शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

गोविंद गावडेंची विधानसभेत काय असणार भूमिका? विरोधी सूर लावणार की, सत्ताधाऱ्यांच्या बाजूने बोलणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2025 14:33 IST

लोकांमध्ये उत्कंठा

लोकमत न्यूज नेटवर्क,पणजी : येत्या विधानसभा अधिवेशनात आमदार गोविंद गावडेंची भूमिका काय असेल, ते विरोधी सूर लावणार की सत्ताधाऱ्यांच्या बाजूने राहणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. विधानसभेचे पावसाळी अधिवेशन २१ जुलैपासून सुरू होत असून, ८ ऑगस्टपर्यंत चालणार आहे. सत्तेत असले तरी आमदार म्हणून गावडे वेगवेगळे प्रश्न उपस्थित करू शकतात. प्रसंगी सरकारविरुद्ध टीकेचा सूरही लावू शकतात. त्यांची नेमकी भूमिका काय राहील, याबाबत लोकांमध्ये व खासकरून कलाकारांमध्ये उत्सुकता आहे.

दरम्यान, २०२७ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने तिकीट नाकारल्यास गोविंद गावडे अपक्ष म्हणून रिंगणात उतरणार हे निश्चित मानले जात आहे. भाजप त्यांना उमेदवारी देण्याची शक्यता नाही. नुकतेच एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सध्या तरी आपण भाजपसोबतच असल्याचे विधान त्यांनी केले आहे. तसेच प्रियोळच नव्हेतर गोव्यातील 'लोक माझ्यासोबत आहेत. मी पैशांच्या बंडलांनी नव्हे, तर लोकांची दुःखे पुसून मनाने, काळजाने लोक जोडलेले आहेत. जनता माझ्या पाठीशी आहे.', असेही ते म्हणाले होते. यावरून पक्षाने तिकीट न दिल्यास अपक्ष म्हणून लढण्यासाठी त्यांनी मनाची तयारी केल्याचे संकेत मिळत आहेत.

कला अकादमीचा विषय ठरणार लक्षवेधी

कला अकादमीच्या नूतनीकरणाच्या बाबतीत झालेले निकृष्ट बांधकाम, तसेच सदोष साऊंड व प्रकाश योजनेचा प्रश्नही विधानसभेत येणार आहे. गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांनी या प्रश्नावर आपण सरकारला घेरणार असल्याचे आधीच जाहीर केले आहे. विरोधी काँग्रेस तसेच आरजी व आपचे आमदारही यावर आवाज उठवणार आहेत. तेव्हा मुख्यमंत्री काय उत्तर देतील व गोविंद यांची काय भूमिका असेल, याबाबत उत्कंठा आहे.

प्रश्न मांडण्यांची संधी

गेली आठ वर्षे गावडे मंत्री होते. आमदार म्हणून त्यांना प्रियोळ मतदारसंघातील समस्यांबाबत सरकारला जाब विचारण्याची संधी प्रथमच मिळणार आहे. गावडे यांचा आक्रमक स्वभाव पाहता मतदारसंघातील अनेक विषय ते प्रश्नोत्तराच्या तासाला, शून्य प्रहराला, लक्षवेधी सूचनेद्वारे उपस्थित करण्याची शक्यता आहे.

भोम महामार्गाबाबतीत गावडेंची भूमिका काय असेल याबाबतही उत्सुकता आहे. २०२७ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने तिकीट नाकारले व अपक्ष म्हणून रिंगणात राहावे लागले, तर भोमवासीयांना दुखवून चालणार नाही, हे त्यांना पक्के ठाऊक आहे.

विरोधी पक्षांनी नोकरीकांड, म्हादई, वाढती बेकारी व महागाई तसेच इतर ज्वलंत प्रश्नांवर सरकारला घेरण्याचा इशारा दिला आहे. अर्थसंकल्पावरील चर्चेच्यावेळी आमदारांना बोलण्याची संधी मिळणार आहे. गावडे यावर काय भूमिका घेतात, हे पाहावे लागेल. 

टॅग्स :goaगोवाPoliticsराजकारणBJPभाजपा