शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

माघार नाहीच, फुटिरांना धडा शिकवणारच : ढवळीकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2019 22:35 IST

शिरोडा विधानसभा पोटनिवडणूक लढवण्यावर ढवळीकर ठाम

पणजी : विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या रिंगणातून आम्ही माघार घेणार नाहीच. कारण आमचा लढा हा फुटिरांविरुद्ध आहे. यापुढील काळात कुणाच आमदाराने अचानक आमदारकी सोडून मतदारांचा विश्वासघात करू नये म्हणून आम्ही रिंगणात उतरत आहोत. आपण शिरोडा मतदारसंघातून माघार घेऊ, अशी स्वप्ने कुठल्याच राजकीय पक्षाने पाहू नये, अशा शब्दांत मगोपचे अध्यक्ष दिपक ढवळीकर यांनी शनिवारी आपली भूमिका अधिक स्पष्ट केली.मगो पक्ष हा भाजपप्रणीत सत्ताधारी आघाडीचा भाग आहे. आमचे मगोपशी चांगले संबंध असून आम्ही ढवळीकर यांच्याशी चर्चा करू व त्यांना शिरोडातील पोटनिवडणुकीतून माघार घेण्यास सांगू असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर शनिवारी म्हणाले होते. त्याविषयी बोलताना माजी मंत्री ढवळीकर म्हणाले, की मगो पक्ष कुठल्याच पक्षाबरोबर आता बोलणी करणार नाही. कारण शिरोडा मतदारसंघात आम्ही पोटनिवडणूक लढविण्यावर शिक्कामोर्तब केले आहे. शिरोडा व मांद्रे या दोन्ही मतदारसंघांमध्ये फुटीरांचा पराभव होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.स्वाभिमानी मतदारांनी फुटीरांविरुद्ध लढाई सुरू केली आहे. आम्ही मतदारांसोबत आहोत. पाच वर्षे पूर्ण करण्यापूर्वीच आमदारकीचा राजीनामा देऊन पक्ष बदलणाऱ्यांना धडा शिकवायला हवा. मांद्रे व शिरोडामध्ये एकदा फुटिरांचा पराभव झाला की, मग कुणीच आमदार मतदारांचा कधी विश्वासघात करणार नाही. आमचा सरकारच्या स्थिरतेशी संबंधच येत नाही. आम्ही बोलणी वगैरे करायला येणार अशा स्वप्नात कुणी राहू नये. शिरोडा मतदारसंघातून मी पोटनिवडणूक लढवीन यावर मगो पक्षाने शिक्कामोर्तब केले आहे, असे ढवळीकरांनी सांगितले. शिवसेना व मगोमध्ये फरक : विनय दरम्यान, भाजपचे प्रदेशाध्यक्ष तेंडुलकर म्हणाले की मगो पक्ष आणि महाराष्ट्रातील शिवसेना यांच्यात फरक आहे. मगो पक्ष कधीच चौकीदार चोर है असे म्हणत नाही. शिवसेना मात्र म्हणते. शिवसेना पंतप्रधान मोदी यांना दोष देते. मोदींविरुद्ध सेना बोलते. मगो पक्ष तसे बोलत नाही व मोदींना दोषही देत नाही. मगो पक्ष भाजपसोबतच राहील असा आम्हाला विश्वास आहे. आपण एकदा ढवळीकर यांना फोन केला होता पण त्यावेळी ते गोव्याबाहेर होते. मी तुम्हाला फोन करेन, असे ढवळीकर म्हणाले होते. त्यांच्या फोनची मी वाट पाहत आहे. 

टॅग्स :goaगोवाBJPभाजपाPoliticsराजकारण