लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : फाईल मंजूर करण्यासाठी माजी मंत्री पांडुरंग मडकईकर यांच्याकडून २० लाख रुपये उकळणारा तो मंत्री कोण, असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. दरम्यान, या आरोपावरून मंत्र्यांमध्येही उलट-सुलट चर्चा सुरू झाली. तर 'आप', 'आरजी' आदी विरोधी पक्षांनी सरकारचा या खळबळजनक आरोपांवरून समाचार घेतला.
मंगळवारी रात्री भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष यांची भेट घेतल्यानंतर मडकईकर यांनी एका मंत्र्याने किरकोळ कामासाठी २० लाख रुपये घेतल्याचा आरोप केला होता.