे मंत्री सुभाष शिरोडकर यांनी काढले.

फर्मागुडी येथे पत्रकार संघाने आयोजित केलेल्या ३५व्या स्वरसम्राज्ञी गिरीजाताई केळेकर संगीत संमेलनात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जयंत मिरींगकार, संजय घाटे, गो.रा. ढवळीकर, नारायण नावती, नरेंद्र तारी व्यासपीठावर उपस्थित होते. आजच्या युवा गायकांनी संगीत संमेलनातून स्फूर्ती घ्यावी. अशाच संमेलनांमधून अनेक कलाकार घडलेले आहेत. भविष्यातही असे कलाकार घडत राहतील. गोव्याची समृद्ध संगीत परंपरा आमच्या गायकांनी अशीच पुढे न्यावी, असेही शिरोडकर म्हणाले. वैष्णवी शिरोडकर यांनी गायलेल्या स्वागत गीताने संमेलनाची सुरुवात करण्यात आली. स्वरांजली या स्मरणनिकेचे यावेळी प्रकाशन करण्यात आले.

गोमंतकाच्या भूमीत प्रत्येकामध्ये संगीत कला भिनलेली

मंत्री शिरोडकर पुढे म्हणाले, गोमंतकाच्या भूमीत प्रत्येकामध्ये संगीत कला भिनलेली आहे. इथल्या कलाकाराने संगीत शिकले व संगीताचे संगोपनसुद्धा केले आहे. गोव्याचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्याचे काम आमच्या दिग्गज संगीतकारांनी केले आहे. कोणतेही संमेलन होत असताना त्या गौरवशाली नावाचा उल्लेख हा व्हायलाच हवा. जेणेकरून नव्या पिढीला प्रेरणा मिळत जाईल. काही लोकांना संगीत शिकायची आंतरिक इच्छा असते; पण परिस्थिती पुढे त्यांना शिक्षण घेता येत नाही; परंतु, आज आम्ही साधन सुविधा निर्माण केल्या आहेत. ज्या कुणाला संगीताची आवड आहे त्यांनी संगीत शिक्षण शिकण्याची संधी सोडू नये, असेही ते म्हणाले.

संगीत योगदान पुरस्कार रामकृष्ण सूर्लकर यांना

संमेलनाच्या निमित्ताने प्रत्येक वर्षी तीन पुरस्कार देण्यात येतात. या वेळेचा कलाप्रेमी पुरस्कार देवेंद्र वालावलीकर यांना तर संगीत योगदान पुरस्कार रामकृष्ण सूर्लकर यांना तर पं. जितेंद्र अभिषेकी पुरस्कार यांना देण्यात आला. ज्येष्ठ पत्रकार अभय जोशी, सारेगमप लिटल चॅम्प स्टार ऋषिकेश ढवळीकर यांनाही यावेळी गौरविण्यात आले. पुरस्कारविजेत्यांचे अभिनंदन केले. तसेच त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. 

टॅग्स :goaगोवा