शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

कोंकणीसाठी जागे व्हा; गोव्यातील विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांचे भाजप सरकारला आवाहन

By सूरज.नाईकपवार | Updated: January 18, 2024 11:58 IST

नामवंत कोंकणी कवी मनोहरराय सरदेसाई यांच्या १००व्या जयंतीनिमित्तच्या कार्यक्रमात केलं विधान

सूरज नाईकपवार, लोकमत न्यूज नेटवर्क, मडगाव: कोंकणी उलय, कोंकणी बरय, कोंकणीतल्यांन सरकार चलय हे ब्रीदवाक्य आचरणात आणून, नामवंत कवी मनोहरराय सरदेसाई यांची जन्मशताब्दी साजरी करूया. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि भाजप सरकाराने कोंकणीसाठी जागे व्हावे असे आवाहन विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी नामवंत कोंकणी कवी मनोहरराय सरदेसाई यांच्या१०० व्या जयंतीनिमित्त स्मरण करताना केले आहे.

मनोहरराय सरदेसाई यांचा जन्म १८जानेवारी १९२५ रोजी झाला. कालपासून साहित्य अकादेमी पुरस्कार विजेत्या गोव्यातील महान कवीचे जन्मशताब्दी वर्ष सुरू होत आहे. गोवा सरकारने हे वर्ष राजभाषा कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करून साजरे केले पाहिजे, असे ते म्हणाले.

या महान कवीवर्याचे शताब्दी वर्ष साजरे करण्यासाठी भाजप सरकारकडे काही निधी उपलब्ध असेल अशी मला आशा आहे. वायफळ इव्हेंट आयोजित न करता, आजच्या तरुण पिढीला मनोहरराय सरदेसाईंनी साहित्य क्षेत्रात दिलेल्या अतुलनीय योगदानाची माहिती करुन देणारे कार्यक्रमच आयोजित करावेत असे आवाहन त्यांनी मुख्यमंत्र्यांना केले आहे.आज केवळ इव्हेंट आयोजनाच्या ध्यासाने वेडे झालेल्या भाजप सरकारला महान गोमंतकीयांचा विसर पडला आहे, हे दुर्दैव आहे. गोवा सरकारने आज मनोहरराय सरदेसाईंच्या स्मरणार्थ एक अधिकृत कार्यक्रम आयोजित करायला हवा होता, असे ते म्हणाले.

गोवा सरकारच्या कला आणि संस्कृती खात्याने कला, संस्कृती व साहित्य क्षेत्रात योगदान दिलेल्या सर्व महान गोमंतकीयांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या तारखांसह एक निर्देशिका तयार करावी अशी मागणी त्यांनी केली. मनोहरराय सरदेसाईंच्या गोंयकारानो जायात जागे या कवितेतील प्रत्येक शब्दातून आपण प्रेरणा घेत पूढे येण्याची वेळ आली आहे. भाजप सरकारने आपल्या लोकविरोधी धोरणांनी निसर्गरम्य गोवा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याने गोव्याची अस्मिताच पुन्हा एकदा धोक्यात आली आहे. गोवा वाचविण्यासाठी गोमंतकीयांनी परत एकदा उठून उभे राहणे गरजेचे आहे, असे आलेमाव यांनी म्हटले आहे.

टॅग्स :goaगोवाcongressकाँग्रेसBJPभाजपा