शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तराखंडच्या राज्यपालांचा धामींना धक्का ! UCC दुरुस्ती व धर्मांतर विरोधी सुधारणा विधेयक परत पाठविले
2
न्यायाधीशांना ई-मेल पाठवून नागपूर जिल्हा न्यायालयात बॉम्बस्फोट करण्याची धमकी
3
माजी आमदार प्रज्ञा सातव यांचा भाजपमध्ये प्रवेश! काँग्रेसचं काय चुकतंय विचारताच, म्हणाल्या...
4
खळबळजनक दावा! "मुंबईत १० हजार कोटींचं बजेट, प्रत्येक उमेदवाराला शिंदेसेना देणार १० कोटी"
5
‘मला उमेदवारी द्या, अन्यथा माझ्या जीवाचं काही बरंवाईट झाल्यास पक्ष जबाबदार राहील’, भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्त्याची धमकी
6
चांदीची 'पांढरी' लाट! सोन्याला मागे टाकत गाठला २ लाखांचा ऐतिहासिक टप्पा; काय आहेत भाववाढीची कारणे?
7
डोनाल्ड ट्रम्प यांनी अचानक का वापरलं 'भारत मॉडेल'?; मिड टर्म निवडणुकीपूर्वी अमेरिकेत मोफत खैरात
8
'पुढे दरोडा पडलाय, दागिने काढून ठेवा'; पोलिसांच्या वेशातील टोळीचा पर्दाफाश, लोकांना घाबरवून लुटायचे
9
Donald Trump :"टॅरिफ माझा फेव्हरीट, मी 10 महिन्यांत...!" डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
10
"विश्वविख्यात बोलले म्हणजे त्यांचे २९ महापालिकांत पराभव पक्के", भाजपाने संजय राऊतांना डिवचलं
11
Car 360 Degree Camera: कारमध्ये ३६० डिग्री कॅमेरा असणं किती फायद्याचं? नेमकं कसं आणि काय काम करतो?
12
Mumbai: खड्ड्यात दुचाकी आदळून तरुणाचा मृत्यू, पण पोलिसांनी मृतावरच नोंदवला गुन्हा!
13
"आम्ही काही मैत्रिणी नाही आहोत...", लारा दत्तासोबत काम केल्यावर रिंकू राजगुरुची प्रतिक्रिया
14
Supriya Sule: "धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेतले तर...", खासदार सुप्रिया सुळेंचा इशारा!
15
मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा
16
अर्टिगाचे काही खरे नाही...! ७-सीटर 'ग्रॅव्हाईट' लाँच होणार, ६ लाखांत मिळणार हाय-टेक फीचर्स...
17
निष्काळजीपणाचा कळस! 'A' पॉझिटिव्ह ऐवजी 'B+' रक्त अन्...; ७५ वर्षीय रुग्णाच्या जीवाशी खेळ
18
Ola Electric च्या शेअर्समध्ये मोठी घसरण! भाविश अग्रवाल यांनी हिस्सा विकून फेडलं कर्ज; पण गुंतवणूकदारांची चिंता वाढली
19
"हा माझा शेवटचा व्हिडीओ आहे, मला रशियाने बळजबरी युद्धात..."; भारतीय तरुणाचा मृत्यू, आईवडिलांवर आघात
20
तुम्हाला क्युट वाटणारा 'सांताक्लॉज' म्हणजे कोका-कोलाचा बिझनेस मास्टरस्ट्रोक! सत्य वाचून बसेल धक्का
Daily Top 2Weekly Top 5

गोंयकार युवकांना का चढतेय ड्रग्जची 'धुंदी'....

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2025 13:29 IST

अमली पदार्थांची खरेदी-विक्री-वापर या धंद्याने गोव्याच्या पूर्ण किनारपट्टीला इतका घट्ट विळखा घातला आहे की, त्यात आता स्थानिकही ओढले गेले आहेत.

सदगुरू पाटील, संपादक 'लोकमत', गोवा

गोव्यात नवा आंतरराष्ट्रीय विमानतळ निर्माण झाला. केवळ सोळा लाख लोकसंख्येच्या आणि ३७०० चौरस किलोमीटर क्षेत्रफळाच्या चिमुकल्या प्रदेशासाठी दोन विमानतळ का हवेत? असा प्रश्न पूर्वी विचारला जात असे, आता तो मागे पडला. आधुनिक सोयीसुविधांनी युक्त दिमाखदार मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळाने एकूण एक कोटी प्रवासी हाताळले.

जगभरातील पर्यटक या विमानतळावर उतरतात. त्यांच्यासाठी गोवा हे एक शांत, निवांत आणि हिरवे स्वप्न. शांतता अनुभवण्यासाठी पर्यटक गोव्यात येतात आणि त्यांच्या पार्थ्यांमध्ये 'जान' भरण्यासाठी जगाच्या विविध भागांतून अमली पदार्थ गोव्यात येतात. पोलिसांना हे मान्य आहे, छापासत्रे सुरू असतात; पण या धंद्याची पाळेमुळे खोदून काढणे राज्यातील यंत्रणेला शक्य झालेले नाही. गोव्यात ड्रग्ज माफियांकडून हजारो कोर्टीची समांतर अर्थव्यवस्था चालविली जात आहे. 

