शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
3
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
4
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
5
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
6
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
7
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
8
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
9
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
10
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
11
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
12
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
13
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
14
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
16
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
17
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
18
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
19
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
20
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!

विजयची चाल, भाजप अस्वस्थ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2023 11:38 IST

सरदेसाई हे विरोधी आमदार आहेत. ते गोव्यात विरोधी पक्षनेतेही नाहीत. तरीदेखील त्यांना दिल्लीत केंद्रीय नेत्यांच्या अपॉइंटमेंट्स कशा मिळतात, या प्रश्नाचे उत्तर भाजपचे काही बडे पदाधिकारी शोधू लागले आहेत.

- सद्गुरू पाटील

गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष व आमदार विजय सरदेसाई हे कोणत्या वेळी कोणती खेळी खेळतील, याचा नेम नसतो. राजकारण त्यांना बऱ्यापैकी कळते, हे वेगळे सांगायला नको. सरदेसाई यांनी गेल्या काही दिवसांत भाजपमधील काही नेत्यांच्या काळजाचे ठोके चुकविले. गोव्यातील पायाभूत साधनसुविधांशी निगडित प्रश्न घेऊन सरदेसाई यांनी परवाच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. गडकरी यांनी सरदेसाई यांच्यासाठी बराच वेळ दिला. आपल्या मंत्रालयातील काही महत्त्वाच्या अधिकाऱ्यांना बोलावून घेऊन त्यांनी विजयच्या मुद्द्यांवर बैठकच घेतली. दक्षिण गोव्यातील काही प्रकल्पांचा विषय सरदेसाई यांनी मांडला. गोव्यातील महामार्गाशी निगडित काही समस्या सोडविण्याबाबत गडकरी यांनी रस दाखवला. वरिष्ठ अधिकाऱ्यांना काही सूचनाही केल्या.

केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनाही विजय सरदेसाई दिल्लीत भेटून आले. मडगावच्या जिल्हा इस्पितळाचे खासगीकरण नको, तिथे एम्ससारखी संस्था आणावी, ही भूमिका विजयने मांडली आहे. गोवा सरकारमधील अनेक मंत्री व एकूणच भारतीय जनता पक्ष विजयच्या नव्या खेळीमुळे आश्चर्यचकीत झाला आहे. सरदेसाई है। विरोधी आमदार आहेत. ते गोव्यात विरोधी पक्षनेतेही नाहीत. तरी देखील त्यांना दिल्लीत केंद्रीय नेत्यांच्या अपॉइंटमेंट्स कशा मिळतात, या प्रश्नाचे उत्तर भाजपचे काही बडे पदाधिकारी शोधू लागले आहेत. मुख्यमंत्री सावंत यांनादेखील हा प्रकार नेमका काय आहे, ते कळेनासे झाले आहे. आज जर मनोहर पर्रीकर मुख्यमंत्रीपदी असते, तर नितीन गडकरी यांनी पर्रीकर यांना विचारल्याशिवाय सरदेसाई यांना भेटीसाठी वेळच दिली नसती. सरदेसाई सासष्टीतील स्टील्ट ब्रीजसह जे मुद्दे घेऊन गडकरींकडे गेले होते, ते मुद्दे गोवा सरकारदेखील गडकरींकडे मांडू शकला असता. मात्र, सरदेसाई यांच्या दिल्ली भेटीमुळे एक प्रकारे गोवा सरकारमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे अपयशही समोर आले आहे. सरदेसाई यांच्या दिल्ली भेटीचे व केंद्रीय नेत्यांसोबतच्या बैठकांचे फोटो व्हायरल झाले. सरदेसाई यांच्या बैठकांच्या विषयाकडे गोवा भाजप फक्त पाहतच राहिला आहे. हा प्रकार नेमका काय? याविषयी प्रत्येक जण गोंधळून गेला आहे.

एक विरोधी आमदार, जो एरव्ही सावंत सरकारवर सर्व विषयांबाबत टीका करत असतो, स्थानिक भाजप मंत्र्यांवर आरोप करत असतो, तो आमदार दिल्लीत जाऊन भाजपच्याच केंद्रीय मंत्र्यांच्या भेटी घेऊन येतो. बैठका घेऊन येतो. गोव्याचे काही प्रश्न मांडल्याबाबत श्रेयदेखील घेतो. हे सगळे पाहून सावंत मंत्रिमंडळातील काही मंत्रीही चक्रावले आहेत. आम्हाला बायपास करून सरदेसाई आमच्या केंद्रीय मंत्र्यांना भेटून येतात, मग आमचे महत्त्व ते काय उरले? अशी चर्चा भाजपच्या गोव्यातील काही मंत्र्यांमध्ये सुरू झाली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांनादेखील सरदेसाई यांचे सध्याचे कोडे सुटलेले नाही. सरदेसाई हे कदाचित पुढील काही महिन्यांत देखील उर्वरित केंद्रीय मंत्र्यांना भेटून येऊ शकतात. जलशक्ती मंत्र्यांना भेटून ते म्हादई पाणीप्रश्न तिथे मांडू शकतात. विजेच्या समस्येने गोमंतकीय हैराण झालेले आहेत. केंद्रीय वीजमंत्र्यांना भेटून सरदेसाई यापुढे गोव्याचा वीजप्रश्न देखील मांडू शकतात. काहीही घडू शकते. सरदेसाई यांना दिल्लीत भाजपच्या केंद्रीय नेत्यांच्या अपॉइंटमेंट्स घेऊन देण्यासाठी कुणी तरी पडद्याआडून वावरत आहे, असा संशय सरकारमधील काही आमदारांना येऊ लागला आहे. कदाचित मुख्यमंत्र्यांच्या मनात देखील हाच संशय असू शकतो.

