शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात उद्या मतदान,  निवडणूक साहित्य घेऊन कर्मचारी १७२५ मतदान केंद्रांवर रवाना

By किशोर कुबल | Updated: May 6, 2024 14:56 IST

एकूण ११ लाख ७९ हजार ६४४ मतदार मतदानाचा हक्क बजावतील. निवडणूक आयोगाने ८० टक्के मतदानाचे उद्दिष्ट ठेवले आहे.

पणजी : लोकसभा निवडणुकीसाठी दोन जागांवर उद्या मंगळवारी ७ रोजी मतदान होत असून आज सकाळीच निवडणूक कर्मचारी ईव्हीएम तसेच व्हिव्हिपीएटी यंत्रे व इतर साहित्य घेऊन १७२५ मतदान केंद्रावर रवाना झाले आहेत.

उद्या सकाळी ७ ते सायंकाळी ६ यावेळी मतदान होईल. त्यासाठी निवडणूक आयोगाने आवश्यक ती सर्व सज्जता ठेवली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी केंद्रीय सुरक्षा दलाच्या बारा तुकड्या तैनात करण्यात आलेल्या आहेत. एकूण ११ लाख ७९ हजार ६४४ मतदार मतदानाचा हक्क बजावतील. निवडणूक आयोगाने ८० टक्के मतदानाचे उद्दिष्ट ठेवले आहे.

उद्या भरपगारी सुट्टीदरम्यान, निवडणुकीनिमित्त उद्या ७ रोजी सर्व सरकारी, खाजगी कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी जाहीर करणारी अधिसूचना काढण्यात आली आहे. निवडणूक प्रक्रियेचा अभ्यास करण्यासाठी भूतान, मंगोलिया व इस्रायलमधून पथके आली असून आज सकाळी त्यांनी ताळगांव येथे डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमवर ईव्हीएम यंत्रे वितरणाची व्यवस्था पाहिली तसेच उद्या मतदानाच्या दिवशी ही पथके मतदान केंद्रांवर फिरून कशा प्रकारे मतदान चालते, याचा अभ्यास करणार आहेत.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४goa lok sabha election 2024गोवा लोकसभा निवडणूक निकाल २०२४VotingमतदानElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग