शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

सोमवारी पाणी पुरवठा पूर्ववत होईल : मुख्यमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2019 16:55 IST

खांडेपार येथे जलवाहिन्या फुटल्यामुळे गेले काही दिवस पणजीसह तिसवाडीतील सर्वच भाग पाण्याच्या समस्येने होरपळत आहेत.

पणजी : येत्या सोमवारी तिसवाडी व अन्य भागांत नळांद्वारे पाणी पुरवठा पूर्ववत होईल, असा विश्वास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी शनिवारी येथे व्यक्त केला.खांडेपार येथे जलवाहिन्या फुटल्यामुळे गेले काही दिवस पणजीसह तिसवाडीतील सर्वच भाग पाण्याच्या समस्येने होरपळत आहेत. टँकरनी दर प्रचंड वाढवला आहे. बांधकाम खात्याकडील टँकर कमी पडत आहेत. फोंडा तालुक्यातीलही अनेक भागांना पिण्याचे पाणी मिळत नाही. या पाश्र्वभूमीवर पणजीत अग्नीशामक दलाच्या एका कार्यक्रमानंतर शनिवारी दुपारी पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांना विचारले असता, मुख्यमंत्री म्हणाले की जलवाहिनी दुरुस्ती करण्याचे काम ब:यापैकी सुरू आहे. लोकांनी चिंता करू नये, नळाद्वारे पाण्याची व्यवस्था सोमवारी सायंकाळपासून होईल. मुख्यमंत्री म्हणाले, की सरकारचे स्थितीवर लक्ष आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या मुख्य प्रधान अभियंत्यांशीही आपण बोललो आहोत व लोकांना जिथे टँकरची व्यवस्था हवी, तिथे टँकर पुरविण्याची सूचना केली आहे. टँकरची व्यवस्था सगळीकडे केली जात आहे. जलवाहिनी दुरुस्तीचे काम रविवारी सायंकाळी किंवा सोमवारी सकाळी पूर्ण होईल आणि मग सोमवारी सायंकाळीच नळांद्वारे पाणी येऊ लागेल.दरम्यान, पणजीत सध्या विक्रेत्यांकडील पिण्याच्या पाण्याच्या बाटल्यांचा साठाही संपुष्टात येऊ लागला आहे. मोठय़ा बाटल्या तर उपलब्धच नाहीत. मोठय़ा संख्येने छोटय़ा बाटल्याही लोक खरेदी करत आहेत. कारण पाणीच उपलब्ध नाही. राजधानी पणजीमधील अनेक कुटूंबांनी शनिवार व रविवारी सुट्टी असल्याने आपले फ्लॅट बंद करून गोव्याबाहेर जाणो पसंत केले आहे. हॉटेलांमध्ये पाणी आहे. त्यामुळे काही लोक हॉटेलच्या खोल्यांचाही वापर करू लागले आहेत. मात्र त्यासाठी लोकांचा बराच पैसाही खर्च होत आहे. सोमवारी सायंकाळी तरी पाणी पोहचेल ना असा प्रश्न लोक विचारत आहेत.

टॅग्स :Waterपाणी