शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यातील किनारपट्टीची स्वच्छता कुणी करावी? सरकारी खात्यांमध्ये संभ्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2017 11:11 IST

गोव्याला एकूण 105 किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभला असून या किनारपट्टीवरील स्वच्छतेचे काम नेमके कुणी पार पाडावे? याविषयी सरकारी खात्यांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे.

पणजी : गोव्याला एकूण 105 किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभला असून या किनारपट्टीवरील स्वच्छतेचे काम नेमके कुणी पार पाडावे? याविषयी सरकारी खात्यांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे. गोव्याचा पर्यटन मोसम सध्या ऐनभरात आहे आणि अशावेळी किनारपट्टी स्वच्छतेची जबाबदारी नेमकी कुणाची याचे उत्तर सरकारी खाती शोधत आहेत.

सरकारी खात्यांमध्ये आता संभ्रम निर्माण होण्यासाठी एका मोठ्या वादाची पार्श्वभूमी कारण आहे. दिलीप परुळेकर हे पर्यटन मंत्री असताना गोव्यातील पूर्ण किनारपट्टीची स्वच्छता करण्याचे कंत्रट दोन कंपन्यांना देण्यात आले होते. त्या कंत्राटावर आणि एकूणच निविदा प्रक्रियेवर प्रचंड टीका आणि आरोप झाले. कोट्यवधी रुपयांचे काम नीट करत नसतानादेखील पैसे लाटले गेले अशा प्रकारचेही आरोप झाले. गोवा विधानसभेत प्रकरण गाजले. शेवटी लोकायुक्तांकडे प्रकरण पोहोचले व लोकायुक्तांनी चौकशी करून माजी पर्यटन मंत्री परुळेकर यांच्यावर तसेच पर्यटन खाते व कंत्रटदार कंपन्यांवर ठपका ठेवला.

जेवढे मनुष्यबळ किनारपट्टी स्वच्छतेसाठी वापरले गेल्याचे दाखविले गेले आहे, तेवढे मनुष्यबळ प्रत्यक्षात वापरलेच गेले नाही असाही निष्कर्ष लोकायुक्तांनी काढला होता. स्वच्छतेचे काम व्यवस्थित झाले नसतानादेखील कंत्राटदार कंपनीची बिले पर्यटन खात्याने कशी काय फेडली?असाही प्रश्न लोकायुक्तांनी करून या प्रकरणी पोलिसांच्या भ्रष्टाचारविरोधी विभागाकडे असलेली चौकशीची फाईल नव्याने खुली करावी, अशी सूचना केली होती. सरकारने अजून या सूचनेसंबंधी कोणताही निर्णय घेतलेला नाही. लोकायुक्तांनी गैरव्यवहार दाखवून देऊन देखील अजून चौकशीची फाईल खुली झालेली नाही. सरकारला निर्णय घेण्यासाठी 90 दिवसांचा कालावधी हवा, असे यापूर्वी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी म्हटले आहे. तथापि, सर्वच सरकारी खात्यांनी या एकूण प्रकरणाचा धसका घेतला आहे व किनारपट्टी कंत्राटाची निविदा त्यामुळेच नव्याने काढण्याचे धाडसही पर्यटन खात्याला किंवा गोवा पर्यटन विकास महामंडळाला झालेले नाही.

कंत्रटदार कंपनीकडील कंत्राट रद्द केल्यानंतर सरकारने तात्पुरती व्यवस्था म्हणून दृष्टीलाईफ सेव्हींग या जीवरक्षक संस्थेकडे सोपवली होती. दृष्टी लाईफसेव्हींग ही संस्था गोव्यातील पूर्ण किनारपट्टीला जीवरक्षक पुरविते. तूर्त ही संस्था किनारपट्टी स्वच्छतेचे काम करत आहे पण ही तात्पुरती व्यवस्था असल्याचे सरकारचे म्हणणे आहे. पर्यटन मंत्री बाबू आजगावकर यांनी सांगितले, की गोव्याचे किनारे हे पर्यटन खात्याच्या अखत्यारित येतात, त्यामुळे स्वच्छता करण्याचे काम हे पर्यटन खात्याकडेच असायला हवे. तथापि, निविदा जारी करण्याबाबत विलंब होत आहे ही गोष्ट खरी आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री पर्रीकर यांनी पुढाकार घेऊन अलिकडेच गोवा कचरा व्यवस्थापन महामंडळ स्थापन केले आहे. मुख्यमंत्री स्वत: या महामंडळाचे चेअरमन आहेत. गोव्यातील सगळे कचरा प्रक्रिया प्रकल्प, कचरा व्यवस्थापन आणि कचरा प्रक्रियेशी निगडीत सगळी कामे या महामंडळाच्या अखत्यारित येत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे. तशा प्रकारचा निर्णयही मंत्रिमंडळाने नुकताच घेतला आहे. त्यामुळे किनारपट्टी स्वच्छ ठेवण्याचे काम पर्यटन खाते करणार की कचरा व्यवस्थापन महामंडळ?, असा प्रश्न निर्माण झाला आहे. स्वत: पर्यटन मंत्री आजगावकर यांनाही अजून या प्रश्नाचे उत्तर मिळालेले नाही. गोव्यात सध्या लाखो पर्यटक आलेले असून बहुतांश पर्यटक हे गोव्यातील महत्त्वाच्या किना-यांना भेटी दिल्याशिवाय जात नाही. काही किना-यांवर अजुनही स्वच्छतेचा अभाव आहे.