शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
2
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
3
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
4
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
5
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
6
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन
7
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी
8
बापासमोरच दोन वर्षाच्या मुलाला जबड्यात धरून बिबट्या पसार; १५० जवानांकडून शोधमोहिम, मृतदेह सापडला
9
आपली मुलगी राजकारणात येणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले, म्हणाले...
10
लवकरच बाजारात येतेय Toyota ची Mini Fortuner! महाराष्ट्रातल्या 'या' शहरात होणार उत्पादन; किती असू शकते किंमत? जाणून घ्या
11
तंत्रज्ञानाची किमया! सॅमसंगने AI Home केलं लाँच; आता घर होईल स्मार्ट, फक्त एक क्लिक अन्...
12
तांत्रिक बिघाड की मोसादचा हात? संयुक्त राष्ट्रांत पॅलेस्टाईनवर चर्चा होताच ४ बड्या नेत्यांचा माईक बंद  
13
पद्मश्री ज्येष्ठ लेखक एस. एल. भैरप्पा काळाच्या पडद्याआड; पंतप्रधान मोदींसह राष्ट्रपतींनी वाहिली श्रद्धांजली
14
लडाखमधील आंदोलनाला हिंसक वळण, जाळपोळ, लेहमध्ये ४ जणांचा मृत्यू, ७० जण जखमी 
15
हलगर्जीपणाचा कळस! सरकारी रुग्णालयात दुसऱ्याच पायाची सर्जरी, ऑक्सिजन मास्क काढला अन्...
16
"फायनलमध्ये बघून घेऊ’’, दोन वेळा मार खाल्यानंतर शाहीन शाह आफ्रिदीचं भारताला आव्हान    
17
समस्या संपतील, स्वामी कायम सोबत असतील; ९ गुरुवार व्रताने बदल नक्की दिसतील, अशक्य शक्य होईल!
18
जीएसटीमुळे वाहनांच्या किंमतीच नाही, RTO Tax देखील कमी झाला; तिहेरी फायदा कोणालाच कळला नाही...
19
समृद्धी महामार्गावर दुहेरी उत्पन्नाचा स्रोत; सौरऊर्जा निर्मिती करणारा देशातील पहिला 'एक्सप्रेसवे' !
20
Swami Chaitanya Saraswati: 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय?

गोव्याच्या मुख्यमंत्र्यांसह अन्य मंत्र्यांचा भ्रष्टाचार उघड करण्याचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2018 21:07 IST

८८ खाण लीज नूतनीकरणात मोठा घोटाळा झाल्याचा आरोप

ठळक मुद्देया प्रकरणी कोर्टात जाण्याचा पर्यायही काँग्रेसने खुला ठेवला आहे.

पणजी : गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याप्रती असलेली सहानुभूती आता संपल्याचे नमूद करुन येणाऱ्या काळात आक्रमक बनून पर्रीकर यांच्यासह मंत्रिमंडळातील अन्य मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराचा पर्दाफाश करु, असा इशारा काँग्रसने दिला आहे. 

''सर्वप्रथम ८८ खाण लीजच्या नुतनीकरणाचा विषय हाती घेतला जाईल. पोलिस तक्रार करु किंवा कोर्टातही जाऊ. मोर्चा काढून रस्त्यावर उतरु, राज्यपालांवरही दबाव आणू. येत्या ४ तारीखपपर्यंत कृती योजना स्पष्ट करु,'' असे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी सांगितले.

पत्रकार परिषदेत बोलताना चोडणकर म्हणाले की, ‘पर्रीकर हे आजारी असल्याचे आता आम्ही मानतच नाही. कारण भाजपचे नेतेच ते पूर्णपणे तंदुरुस्त आणि सरकार चालविण्यासाठी सशक्त असल्याचे सांगतात. या सरकारचे वेगवेगळे भ्रष्टाचार उघड करण्याची वेळ आता आलेली आहे. खाण लीजच्या नूतनीकरणात मोठा घोटाळा झालेला आहे. लोकायुक्तांसमोर असलेल्या प्रकरणात माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात पर्रीकर यांच्याकडे अंगुली निर्देश केला आहे. पर्रीकर यांनी आधी १५ लिजांचे नूतनीकरण केले आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून पार्सेकर यांनीही नंतर उर्वरित लिजांचे नूतनीकरण केले. केंद्राचा वटहुकूम येण्याच्या आदल्या दिवशी घिसाडघाईने हे नूतनीकरण केले गेले. या प्रकरणी कोर्टात जाण्याचा पर्यायही काँग्रेसने खुला ठेवला आहे. याबाबत चोडणकर म्हणाले की, ''सेझच्या बाबतीतही घोटाळा झालेला आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा येण्याआधीच सरकारने सेझ प्रवर्तकांशी सेटिंग केले. त्यांना २५६ कोटी रुपये परत करण्याची तयारी दर्शविली. २७ जुलै रोजी मंत्रिमंडळ  बैठकीत निर्णय झाला त्यानुसार प्रवर्तकांचे हे पैसे फेडण्यासाठी कर्ज काढण्यास सांगण्याचे ठरले. मात्र आयडीसीचे अध्यक्ष आमदार ग्लेन तिकलो यांच्या म्हणण्यानुसार प्रवर्तकांकडून सरकाच्या तिजोरीत आलेले १३३ कोटी रुपये बँकेत कायम ठेव म्हणून ठेवण्यात आली असून त्याचे व्याज आणि मूळ रक्कम यातूनच हे पेसे फेडले जातील. तसे असेल तर कायम ठेवीच्या पावत्या जनतेसाठी जाहीर करा, असे आव्हान चोडणकर यांनी केले. सरकारी कार्यालयांसाठी महागड्या जागा भाडेपट्टीवर घेतल्या जात आहेत त्यातही मोठा भ्रष्टाचार आहे. भ्रष्टाचाराची ही सर्व प्रकरणे बाहेर काढू, असा इशारा त्यांनी दिला. फॉर्मेलिनच्या प्रश्नावर बोलताना मासळी तपासणी यंत्रणेची पूर्णपणे सज्जता होईपर्यंत आयातीवर बंदी कायम ठेवावी, या मागणीचा चोडणकर यांनी पुनरुच्चार केला ते म्हणाले, ''तामिळनाडू, गुजरातहून आयात केली जाणारी मासळी सुरक्षित असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी आधी पुराव्यानिशी सिध्द करावे. या प्रकरणाची सीबीआय किंवा न्यायालयीन चौकशी व्हावी.'' दरम्यान, राज्यपालांनी काँग्रेसी शिष्टमंडळाला त्यांच्या सत्ता स्थापनेसाठी संधी देण्याच्या मागणीवर चार दिवसात निर्णय देते, असे सांगितले होते. ही मुदत टळून गेल्याने आता पक्षाची काय भूमिका राहील असे विचारले असता लवकरच पक्ष विधिमंडळाची या प्रश्नावर बैठक होणार असल्याचे चोडणकर यांनी सांगितले.

टॅग्स :Manohar Parrikarमनोहर पर्रीकरgoaगोवा