शहरं
Join us  
Trending Stories
1
 तालिबानचा पलटवार, अफगाणिस्तान-पाकिस्तान बॉर्डरवर भीषण संघर्ष, अनेक पोस्टवर कब्जा, ५ पाकिस्तानी सैनिकांचा मृत्यू 
2
निवडणुका महायुती की स्वबळावर; निर्णय घेण्याचे अधिकार स्थानिकांना, मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्टीकरण
3
भाजपा, JDUने आपल्या जागा मित्रपक्षांना दिल्या, तरी NDAमधील तिढा सुटेना, नाराज मांझी म्हणाले..      
4
गाझा शांतता करारावर स्वाक्षरी करण्यास हमासचा नकार, ट्रम्प यांच्या प्रस्तावाची उडवली खिल्ली
5
भयानक! आधी प्रेयसीच्या वाढदिवसाचा केक कापला, मग त्याच चाकूने तिचा गळा चिरला
6
जोपर्यंत न्याय नाही, तोपर्यंत अंत्यसंस्कार होणार नाही, IPS पुरन कुमार यांच्या पत्नीची आक्रमक भूमिका
7
ENG W vs SL W : ...अन् श्रीलंकन कॅप्टनवर आली स्ट्रेचरवरुन मैदानाबाहेर जाण्याची वेळ; जाणून घ्या सविस्तर
8
माझ्या राजकीय कारकिर्दीत मी पाहिलेले पहिले हतबल मुख्यमंत्री म्हणजे उद्धव ठाकरे; बावनकुळेंची टीका
9
शेवटच्या चेंडूपर्यंत थरार, नामिबियाने बलाढ्य दक्षिण आफ्रिकेला हरवलं, सामन्यात नेमकं काय घडलं?
10
वयाने लहान तरुणाला घरी बोलावून ठेवायची शारीरिक संबंध, मग केली हत्या, महिलेला अटक
11
Nashik: "...शरीरसंबंध ठेव, अन्यथा तुझे फोटो व्हायरल करीन"; मुंबईत विवाहित मैत्रिणीचे व्हिडीओ काढले, घरी जाऊन केला बलात्कार
12
फ्रान्सच्या राजकारणात मोठी उलथापालथ, सेबॅस्टिन लेकोर्नू एका आठवड्यात दुसऱ्यांदा बनले पंतप्रधान
13
"उद्धवजी, हंबरडा राखून ठेवा, महापालिकेतील पराभवानंतर तुमच्या..."; शेलारांचे ठाकरेंना उत्तर
14
या उद्योगातील ५० हजार नोकऱ्या धोक्यात! हळूच जातील जॉब; हा आहे कंपन्यांचा प्लान
15
"राहुल गांधींची जशी अमेठीमध्ये अवस्था झाली होती, तशीच तेजस्वी यादवांची..."; प्रशांत किशोर यादवांच्या बालेकिल्ल्यातून फुंकणार रणशिंग
16
"पत्नीची हत्या, १३ वर्षांचा कारावास भोगला; बाहेर येताच त्याने..."; आरोपीचे कारनामे कळल्यावर पोलिसही अवाक्
17
सोन्यापासून बनवला सगळ्यात महागडा ड्रेस, तुम्ही बघितला का? वजन १० किलो आणि किंमत...
18
ट्रम्प यांनी चीनवर लादले 100% टॅरिफ; शेअर आणि क्रिप्टो मार्केट कोसळले, $2 ट्रिलियन बुडाले...
19
"मी आरशात बघतो, पण तुम्ही शेतकऱ्यांकडे तरी बघा"; CM फडणवीसांच्या टीकेला उद्धव ठाकरेंचे प्रत्युत्तर
20
नोबेल परत घ्या, मुस्लिम संघटनांनी मारिया कोरिना मचाडो यांच्या विरोधात आंदोलन केले सुरू

छत्रपती शिवाजी महाराजांना आक्रमणकर्ते संबोधल्यानं संतापाची लाट; गोवा पर्यटन खात्याच्या ट्वीटनं खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2021 14:17 IST

वादग्रस्त ट्विट खात्याने घेतले मागे, काँग्रेसकडून भाजपावर जोरदार टीका

ठळक मुद्देभाजपच्या मॉडीफाइड इतिहासाच्या धोरणामुळे पराक्रमी मराठा साम्राज्याचा घोर अपमान - काँग्रेस भाजपा सरकारने भारत देशाचा गौरवशाली इतिहास बाजूला सारण्याचा प्रयत्न केला आहे. छत्रपतींच्या मराठा साम्राज्याच्या करण्यात आलेल्या अपमानाला जबाबदार कोण, याची चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी

