शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात देशीपेक्षा विदेशी पर्यटकांना का पसंती दिली जाते?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2018 13:46 IST

गोव्याला विदेशी नागरिक पर्यटक म्हणून हवे आहेत आणि अधिक खर्च करणा-या देशी पर्यटकांपेक्षा त्यांनाच येथे पसंती का दिली जाते हे प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी अशा काही लोकप्रिय किना-यांना भेट दिलीच पाहिजे.

राजू नायक/हरमल ( उत्तर गोवा) - गोव्याला विदेशी नागरिक पर्यटक म्हणून हवे आहेत आणि अधिक खर्च करणा-या देशी पर्यटकांपेक्षा त्यांनाच येथे पसंती का दिली जाते हे प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी अशा काही लोकप्रिय किना-यांना भेट दिलीच पाहिजे. गोव्यात उत्तर गोव्यातील कळंगूट, कांदोळी समुद्रकिनारे जास्त लोकप्रिय आहेत. कळंगूटला तर हमखास गर्दी असते. गोव्यात येणारा कोणताही पर्यटक कळंगूटला भेट दिल्याशिवाय आपले पर्यटन पूर्ण झाले असे मानत नाही.

मांदे्र, हरमल असे काही किनारे आहेत जे रशीयन, इस्त्रायली पर्यटकांनी आपले माहेरघर बनविले आहे. येथे त्यांच्या वास्तव्यांनी वेगळीच जीवनशैली निर्माण झालेली आहे. या किना-यावर ड्रग्ज मिळतात, रशियन माफिया वाास्तव्य करतो अशी टीका होत असली तरी वेगळ्या जीवनशैलीमुळे या किना-यांवर जोश आणि उत्साहाचे भरतेही आलेले असते. कारण संध्याकाळ पडू लागल्यानंतर विदेशींचे जथेच किना-यावर जमू लागतात. कोणी ड्रम्स आणतो, कोणी गीटार, सीतार आणि पाश्चात्य तालवाद्यांचे सूर उमटू लागतात आणि त्यावर पाय आपोआप थिरकू लागतात.

शेवटी शेकडो लोकांचा मिळून किनारी नाच सुरु होतो. त्यातून क्वचित एक वेगळे संगीत नृत्यही जन्माला येते. स्थानिक सांगतात विदेशी लोक कचरा करत नाहीत. त्यांनी आपल्या जीवनशैलीने या किना-यावर जान आणली आहे. १९७० च्या दशकात येथे हिप्पी येऊ लागले. त्यानंत २००० साली त्यांच्यावर निर्बंध आले. त्यांच्या रेव्ह पार्ट्यांनी किनाºयांना ग्रहणही लागले. परंतु आता स्वच्छंदी विदेशी पर्यटक आत्मशोधासाठी नवी यात्रा सुरु करताना दिसतो. तो स्वत:चा शोध घेताना कधी ध्यानाला बसतो कधी निवांत पडून राहतो तर कधी तलावात तरंगताना रममाण होतो.

येथे बरेचजण निवांतपणाच्या शोधात कायमची त्याठिकाणातीच झाली आहेत. त्यामुळे त्यांची मुले कोकणी बोलतात, स्थानिक शाळांमध्ये जातात. स्थानिकांचा त्यांना उपद्रव होत नाही. कधी-कधी देशी पर्यटक मात्र त्यांना त्रास देतात. त्यांची छायाचित्रे घेतात. लमाणी त्यांना वस्तू विकण्याच्या बहाण्याने सतावतात. स्थानिकांना जरी देशी पर्यटकांकडून पैसे खूप मिळत असले तरी ते खरी पसंती देतात ते अशा विदेशी पर्यटकांनाच. विदेशी पर्यटकांमुळेच हे किनारे ताजे, टवटवीत होतात असा सूर स्थानिक लोकांकडून ऐकायला मिळतो.

 

 

टॅग्स :goaगोवाtourismपर्यटन