शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

गोवेकरांच्या हितासाठी लढत राहणार; आरजीचा निर्धार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2023 13:34 IST

अस्तित्व सभेत गोमंतकीयांना सहकार्याचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्क, म्हापसा : सत्तेवर असलेले सरकार लोकांना न्याय देण्यास, त्यांचे प्रश्न हाताळण्यास, त्यांना प्राथमिक सुविधा देण्यास अपयशी ठरले असल्याने गोवेकरांचे हित राखण्यासाठी स्थापन झालेला रेव्होल्यूशनरी गोवन्स पक्ष भविष्यातही गोवेकरांच्या हितासाठी अस्तित्वासाठी लढत राहणार, असा निर्धार आरजीच्या नेत्यांनी मंगळवारी केला.

आरजीने येथील टॅक्सी स्थानकावर आयोजित केलेल्या अस्तित्व सभेत सरकारवर टीका करण्यात आली. आमदार वीरेश बोरकर, मनोज परब व इतर पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. गोवेकर गोव्यात पोरका झाला आहे. आपली वोट बँक तयार करण्यासाठी काही राजकारण्यांनी बाहेरील लोकांना गोव्यात आणले आहेत. त्यातून गावातून झोपडपट्ट्या उभारल्या जात आहेत. झोपडपट्ट्यांना सुरक्षा दिली जाते. त्या जमीनदोस्त होण्याची गरज आहे. गोवेकरांच्या युवा पिढीच्या आपले हक्क मिळण्याची गरज असल्याचे आमदार विरेश बोरकर यांनी सांगितले. 

सरकारला गोवेकरांच्या हिताचे काहीच पडलेले नाही. ते केवळ स्वतःचा स्वार्थ पाहत आहेत. म्हादई वाचवण्यास सरकारला अपयश आले आहे. राज्यातील वाढत्या बेरोजगारीवरील विचार करण्याची वेळ आली आहे. 'पोगो' कायद्यासाठी आजही आरजीकडून प्रयत्न केला जात असल्याचे बोरकर म्हणाले. म्हापशातील फुल मार्केटमध्ये आरजीच्या वतीने फुलराणी ही गोमंतकीय महिला फुल विक्रेत्यांची संघटनेची स्थापना करण्यात आली.

ज्येष्ठ विक्रेत्याच्या हस्ते त्याचे उ‌द्घाटन करण्यात आले. गावागावांतील स्थानिक विक्रेत्यांना एकत्रित आणण्यात येणार आहे. त्यांची नोंदणी करून त्यांना सहकार्य तसेच आधार दिला जाईल. विक्रेत्यांना त्रास दिला तर संघटना त्यांच्या मागे राहील, असे मनोज परब यांनी यावेळी सांगितले. गोव्याचे भविष्य फक्त आरजीवर अवलंबून आहे. लोकांना आता हा एकमेव पर्याय राहिला आहे. त्यामुळे लोकांनी आरजीकडे आपले भविष्य म्हणून पाहावे, असे आवाहन आरजीच्या इतर कार्यकर्त्यांनी या सभेतून केले.

बाजारपेठेतील फुल विक्रेत्यांनाही एकत्र आणण्यात येईल. राज्याबाहेरील विक्रेत्यांनी बाजारावर कब्जा केला आहे. त्यामुळे स्थानिक विक्रेत्यांचे हित जोपासण्यासाठी ही संघटना स्थापन केल्याचे परब यांनी सांगितले. राज्याबाहेरील विक्रेत्यामुळे स्थानिक विक्रेत्यांवर परिणाम होतो. स्थानिकांच्या हक्कासाठी विधानसभेतही आवाज उठवणार असल्याचे आमदार बोरकर यांनी सांगितले. भविष्यात राज्या बाहेरील विक्रेत्यांमुळे स्थानिकांवर होणारा परिणाम सहन केला जाणार नसल्याचा इशाराही बोरकर यांनी दिला. यावेळी विक्रेत्यांनी आपल्या समस्या सांगितल्या व त्या सोडवण्यासाठी प्रयत्ल करण्याची मागणी केली.

 

टॅग्स :goaगोवा