पणजी : आग्वाद किल्ल्यासंबंधी गोवापर्यटन खात्याने ट्वीटमध्ये शूर व पराक्रमी मराठ्यांना आक्रमणकर्ते संबोधून छत्रपती शिवाजी महाराजांचा घोर अपमान केल्याने संताप व्यक्त केला जात आहे. हे वादग्रस्त ट्विट खात्याने त्वरित मागे घेऊन सारवासारव केली. विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी या प्रकाराचा तीव्र निषेध करताना भाजपच्या मॉडीफाइड इतिहासाच्या धोरणामुळे पराक्रमी मराठा साम्राज्याचा घोर अपमान झालेला असल्याचं म्हटलं आहे. सरकारने जनतेची व स्वाभिमानी देशभक्तांची जाहीर माफी मागावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांचे गोमंतभूमिसाठी खुप मोठे योगदान असून, स्वाभिमानी गोवेकर ते कदापी विसरु शकत नाही. भाजप सरकारने मराठा साम्राज्याचा अपमान करणे हे दुर्देवी आहे असे दिगंबर कामत यांनी म्हटले आहे. सन २०१२ मध्ये गोव्यात व सन २०१४ मध्ये केंद्रात सत्तेवर आलेल्या भाजपा सरकारने भारत देशाचा गौरवशाली इतिहास बाजूला सारण्याचा प्रयत्न केला आहे. भाजप सरकार केवळ जुमला राजकारणाचा उदो उदो करण्यात व्यस्त आहे. भाजपाने आता तरी  कार्यकर्त्यांना देशाचा खऱ्या इतिहासाचे धडे द्यावेत, असे कामत यांनी म्हटले आहे.

पर्यटन खात्याने आपल्या कर्मचाऱ्यांना शिस्त लावावी व जबाबदारीने वागण्यास शिकवावे. गोमंतकाच्या वैभवशाली इतिहासाचा विपर्यास करण्याऐवजी येथील पर्यटन स्थळे स्वच्छ व सुरक्षित ठेवण्यावर भर द्यावा, अशी मागणीही कामत यांनी केली आहे. छत्रपतींच्या मराठा साम्राज्याच्या करण्यात आलेल्या अपमानाला जबाबदार कोण, याची चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी कामत यांनी केली आहे.

छत्रपतींबद्दल हा द्वेष का?; गोवा फॉरवर्डचा सवाल

गोवा फॉरवर्डचे उपाध्यक्ष दुर्गादास कामत यांनी या ट्वीटबद्दल तीव्र संताप व्यक्त करताना सरकारला छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल  द्वेष का असा प्रश्न केला आहे. ते म्हणाले की, बोडगेश्वर देवस्थान समितीवर या सरकारने गुन्हे दाखल केले. त्यानंतर शिवजयंती दिवशी मिरवणुकीला परवानगी नाकारली आणि आता हे वादग्रस्त ट्विट समोर आले आहे. एवढा द्वेष का? हे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट करायला हवे.

कडक समज देणार : पर्यटनमंत्री

दरम्यान, संतापाची लाट पसरल्यानंतर पर्यटन खात्याने त्वरित ट्वीट मागे घेऊन शुद्धिपत्रक टाकले आहे. चुकीची दुरुस्ती केलेली आहे तसेच ज्याने कोणी हा प्रकार केला त्याने माफी मागून खंतही व्यक्त केली आहे परंतु असे प्रकार पुढे घडू नयेत यासाठी मी कडक शब्दात अधिकाऱ्यांना समज देणार आहे, असे पर्यटनमंत्री या नात्याने उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी स्पष्ट केले.

काय होतं ट्विटमध्ये?

वादग्रस्त ट्विटमध्ये आग्वाद किल्ल्याच्या बाबतीत डच व मराठ्यांना आक्रमणकर्ते असे संबोधण्यात आले होते. हा किल्ला १६१२ साली बांधण्यात आला व किल्ल्याच्या काही भागाचा वापर नंतर मध्यवर्ती कारागृह म्हणून सुरू करण्यात आला.

कशी केली सारवासारव?

वादग्रस्त ट्विट मागे घेताना पर्यटन खात्याने आम्हाला डच यांना आक्रमणकर्ते म्हणायचे होते. मराठ्यांना नव्हे, अशी सारवासारव केली असून त्याबद्दल माफीही मागितली आहे. दरम्यान, शूर मराठ्यांना आक्रमणकर्ते संबोधणे निषेधार्ह असल्याचे पर्यटनमंत्रीही म्हणाले.

टॅग्स :Shivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजtourismपर्यटनgoaगोवा