शहरं
Join us  
Trending Stories
1
Achyut Potdar Death: "अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम फेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
2
युद्ध थांबणार...! "खूप आनंद वाटतोय, रशियाच्या राष्ट्राध्यक्षांना फोन केला..."; झेलेन्स्की यांच्या सोबतच्या बैठकीनंतर, काय म्हणाले ट्रम्प? 
3
१००पेक्षा जास्त लोकल रद्द, नाेकरदारांचे मेगा हाल! मुंबई विद्यापीठाने परीक्षा पुढे ढकलल्या!
4
वाचवा म्हणत तरुणीची कारमधून उडी, पाठलाग सुरु असतानाच थारची रिक्षाला धडक, ५ जणांचा मृत्यू
5
आजचे राशीभविष्य, १९ ऑगस्ट २०२५: कुटुंबात वाद संभवतात, नोकरीतील वातावरण चिंताजनक असेल
6
शाळेला निघालेली मुलं पाेलिस ठाण्यात! माटुंगा येथे दोन स्कूल बस अडकल्या गुडघाभर पाण्यात...
7
अतिवृष्टीचा ४ लाख हेक्टरवरील पिकांना फटका; मुंबईसह कोकण, मराठवाड्यात पावसाचे धुमशान
8
मुंबई: वडाळ्यात बेस्ट बसच्या धडकेत टॅक्सीची वाट बघत उभ्या असलेल्या आई, मुलाचा मृत्यू
9
पावसाचा मंडे ‘ब्लॉक’! चाकरमानी स्टेशनावर अडकले, चार तासांत उपनगरात ७५ मि.मी. पाऊस
10
मुदतीत थकबाकी न भरल्यास संरक्षण नाहीच, भाडे न देणाऱ्याची हकालपट्टी निश्चित: सुप्रीम कोर्ट
11
माेफत शिका, तुम्हीही ‘एआय’ एक्स्पर्ट बना; केंद्राच्या स्वयम पोर्टलवर अनेक काेर्सेस उपलब्ध
12
मुंबई, ठाण्याची दैना; आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दाणादाण; आज रेड अलर्ट तर उद्या यलाे अलर्ट!
13
मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात ‘इंडिया’कडून महाभियोगाची तयारी; मतदारयादी त्रुटींबाबत आक्रमक
14
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
15
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
16
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
17
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
18
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
19
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
20
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?

सरकार 'कमिशन' मध्ये व्यस्त; विजय सरदेसाईंचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2024 09:38 IST

राज्यातील भ्रष्टाचाराला दिल्लीचा आशीर्वाद

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : गोव्यातील भाजप सरकार हे लोकशाही मानत नाही. महत्वाच्या विषयांकडे ते दुर्लक्ष करीत असून सरकार केवळ कमिशनमध्ये व्यस्त आहे. भाजप सरकारच्या या भ्रष्टाचाराला दिल्लीचा आशिर्वाद असल्याचा सणसणीत आरोप गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांनी काल पत्रकार परिषदेत केला.

राज्यातील विविध तालुक्यांत आपण जनता दरबार घेऊन जनतेने म्हणणे ऐकले. लोकांनी अनेक समस्या मांडल्या आहेत. या समस्या ऐकून सरकारला जनतेचे काहीच पडलेले नसून ते केवळ 'मनी की बात' करण्यातच व्यस्त असल्याची टीका सरदेसाई यांनी केली. जनता दरबार अंतर्गत गोवा फॉरवर्डपक्षाकडे २ हजार १७५ ई-मेल आले आहेत. यात जनतेने महागाई, विविध सरकारी खात्यांमध्ये कंत्राटी कामगारांचा विषय, त्यांना सेवेत कायम करणे, भ्रष्टाचार, बेरोजगारी, सार्वजनिक तक्रार निवारणातील अपयश, म्हादई, खासगी उद्योगांमध्ये गोमंतकीयांना अपेक्षित रोजगार संधी नसणे, स्मार्ट सिटी, बेकायदेशीर भंगार अड्डे आदी महत्वाचे मुद्दे मांडले आहेत. तालुका स्तरावर वेगवेगळ्या समस्या असल्या तरी लोक या सरकारला कंटाळल्याचे स्पष्ट झाल्याचे सरदेसाई यांनी सांगितले.

जनतेचे हे प्रश्न आपण पावसाळी अधिवेशनात मांडणार आहे. सरकार जर या विषयांची गंभीरपणे दखल घेत नसेल तर ते लोकशाही मानत नाही, हे पुन्हा एकदा स्पष्ट होईल. म्हादईप्रश्नी सरकारने शरणागती पत्करली आहे. कर्नाटकने म्हादईचे पाणी वळवले, गोवा सरकार केवळ केंद्राला याविषयी पत्र लिहिण्यातच व्यस्त असल्याचा आरोप सरदेसाई यांनी केला.

नवा प्रादेशिक आराखडा करा

भू-जमीन रुपांतराचा विषय गाजत आहे. गोव्याचा प्रादेशिक आराखडा २०२१ अस्तित्वात नाही. सरकारने नवा प्रादेशिक आराखडा तयार करावा. पेडणे तालुक्यापासून त्याची सुरुवात करावी. प्रत्येक तालुक्याला तीन महिने द्यावेत. म्हणजे १२ तालुक्यांचा आराखडा तयार करण्यासाठी ३६ महिने लागतील. नवा प्रादेशिक आराखडा तयार करताना काही जमिनींचे अशंतः रुपांतर करावेच लागेल.

'सनबर्न'बाबत केवळ हवाच

सनबर्नचे आयोजन दक्षिण गोव्यात होईल ही केवळ हवा पसरवण्यात आली आहे. कारण आयोजकांनी दक्षिण गोव्यात त्याचे आयोजन होईल, असा कुठेही उल्लेख केलेला नाही. दक्षिण गोव्यात त्याला विरोध होईल हे स्पष्ट आहे. त्यामुळे पेडणेत जीएमआरने सनबर्नच्या आयोजनासाठी जागा दिली व सरकारने त्यास परवानगी दिली तर आश्चर्य वाटायला नको.

२०२७ मध्ये मते नाहीत

लोकभावनेनुसार काम करा, असे केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी भाजप कोअर कमिटीच्या बैठकीत निर्देश दिले आहेत. गडकरी यांनी भाजपला कानपिच्चक्या दिल्या आहेत. तसेच अप्रत्यक्षपणे त्यांनी २०२७ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला लोक मते देणार नाहीत, असेच सांगितले हे सिध्द होते. म्हणजेच काँग्रेसप्रमाणे तुम्हीही वागू नका, असा टोलाही देसाईंनी लगावला.

 

टॅग्स :goaगोवाPoliticsराजकारण