शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

गोव्यात सरपंच फेसबुकचा वापर करत असल्याने बीडीओंकडे तक्रार जाते तेव्हा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2017 20:19 IST

सध्याचा काळ हा सोशल मिडियाचा काळ आहे. फेसबुक, वॉट्स अॅपसह अनेक सोशल साईट्सचा वापर करण्याकडे राज्यातील अनेक युवा सरपंचांचा कल आहे. पंचायतीचे विविध निर्णय किंवा सार्वजनिक हिताचा पत्रव्यवहार हा लोकांच्या माहितीसाठी फेसबुकवर अपलोड करण्याची पद्धत विविध पंचायतींच्या तरुण सरपंचांनी अलिकडे अवलंबिली आहे.

पणजी : सध्याचा काळ हा सोशल मिडियाचा काळ आहे. फेसबुक, वॉट्स अॅपसह अनेक सोशल साईट्सचा वापर करण्याकडे राज्यातील अनेक युवा सरपंचांचा कल आहे. पंचायतीचे विविध निर्णय किंवा सार्वजनिक हिताचा पत्रव्यवहार हा लोकांच्या माहितीसाठी फेसबुकवर अपलोड करण्याची पद्धत विविध पंचायतींच्या तरुण सरपंचांनी अलिकडे अवलंबिली आहे. यात काही गैर नाही पण काही पंच सदस्य मात्र सरपंचांविरुद्ध तक्रार करण्यासाठी या फेसबुक पद्धतीला आक्षेप घेऊ लागले आहेत. सासष्टी तालुक्यातील आके- बायश पंचायतीबाबतही नुकताच असा प्रकार घडल्याने राज्यातील अन्य तरुण सरपंचांमध्ये त्याविषयी चर्चा सुरू झाली आहे.

नावेली मतदारसंघातील रावणफोंड येथील पथदिप अनेक वर्षे पेटत नव्हते. काही ठिकाणी वीजदिव्यांची सोयच नव्हती. सरपंच सिद्धेश भगत यांनी सावर्डेचे आमदार दिपक पाऊसकर याना याविषयी साकडे घालून वीजदिव्यांची सोय करून घेतली. वीजदिव्यांची सोय व्हावी म्हणून भगत यांनी पंचायतीतर्फे जो पत्र व्यवहार केला होता, तो त्यांनी फेसबुकवर अपलोड केला. याच पंचायतीच्या दोघा पंचसदस्यांनी पंचायतीच्या बैठकीत याबाबत प्रश्न उपस्थित केला. फेसबुकवर पंचायतीची कागदपत्रे अपलोड केली जाऊ नये अशा प्रकारचा सूर दोघा पंच सदस्यांनी लावला. आपले हे म्हणणो म्हणजेच सरपंचाची कृती गट विकास अधिका-यांनाही (बीडीओ)कारवाईसाठी कळविली जावी, अशी विनंती या पंच सदस्यांनी केली. यामुळे पंचायत सचिवांकडून याविषयी बीडीओंनाही पत्र लिहून कल्पना देण्यात आली. 

मात्र,  सरपंच भगत यांची गटविकास अधिका-यांशी बोलणी झाली आहेत, असे भगत यांचे समर्थक असलेल्या अन्य पंच सदस्यांनी सांगितले. वास्तविक अन्य सरकारी खात्यांप्रमाणोच पंचायतींनीही स्वत:ची वेसबाईट करायला हवी व वेबसाईटवर सार्वजनिक हिताशीनिगडीत कागदपत्रे तसेच पत्रव्यवहार उपलब्ध करायला हवा असे कायद्यानुसार अभिप्रेतच आहे. त्यामुळे फेसबुकवर कुठल्याही सरपंचाने लोककल्याणाशीनिगडीत पंचायतीची कागदपत्रे अपलोड केली म्हणून काही बिघडत नाही. सरकारी वेबसाईटवर तर मंत्रिमंडळाचे निर्णय देखील अलिकडे सरकारकडून अपलोड केले जाऊ लागले आहेत, अशी भूमिका भगत यांचे समर्थन करणा:या काही पंच सदस्यांनी घेतली आहे. केवळ दोघांनीच त्यास आक्षेप घेतला आहे.

टॅग्स :Facebookफेसबुकgoaगोवा