शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

मौनीबाबा आम्हाला नकोत, बोलणारे नगरसेवक हवेत!: उत्पल पर्रीकर  

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2026 09:00 IST

मनपा निवडणुकीत चांगल्या उमेदवारांचा पर्याय देणार

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : पणजीच्या विषयांवर बोलणारे नगरसेवक आम्हाला हवे आहेत, मौन पाळणारे नकोत. त्यामुळे आगामी पणजी महानगरपालिका (मनपा) निवडणुकीत पणजीवासीयांना चांगल्या उमेदवारांचा पर्याय देणार असल्याचे उत्पल पर्रीकर यांनी काल सांगितले. आपण मनपा निवडणुकीबाबत आपण सध्या पणजीतील विविध घटकांतील लोकांशी चर्चा करत आहे. यात काही जुन्या तसेच नव्या कार्यकर्त्यांचा समावेश आहे. मनपा निवडणूक म्हणजे केवळ नगरसेवक निवडणे नाही, तर ती पणजीच्या राजकीय, सामाजिक, आर्थिक तसेच इतर सर्वच घटकांवर परिणाम करणारी आहे.

सध्या मनपाच्या नियमित बैठका होत नाहीत. नगरसेवक पणजीच्या विषयांवर काहीच बोलत नाहीत. ते मौन पाळून गप्प बसतात. आम्हाला बोलणारे नगरसेवक हवेत, गप्प बसणारे नकोत. त्यामुळेच आगामी निवडणुकीत शहराचे तसेच येथील प्रश्नांवर बोलणारे, काम करणारे उमेदवार लोकांना देणार आहोत. त्यासाठी लोकांच्या भेटीगाठी घेत असल्याचेही उत्पल यांनी सांगितले.

फेररचना व आरक्षण जाहीर होताच पत्ते उघड करणार मनपाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने सध्या फक्त मी लोकांशी चर्चा करत आहे. मात्र प्रभाग फेररचना व आरक्षण जाहीर झाल्यानंतरच याबाबतचे पत्ते आपण उघड करू. सध्याचे पणजीचे आमदार कुठलाही प्रश्न विचारल्यास टाळाटाळ करतात.मात्र माझे बाबा मनोहर पर्रीकर हे आमदार असताना तसेच मुख्यमंत्री असताना देखील पणजीच्या लहानसहान विषयांवर लक्ष देत. लोकांना ते भेटत. मात्र आता तसे होत नाही. त्यामुळेच मनपा निवडणूक ही केवळ नगरसेवकांपुरती मर्यादित नसून एकूणच पणजीचा चेहरमोहरा ठरविणारी आहे, असेही उत्पल यांनी सांगितले.

राजधानी पणजीत आही अनेक समस्या आहेत. बेकायदेशीर स्पा, जुन्ता हाऊस इमारतीच्या जागी येणारा प्रकल्प जो पणजीच्या कुठल्याही फायद्याचा नाही, यासह विविध समस्यांकडे लक्ष देणे गरजेचे आहे. मात्र आज या सर्व समस्यांकडे महापौरांसह सर्वजण दुर्लक्ष करीत आहेत. यात बदल होण्याची गरज असल्याचेही पर्रीकर यांनी नमूद केले.

English
हिंदी सारांश
Web Title : Panaji Needs Vocal Councilors, Not Silent Ones: Utpal Parrikar

Web Summary : Utpal Parrikar emphasizes the need for proactive councilors in Panaji, criticizing the current silence on key issues. He plans to offer strong candidates in the upcoming municipal elections who will address Panaji's political, social, and economic challenges, referencing his father's attentive approach.
टॅग्स :goaगोवाUtpal Parrikarउत्पल पर्रिकरPoliticsराजकारण