सहसा कोणताच विरोधी आमदार स्थानिक मुख्यमंत्र्यांना न भेटता थेट देशातील केंद्रीय मंत्र्यांना भेटून येत नसतो, भेटीसाठी वेळदेखील केंद्रीय मंत्री सहसा देत नसतात. मात्र, सरदेसाई यांनी या स्थितीवर मात करून श्रेयवादाची खेळी तूर्त जिंकली आहे. मनोहर पर्रीकर विरोधी पक्षनेते म्हणून आक्रमक होते, सक्रिय व कार्यक्षम होते, पण तेदेखील केंद्रात काँग्रेसचे सरकार असताना कधीच दिल्लीत केंद्रातील मंत्र्यांना जाऊन भेटत नव्हते. त्यांना भेटीसाठी केंद्रीय मंत्री वेळ देणार होते की नाही, हादेखील मुद्दा आहेच. सरदेसाई यांनी गडकरींसोबत असलेले आपले जुने नाव व परिचय यांचा वापर केला. 

गोव्यात २०१७ साली मध्यरात्रीच्या वेळी भाजपचे सरकार घडले होते, त्यावेळी गडकरी यांनी विजय व सुदिन ढवळीकर यांचे मन जिंकले होते. या दोन्ही नेत्यांना त्यांनी आपलेसे केले होते. ते संबंध आता सरदेसाई यांच्या थोडे कामी आले. दिल्ली भेटीवेळी गडकरी यांनी विजयशी खूप चांगल्या प्रकारे संवाद साधला. गोव्यातील काही मंत्री, आमदारांना याबाबतची माहिती मिळाली आहे.

विजयचा गोवा फॉरवर्ड पक्ष पूर्वी केंद्रातील एनडीएचा भाग होता. जेव्हा बाबू कवळेकर, बाबूश मोन्सेरातसह दहा काँग्रेस आमदार फुटले होते, तेव्हा गृहमंत्री अमित शाह यांनी सरदेसाई यांच्याविषयी सॉफ्ट कॉर्नर दाखवला होता. गोवा फॉरवर्डच्या अन्य दोन्ही मंत्र्यांना डच्चू द्या; पण विजयला मंत्रिमंडळातून वगळू नका, असे अमित शाह यांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना सांगितले होते. 

खासदार विनय तेंडुलकर यांनाही हे ठाऊक आहे. तेंडुलकर यांच्या उपस्थितीतच सगळ्या घडामोडी झाल्या होत्या. मात्र, विजयला मंत्रिमंडळातून वगळावे याच मागणीवर बाबूश मोन्सेरात, नुवेचे बाबाशान, कुंकळीचे क्लाफास डायस वगैरे ठाम होते. त्यामुळे केंद्रीय भाजप नेत्यांनीही शेवटी मागणी मान्य केली व विजयचे मंत्रिपद गेले होते. तरीदेखील बरेच महिने विजयने एनडीएशी फारकत घेतली नव्हती. सरदेसाई एनडीएसोबत राहिले होते. आता नव्याने काही सरदेसाई हे एनडीएचा भाग होणार नाहीत. भाजपमध्ये जाण्याचाही त्यांचा विचार मुळीच नाही.

लोकमतने सरदेसाई यांची सविस्तर मुलाखतही अलीकडेच छापली आहे. विजय जी गेम खेळले आहेत, ती राजकीयदृष्ट्या खूप हुशारीचीच आहे. राष्ट्रपती निवडणुकीवेळी विजयने द्रौपदी मुर्मू यांच्या बाजूने गोव्यात मतदान करावे, असा प्रयत्न भाजपच्या काही केंद्रीय नेत्यांनी केला होता. अर्थात सरदेसाई यांनी तेव्हा मुर्मू यांना मत दिले नाही. 

मात्र, आता लोकसभा निवडणुकीवेळी दक्षिण गोव्यात विजयने काँग्रेसला मदत करू नये, विजयने 'सायलंट राहावे, असा प्रयत्न भाजपचे काही केंद्रीय नेते करू शकतात. शक्यता नाकारता येत नाही. भाजपचे गोव्यातील काही मंत्रीही तसे बोलतात. सरदेसाई यांनी गोव्याच्या मुख्यमंत्र्यांशी संघर्ष चालविला असला, तरी भाजपचे केंद्रातील काही नेते अजून सरदेसाई यांना आपला शत्रू मानत नाहीत. कारण, सरदेसाई हे काँग्रेस पक्षात नाहीत. ते स्वतःचा स्वतंत्र पक्ष घेऊन बसले आहेत. भाजपच्या केंद्रीय नेत्यांना ही स्थिती अशीच राहिलेली हवी आहे.

सहसा कोणताच विरोधी आमदार स्थानिक मुख्यमंत्र्यांना न भेटता थेट केंद्रीय मंत्र्यांना भेटून येत नसतो. दिगंबर कामत हे जरी भाजपमध्ये गेले. तरी सासष्टीतील प्रश्न घेऊन ते देखील केंद्रीय मंत्र्यांना भेटू शकले नाहीत. किंवा त्यांना तशी गरजही वाटली नाही.

मुख्यमंत्र्यांना वाईट वाटेल व त्यामुळे केंद्रीयमंत्र्यांना भेटू नये, असादेखील विचार कामत करू शकतात.फातोड्याचे माजी आमदार दामू नाईक हे देखील विजयच्या नव्या गेममुळे आश्चर्यचकित झालेले असतील, असे राजकीय क्षेत्रात मानले जाते. विजय केंद्रीय आरोग्य मंत्र्यांना भेटणार हे गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनादेखील ठाऊक नव्हते.

 

टॅग्स :goaगोवाPoliticsराजकारणBJPभाजपा