शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
5
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
6
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
7
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
8
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
9
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
10
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
11
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
12
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
13
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
14
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
15
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
16
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
17
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
18
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
19
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
20
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

२०२७ ची विधानसभा निवडणूक अपक्ष म्हणूनच लढवणार: उत्पल पर्रीकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2026 07:55 IST

माझ्या वडिलांचा वारसा पाहता काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवू शकत नाही. भाजपने उमेदवारी दिली असती तर माझा विजय निश्चित होता, असे उत्पल पर्रीकर म्हणाले.

लोकमत न्यूज नेटवर्क,  पणजी : २०२७ ची विधानसभा निवडणूक आपण अपक्ष म्हणून लढवणार असल्याचे उत्पल पर्रीकर यांनी जाहीर केले आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. माझ्या वडिलांचा वारसा पाहता मी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवू शकत नाही. जर भाजपने मला २०२२ मध्ये उमेदवारी दिली असती तर माझा विजय निश्चित होता, असेही ते म्हणाले.

या मुलाखतीत उत्पल पर्रीकर यांनी नगरनियोजन खात्याच्या 'कलम ३९ ए'ला जोरदार विरोध केला. ते म्हणाले की, या कलमामुळे राज्यातील गावागावातील लोकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. झोन बदलांमुळे लोकांच्या जमिनी आणि पर्यावरणावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे कोणताही निर्णय घेताना गावकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेणे आणि त्यांना निर्णय प्रक्रियेत सामील करून घेणे आवश्यक आहे, असे उत्पल पर्रीकर यांनी सांगितले.

उत्पल यांनी कॅसिनो व्यवसायावर निर्बंध घालण्याची मागणी केली. मांडवी नदीतील कॅसिनोच्या समस्येवर त्यांनी कडक भूमिका घेतली. मांडवीतून कॅसिनो पूर्णपणे हटवले पाहिजेत, अशी मागणी त्यांनी केली. तसेच केवळ घोषणा न करता सरकारने कायदेशीर मार्गाने ठोस पावले उचलून नवीन पर्यटन धोरण लागू करावे. नव्या जुता हाऊसच्या १३ व्या मजल्यावर नियोजित असलेल्या कॅसिनोलाही त्यांनी कडाडून विरोध केला आहे.

बाबूश सरकारवर दबाव आणतात

उत्पल यांनी एका प्रश्नावर पणजीचे आमदार तथा महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात यांच्या कुटुंबावर थेट निशाणा साधला आहे. कुटुंबातील सदस्यांना राजकारणात आणून आणि त्यांचा वापर करून सरकारवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. अशा प्रकारची घराणेशाही लोकशाहीसाठी घातक असल्याचे त्यांनी नमूद केले. 

English
हिंदी सारांश
Web Title : Utpal Parrikar to contest 2027 election independently, opposes casino.

Web Summary : Utpal Parrikar announced he will contest the 2027 election independently. He criticized town planning changes, opposed casinos in the Mandovi River, and accused Babush Monserrate's family of exerting undue influence on the government. He emphasized the need for public involvement in decision-making.
टॅग्स :goaगोवाAssembly Electionविधानसभा निवडणूक २०२६Utpal Parrikarउत्पल पर्रिकरPoliticsराजकारण