शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

गणेश बेन्झो प्लास्टमधील नाफ्ता जहाजातून देशाबाहेर नेणार: मुख्यमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2019 21:08 IST

मुरगाव बंदरात दाखल झालेल्या एमटी ग्लोबल पिक या जहाजात मंगळवारी (दि.३१) भरण्यात आलेला असून, सदर नाफ्ता लवकरच देशाबाहेर नेण्यात येणार आहे.

वास्को: दक्षिण गोव्यातील सडा येथील गणेश बेंन्झो प्लास्टच्या टाकीत भरण्यात आलेला २३०० मेट्रीक टन नाफ्ता भूमिगत वाहिनीतून मुरगाव बंदरात दाखल झालेल्या एमटी ग्लोबल पिक या जहाजात मंगळवारी (दि.३१) भरण्यात आलेला असून, सदर नाफ्ता लवकरच देशाबाहेर नेण्यात येणार आहे. गोमंतकीयांची सुरक्षा व गोमंतकीयांच्या हितास गोवा सरकार प्रथम प्राधान्य देत असून भविष्यातही गोव्याच्या विकासासाठी सरकार पावले उचलणार असल्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी ‘ट्विटर’वर संदेश घालून नमूद केले.काही महिन्यांपूर्वी दोनापावला समुद्रात भरकटून गेलेल्या नू शी नलिनी जहाज पुन्हा मुरगाव बंदरात आणल्यानंतर यात असलेला सुमारे २३०० मेट्रिक टन नाफ्ता सडा येथील गणेश बेंन्झो प्लास्टच्या टाकीत भरण्यात आला होता. गणेश बेन्झो प्लास्टच्या टाक्या सडा येथील लोकवस्तीच्या भागात असून नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने नगरविकासमंत्री तथा मुरगावचे आमदार मिलिंद नाईक यांच्यासहीत याभागातील बहुतेक नागरिकांनी गणेश बेन्झो प्लास्टच्या टाकीत नाफ्ता भरण्यास काही दिवसांपूर्वी विरोध दर्शविला होता. विरोध झाला असला तरी नू शी नलिनी जहाजातील नाफ्ता अखेर गणेश बेंन्झो प्लास्टच्या टाकीत भरण्यात आला होता. विरोध असताना नाफ्ता गणेश बेन्झो प्लास्टमध्ये भरण्यात आल्याने याबाबत विरोध करण्यात येत असल्याचे दिसून आले.दरम्यान मंगळवारी (दि.३१) सकाळी गणेश बेन्झो प्लास्टच्या टाकीतील नाफ्ता मुरगाव बंदरात दाखल झालेल्या एमटी ग्लोबल पिक जहाजात भरण्याच्या कामाला सुरुवात झाली असून, संध्याकाळपर्यंत सदर नाफ्ता त्या जहाजात भरण्यात आल्याचे सूत्रांनी कळविले. याच विषयावर गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी ट्विट करून गणेश बेन्झो प्लास्ट टाकीतील नाफ्ता देशाबाहेर नेण्याच्या कामाला सुरुवात झाल्याबाबत आनंद व्यक्त केला. एमटी ग्लोबल पिक या जहाजात सदर नाफ्ता भरून तो देशाबाहेर नेण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री सावंत यांनी ट्विटद्वारे दिलेल्या संदेशात नमूद केले आहे. गोवेकरांची सुरक्षा व गोवेकरांचे हित हे गोवा सरकारचे प्रथम प्राधान्य असल्याचे मुख्यमंत्री सावंत यांनी आपल्या संदेशात पुढे म्हटले आहे. सदर नाफ्ता बहारीन येथे समुद्र मार्गाने नेण्यात येणार असून, मंगळवारी रात्री हे जहाज मुरगाव बंदरातून जाण्यासाठी निघणार, अशी माहिती सूत्रांनी दिली.