शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

नाताळनिमित्त गोव्यातील हॉटेल बुकिंग फुल्ल होण्याच्या मार्गावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2017 14:02 IST

पुढील महिन्यात डिसेंबरात ख्रिस्ती बांधवांचा साजरा होणारा नाताळ तसेच त्यानंतर येणाऱ्या नववर्षाच्या पार्श्वभूमीवर गोव्यातील हॉटेल्स बुकिंग फुल्ल होण्याच्या मार्गावर आहेत.

म्हापसा - पुढील महिन्यात डिसेंबरात ख्रिस्ती बांधवांचा साजरा होणारा नाताळ तसेच त्यानंतर येणाऱ्या नववर्षाच्या पार्श्वभूमीवर गोव्यातील हॉटेल्स बुकिंग फुल्ल होण्याच्या मार्गावर आहेत. डिसेंबराच्या १५ तारीखनंतरचे हॉटेल बुकिंग जवळ-जवळ फुल्ल झाले आहे. १५ डिसेंबरपर्यंत ७० टक्क्यांहून जास्त बुकिंग हॉटेलचे करण्यात आलेले आहेत. गोव्यातील पर्यटन हंगामातील डिसेंबर हा सर्वात महत्त्वाचा व व्यस्त महिना मानला जातो. त्यामुळे इतर महिन्यापेक्षा पर्यटकांची सर्वात जास्त वर्दळ या महिन्यातच असते. डिसेंबरात हॉटेलना पर्यटकांकडून होत असलेली प्रचंड मागणी लक्षात घेऊन हॉटेलचे भावही व्यवसायिकांकडून वाढवले जातात. 

डिसेंबर महिना हा ख्रिस्ती बांधवांचा सण साजरा करण्याचा महिना मानला जातो. या महिन्याच्या सुरुवातीला पहिल्या आठवड्यात साजरा होणारे जुने गोंयच्या सायबाच्या फेस्तापासून उत्सवमय वातारवणाची निर्मिती गोव्यात होत असते. त्यामुळे जुने गोव्याच्या फेस्तसाठी आलेले बरेच पर्यटक नवीन वर्षापर्यंत राहणे पसंद करतात. नवीन वर्ष संपले की पुन्हा माघारी निघून जातात. 

नाताळ व नवीन वर्षाच्या तुलनेत उत्सवाच्या महिन्यात महिनाभर वास्तव्य करुन राहणारे पर्यटक बरेच कमी असतात. नाताळाच्या काळात २० डिसेंबर पासून ते नवीन वर्षापर्यंत दर वर्षी लाखोंनी देशी-विदेशी पर्यटक गोव्यात येत असतात. शेवटच्या क्षणी त्रास होऊ नये यासाठी बरेच पर्यटक येण्यापूर्वी हॉटेलची आगाऊ नोंदणी करुन येणे पसंद करतात. ही नोंदणी किमान महिना दिड महिना अगोदर केलेली असते. 

पर्यटकांना आपल्याकडे आकर्षीत करण्यासाठी विविध योजना हॉटेल व्यवसायिकांकडून उत्सवाच्या काळात खास करुन नाताळांच्या दिवसात जाहीर केल्या जातात. त्यात नाताळ ते नवीन वर्षापर्यंत पर्यटकांना दिला जाणाऱ्या पॅकेजचा सुद्धा समावेश असतो. या पॅकेजात नाश्ता जेवणा सोबत संगीत रजनी तसेच इतर मनोरंजनात्मक कार्यक्रमाचा समावेश असतो. दिले जाणारे पॅकेज हॉटेलच्या तारांकनावर अवलंबून असते. काही हॉटेल व्यवसायिकांनी दिलेल्या माहिती नुसार कांदोळी, कळंगुट, बागा, हणजूण, वागातोर सारख्या भागातील हॉटेल फुल्ल होण्याच्या मार्गावर आहेत. 

येणारे पर्यटक शहरी भागातील हॉटेलपेक्षा किनारी भागातील हॉटेलात वास्तव करणे जास्त पसंद करतात. त्यामुळे शहरातील हॉटेलपेक्षा किनाऱ्यातील हॉटेलांना डिसेंबरात जास्त मागणी असते. किनाºयातील हॉटेलना असणारी ही मागणी पाहता शहरी हॉटेलपेक्षा किनारी हॉटेलचे भाव जास्त असतात. या मागणीमुळे इथल्या हॉटेलचे भाव इतर दिवसांच्या तिलनेत किमान ५० टक्क्यापर्यंत वाढवले जातात. इतर दिवसात शहरी हॉटेल व किनारी हॉटेलांचे भाव समान असतात; पण डिसेंबरात किमान २० ते ३० टक्क्यांचा फरक यात असतो. कळंगुट भागातील हॉटेल व्यवसायिक क्लावडियो पाशेको यांनी दिलेल्या माहितीनुसार डिसेंबरपासून राज्यातील पर्यटक व्यवसायाला गती येत असते. त्यामुळे पुढील काही दिवसात ही गती येऊ लागेल. गती आल्यानंतर हॉटेल नोंदणीत वाढ होत जाईल. होत असलेली नोंदणी सर्वात जास्त नाताळच्या दिवसातील असते.   

टॅग्स :goaगोवाhotelहॉटेलTravelप्रवास