शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
2
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
3
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
4
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
5
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
6
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
7
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
8
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
9
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
10
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
11
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
12
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
13
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
14
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
15
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
16
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
17
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
18
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
19
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं

“जीवन म्हणजे काय, भूक काय असते हे जेव्हा कळले तेव्हा आयुष्याचा मार्ग बदलला”: डॉ. प्रकाश आमटे

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2025 07:30 IST

डॉ. प्रकाश आमटे यांनी मांडला 'हेमलकसा'चा थक्क करणारा प्रवास

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : समाजसेवेचे बाळकडू आम्हाला बाबांकडून मिळाले. मी जेव्हा हेमलकसा येथे गेलो तेव्हा जीवन म्हणजे काय, भूक काय असते याची प्रचिती आल्याचा अनुभव समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे यांनी काल पर्यावरण दिन कार्यक्रमात मांडला. यावेळी त्यांच्यासोबत पत्नी डॉ. मंदाकिनी आमटेही उपस्थिती होत्या.

शाळेत असताना बाबांनी सहलीसाठी आम्हाला आदिवासी भागात नेले होते, तिथे त्यांची परिस्थिती पाहून मन हेलावले आणि तेव्हाच ठरवले की मला या लोकांसाठी काही तरी करायचे आहे. त्यामुळे डॉक्टर झाल्यानंतर मी हेमलकसा येथे जाऊन सेवा करण्याचे ठरवले. लग्नानंतर मला दिलेल्या शब्दापोटी माझी बायको मंदाकिनी देखील माझ्यासोबत आली. अपार कष्ट तिनेही घेतले, म्हणून ही सेवा करणे शक्य झाल्याचे उद्‌गार आमटे यांनी काढले.

तेथील आदिवासी लोकांनी कपडे घातलेली माणसे कधी पहिलीच नव्हती, त्यामुळे आमचे स्वागत तिथे चांगले झाले नाही. पण आम्ही हार नाही मानली. तेथील बिकट स्थिती सुधारण्याचे ठरविले आणि आजही आमचे कार्य सुरू आहे. चौथ्या पिढीने हे काम सुरू ठेवले आहे. त्यामुळे प्रत्येकाने स्वतःच्या गरजा कमी करून दुसऱ्याचे दुःख अनुभवल्यास आयुष्याचे खरे गणित कळेल, असेही डॉ. आमटे म्हणाले.

आमची सून गोव्याची, तीही आदिवासींचीच सेवा करतेय

गोव्याशी आमचे कौटुंबिक नाते आहे. आमची एक सून ही गोव्यातील आहे. के. डी साधले यांची ती मुलगी आहे. ती डॉक्टर असून, आता माझ्या मुलासोबत ती देखील आदिवासी भागात जाऊन सेवा देते. हेमलकसामध्ये जेव्हा आम्ही पोहचलो तेव्हा महिलांना अनेक आरोग्याच्या समस्या होत्या. ही स्थिती सुधारण्यावर आम्ही भर दिला. आता आमची गोव्याची सून स्त्रीरोगतज्ज्ञ असल्याने काम सोपे झाले, असे डॉ. मंदाकिनी आमटे यांनी सांगितले.

अन्नाचे आमिष दिले अन्...

चांगले जीवन जगायचे असेल तर आपल्या गरजा कमी ठेवणे, दुसऱ्यांचे दुःख जाणून घेणे आणि अपेक्षा कमी ठेवणे या गोष्टी केल्या पाहिजेत. जनावरांना प्रेमाने वाढवले तर ते कुठलीच इजा करत नाहीत, हे मी जिवंत आहे यावरूनच समजून घ्या. भुकेपोटी आदिवासी लोक मुक्या प्राण्यांना मारायचे, हे पाहून मी त्यांना सांगितले की तुम्ही जर प्राण्यांना माझ्याकडे आणून दिले तर मी त्यांना अन्न पुरवेन. या अन्नाच्या आमिषाने त्यांनी वाघ, बिबटे, साप, अस्वल यासारखे हिंस्र प्राणी माझ्याकडे आणले. ज्यांचा मी सांभाळ केला, असेही डॉ. आमटे यांनी सांगितले.

आदिवासींकडून खूप काही शिकण्यासारखे आहे. कुठल्याही प्रतिकूल परिस्थितीत ते जीवन जगू शकतात. ते उद्याचा कधीच विचार करत नाहीत, आज आपण कसे जगू याच प्रयत्नात त्यांचा दिवस जातो. महत्त्वाचे म्हणजे त्यांच्याकडे प्रचंड सहनशीलता आहे. आमच्याकडे उपचार करताना पूर्वी एनेसथेसिया नसायचा, तेव्हा आम्ही थेट घाव्यांवर टाके घालायचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांनी कुठलीच दुःखाची भावना दाखवली नाही. एका रुग्णाला तर मी १०० टाके घातले, तरी त्यांनी ते सहन केले. - डॉ. प्रकाश आमटे

टॅग्स :goaगोवाDr Prakash Baba Amteडॉ. प्रकाश बाबा आमटे