शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५२ महत्त्वाचे मुद्दे
2
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
3
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
4
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
5
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
6
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
7
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय
8
३२ विमानतळ पुन्हा सुरू करण्याची तयारी; भारत-पाकिस्तान संघर्षामुळे विमान उड्डाणे होती बंद
9
पाकच्या ताब्यातील जवानाच्या पत्नीशी संवाद; सुटकेसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन, फोनवर चर्चा
10
संरक्षण दलांना राज्यात सर्वतोपरी मदत: मुख्यमंत्री; तिन्ही दलांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक
11
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सायबर हल्ल्यांचा आकडा १५ लाखांवर; फक्त १५० यशस्वी, सायबर विभागाचा तपास
12
दहावीचा निकाल आज... मित्रांनो, मनासारखे नाही झाले, तरी हार मानू नका 
13
मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला अवकाळीचा तडाखा; पिकांनी टाकल्या माना, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
14
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील जखमी म्हणतात, आजही तेथून जाताना हृदयात चर्रर्र होतं
15
नवीन होर्डिंग धोरण वर्षभरानंतरही कागदावरच! घाटकोपर दुर्घटनेला वर्ष होऊनही महापालिका गप्पच
16
शाहरुख खानच्या ‘त्या’ कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला ६२ लाखांची भरपाई योग्यच; हायकोर्टाचे आदेश
17
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
18
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
19
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
20
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती

स्वागतासाठी हॉटेल्स, नाईट क्लब्समध्ये लगबग

By admin | Updated: September 15, 2014 01:40 IST

पर्यटक मोसम तोंडावर : जलक्रीडावाल्यांचीही लगीनघाई

पणजी : गोव्याचा पर्यटक मोसम येत्या महिन्यापासून सुरू होत असून देशी-विदेशी पाहुण्यांच्या स्वागतासाठी हॉटेल्स, नाईट क्लब्समध्ये आतापासूनच लगबग सुरू झाली आहे. विदेशी पाहुण्यांसाठी जेवणा-खाणाचे नवे मेनू कोणते असावेत इथपासून करमणुकीच्या बाबतीत नावीन्य कसे आणता येईल इथपर्यंत नियोजन चालले आहे. जलक्रीडावाल्यांची परवान्यांच्या नूतनीकरणासाठी धावपळ चालली आहे. पावसाने उसंत घेतल्याने हॉटेलांची रंगरंगोटी चालू आहे. जलक्रीडा तसेच जलसफरी आयोजित करणाऱ्या एकाने सांगितले की, प्रत्येक गिऱ्हाईकाकडून साधारणपणे ४०० रुपये मिळतात. दिवशी साधारणपणे आम्हाला २० ते ३० पर्यटक गिऱ्हाईके मिळतात. हॉटलांमध्ये परिषदा असल्यास एखाद दिवशी शंभरपेक्षा अधिक पर्यटक मिळतात. गोव्यात वेगवेगळ्या किनाऱ्यांवर मिळून ४00 हून अधिक बोटी आहेत ज्या जलसफरी घडवून आणतात याशिवाय पॅराग्लायडिंग किनाऱ्यांवर होते. एलपीके नाईट क्लबचे नंदन कुडचडकर म्हणाले की, या वेळी मेनूमध्ये तसेच करमणूक कार्यक्रमांमध्ये पर्यटकांच्या अभिरुचीनुसार नावीन्य आणण्याचा तसेच जागतिक उपाययोजना करण्याचा निर्धार केला आहे. पाहुण्यांना अधिकाधिक आलिशान व आरामदायी सोयी उपलब्ध व्हाव्यात यासाठी प्रयत्न करणार आहोत. पर्यटक मोसम सुरू झाल्यानंतर बरेच नाईट क्लब करमणूक कार्यक्रम बदलत असतात. आमच्याकडे विदेशी पर्यटकही मोठ्या प्रमाणात खास जेवणासाठी येत असतात. त्यांच्यासाठी म्युझिकची व्यवस्था आम्ही करतो. देशी पाहुण्यांना इडीएम म्युझिक हवे असते. आमच्याकडे एकाहून एक सरस असे संगीत कलाकार आहेत, असे पणजीतील डाउन द रोड नाईट क्लबचे मालक लिंडन फुर्तादो यांनी सांगितले. सिंक नाईट क्लबच्या विपणन विभागाच्या स्नेहा रॉड्रिग्स म्हणाल्या की, या वर्षी मोठ्या संख्येने इराणमधून पर्यटक येणार असे ऐकले आहे. त्यांच्यासाठी कोणता मेनू असावा किंवा स्थानिक खाद्यपदार्थ त्यांच्याकरीता अधिकाधिक प्रिय कसे बनविता येतील, हे पाहिले जाईल. (प्रतिनिधी)