शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

वजन व माप खात्याच्या छाप्यात 2.13 कोटींचे एसी जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2018 15:54 IST

थ्री स्टारची वातानुकूलित यंत्रे फाईव्ह स्टार म्हणून विकणा-या आणि ही यंत्रे आयात केल्याची तारीख लपवून ठेवणा-या वेर्णा येथील लॉईडच्या गोदामावर वजन व माप खात्याने शुक्रवारी धाड घालून 2.13 कोटींचे एसी जप्त केले.

मडगाव : थ्री स्टारची वातानुकूलित यंत्रे फाईव्ह स्टार म्हणून विकणा-या आणि ही यंत्रे आयात केल्याची तारीख लपवून ठेवणा-या वेर्णा येथील लॉईडच्या गोदामावर वजन व माप खात्याने शुक्रवारी धाड घालून 2.13 कोटींचे एसी जप्त केले. हल्लीच्या काळात या खात्याने केलेली ही मोठी जप्ती ठरली आहे.वजन व माप खात्याचे दक्षिण गोव्याचे सहाय्यक नियंत्रक अरुण पंचवाडकर यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे या खात्याने मडगाव येथील नवनीत स्टेशनरीच्या आणखी एका गोदामावर धाड घालून 5 लाखांच्या वह्या व एक्रेलिक रंग पकडले. यातील ब-याच साहित्यावर किंमत लिहिण्यात आली नव्हती, असे त्यांनी सांगितले.सध्या गरमीचा मोसम चालू असताना एसीना मागणी वाढली असताना सरकारच्या नव्या नियमांप्रमाणे पूर्वीचे फाईव्ह स्टार असलेले एसी आता थ्री स्टार करण्यात आले आहेत. याचाच फायदा उठवून जुन्या फाईव्ह स्टारच्या स्टीकरवर नवीन थ्री स्टारचा स्टीकर बसवून ज्यावेळी हे एसी विकले जात होते त्यावेळी थ्री स्टारचा स्टीकर काढून पूर्वीच्या फाईव्ह स्टार स्टीकरसह हे एसी विकले जायचे. यासंबंधात वजन व माप खात्याकडे तक्रारी आल्यानंतर शुक्रवारी ही कारवाई करण्यात आली. या छाप्यात पकडलेल्या एसीवर आयात तारीखही नमूद करण्यात आली नसल्याचे दिसून आले. या कारवाईत अरुण पंचवाडकर यांच्यासह उत्तर गोव्याचे सहाय्यक नियंत्रक प्रसाद शिरोडकर, वजन व माप खात्याचे मडगावचे निरीक्षक विकास खानोलकर, डिचोलीचे निरीक्षक गुलाम गुलबर्ग, सावर्डेचे निरीक्षक सुजन राणो, म्हापसाचे निरीक्षक नितीन पुरुशन तसेच सांगेचे निरीक्षक शुबर्ट फर्नाडिस यांनी भाग घेतला. अशा प्रकारची कारवाई यापुढेही चालू राहील, असे पंचवाडकर यांनी सांगितले.

टॅग्स :goaगोवा