दक्षिण अमेरिकन राष्ट्रांमधून कोकेनसारखे अमली पदार्थ गोव्यात येतात. थायलंडसह अन्य भागांतूनही गोव्यात ड्रग्ज येऊ लागले आहेत. अलीकडेच गोव्यातील सर्वात मोठा ड्रग्ज साठा पोलिसांच्या क्राईम ब्रँचने पकडला. त्याआधी पोलिसांनी ४३ कोटी रुपयांचे कोकेन दक्षिण गोव्यातून जप्त केले. हा साठा थायलंडहून गोव्यात आणला गेला होता. त्यानंतर लगेच ११ कोटी ६७ लाख रुपयांचे अमली पदार्थ गोव्याच्या किनारी भागात आढळले. ११.६७२ किलोंची हायड्रोपोनिक केनाबीस मिळण्याची गोव्यातील पहिलीच वेळ. अत्यंत श्रीमंत ग्राहकांमध्ये हे विशिष्ट हायड्रोपोनिक केनाबीस ड्रग्ज (मारिजुआनाचे रूप) अधिक लोकप्रिय आहे.

या धंद्याने गोव्याच्या किनारपट्टीला इतका घट्ट विळखा घातला आहे की, त्यात आता स्थानिक देखील ओढले गेले आहेत. पूर्वी पोलिसांच्या छाप्यात ड्रग्जची खरेदी-विक्री करताना केवळ विदेशी नागरिक पकडले जायचे. हिमाचल प्रदेश, काश्मीर, पश्चिम बंगाल, बंगळुरू, कुलू-मनाली येथील नागरिकही या धंद्यात सापडत. आता मात्र स्थानिक तरुणही पकडले जात आहेत. अलीकडे ड्रग्जप्रकरणी जेवढे संशयित किंवा गुन्हेगार पकडले गेले, त्यात ४० टक्के गोमंतकीय आहेत. 

वर्ष २०२३ मध्ये गोव्यात ड्रग्जशी निगडीत गुन्ह्यांमध्ये जेवढ्या व्यक्ती पकडल्या गेल्या, त्यापैकी २८ टक्के गोमंतकीय निघाल्या. वर्ष २०२२ मध्ये हाच आकडा २३ टक्के होता. वर्ष २०२४ मध्ये हे प्रमाण ४० टक्क्यांपर्यंत वाढले. यावर्षी २०२५ मध्ये गेल्या काही महिन्यांत एकूण ६८ कोटींचे अमली पदार्थ पकडले आहेत. यावर्षी ६० व्यक्तींना अटक झाली, त्यातील २८ गोमंतकीय निघाले. सुशिक्षित गोव्यातील वाढती बेरोजगारी, कसिनो जुगाराच्या अड्ड्यांचा झालेला विस्तार, अमर्याद पर्यटनवाढ यामुळे स्थानिक युवक ड्रग्ज विक्रीच्या नेटवर्कचा भाग बनू लागले आहेत. काही स्वयंसेवी संस्थांनीही आता यावर संशोधन, अभ्यास सुरू केला आहे. 

गोव्यातील ड्रग्ज धंद्याची वाढती व्याप्ती दाखविणारे चित्रपट मध्यंतरी येऊन गेले. गोवा विधानसभेनेही यापूर्वी चिंता व्यक्त करून 'आम्हाला उडता गोवा (उडता पंजाबच्या धर्तीवर) नको' अशी अपेक्षा व्यक्त केली होती. वापर व वाहतूक अशा दोन्ही कारणांस्तव गोव्यात अमली पदार्थाचा साठा पोहोचतो. वास्तविक गोव्यात कायदे कडक आहेत. यापूर्वी अनेक नायजेरीयन, इस्रायली नागरिक वगैरे कायमचे तुरुंगात पोहोचले आहेत.

गोव्यात इलेक्ट्रॉनिक डान्स फेस्टिव्हल आयोजित करण्यास दरवर्षी गोमंतकीय विरोध करतात. कारण तिथे ड्रग्जचा वापर होतो असा संशय आहे. दरवर्षी गोव्याच्या विविध भागांत अतिड्रग्जच्या सेवनाने काहीजण मृत्युमुखीही पडतात. वर्ष २०२२ मध्ये हरयानाच्या भाजप नेत्या व अभिनेत्री सोनाली फोगोट यांचा अतिड्रग्जच्या सेवनाने मृत्यू झाल्यानंतर गोव्याची राष्ट्रीय स्तरावरही नाचक्की झाली होती; मात्र गोव्याने अजून धडा घेतलेला नाही. ड्रग्जचा वापर करून पार्ध्या तर सुरूच आहेत.sadguru.patil@lokmat.com 

टॅग्स :goaगोवाDrugsअमली पदार्थCrime Newsगुन्हेगारी