शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

दुर्बल घटकांना पक्की घरे देऊ: मुख्यमंत्री; लवकरच योजना अंमलात आणणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2025 07:25 IST

कार्यशाळेप्रसंगी ग्रामीण विकासमंत्री गोविंद गावडे, आमदार प्रेमेंद्र शेट, आमदार आंतोन वास, सचिव आणि अधिकारी या प्रसंगी उपस्थित होते.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : ओबीसी, एससी, एसटी आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लोकांना पक्की घरे देऊ. त्यासाठी लवकरच राज्य सरकार योजना जाहीर करणार आहे, असे स्पष्ट करून मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले की, गोवा हे पहिले राज्य आहे की जेथे केंद्रीय योजनांची शंभर टक्के अंमलबजावणी झालेली आहे.

पणजीतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये काल प्रधानमंत्री आवास योजना-प्रादेशिक ग्रामीण कार्यशाळेचे उद्घाटन केंद्रीय ग्रामीण विकास आणि दळणवळण राज्यमंत्री पेम्मासानी चंद्रशेखर यांच्या हस्ते झाले. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. कार्यशाळेप्रसंगी ग्रामीण विकासमंत्री गोविंद गावडे, आमदार प्रेमेंद्र शेट, आमदार आंतोन वास, सचिव आणि अधिकारी या प्रसंगी उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले की, अटल आसरा, प्रधानमंत्री आवास योजनांसह राज्य सरकार ओबीसी, एसटी तसेच आर्थिकदृष्ट्या कमकुवत घटकांना अतिरिक्त दीड लाख रुपयांपर्यंत अर्थसाहाय्य देत आहे. शिवाय दोन टक्के अल्प व्याजाने कर्जही दिले जाते. घर दुरुस्तीसाठीही अर्थसाहाय्य दिले जाते.  मुख्यमंत्री म्हणाले की, पर्यावरण-संवेदनशील गृहनिर्माण योजना सादर करणारे गोवा हे देशातील पहिले राज्य बनण्यास सज्ज आहे. कुटुंबांना सन्मान, सुरक्षा आणि संधी देत आहोत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या १३ फ्लॅगशिप योजनांपैकी ८० टक्के योजनांची गोव्यात प्रभावीपणे अंमलबजावणी झाली आहे. हर घर शौचालय, हर घर नल, हर गाव सडक, वीज, सांडपाणी व्यवस्था या योजनांची शंभर टक्के अंमलबजावणी झालेली आहे. अंत्योदय, सर्वोदय, ग्राम या तत्त्वावर सरकार काम करत आहे. तसेच स्वयंपूर्ण गोवा उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सरकारचे प्रयत्न आहेत.

शाश्वत विकासात गोवा अग्रस्थानी

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, दरडोई उत्पन्न, उच्च जीडीपी आणि शंभर टक्के साक्षरता या निकषांवर राज्याने सर्वांना मागे टाकले आहे व त्याबद्दल सरकारला नेहमीच अभिमान वाटतो. जेव्हा तुम्ही गोव्यात येता तेव्हा तुम्हाला राज्याबद्दल माहिती असणे आवश्यक आहे. गोवा केवळ सन, सॅण्ड अॅण्ड सी अर्थात सूर्य, वाळू आणि समुद्रासाठी ओळखले जातो. आता आम्ही अध्यात्माच्या रूपात त्यात आणखी एक 'एस' जोडला आहे. राज्यात आध्यात्मिक पर्यटनाला आम्ही चालना देत आहोत. गोवा आकाराने देशातील अन्य राज्यांमधील एखाद्या जिल्ह्याएवढा असला तरी येथे सर्वाधिक दरडोई उत्पन्न व शंभर टक्के साक्षरता आहे. शाश्वत विकासात गोवा हे एक अग्रणी राज्य आहे. 

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंत