शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यातील मोले अभयारण्यात प्रथमच पट्टेरी वाघाचे दर्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2019 20:38 IST

प्रथमच मोले येथील भगवान महावीर राष्ट्रीय उद्यानात वन खात्याला पट्टेरी वाघाचे दर्शन घडले.

पणजी  - गोव्यात पट्टेरी वाघ नाहीच असे दहा वर्षापूर्वी सांगितले जात होते, पण हा समज खोटा ठरलेला आहे. 2013 साली म्हादई अभयारण्यात प्रथम पट्टेरी वाघाचे दर्शन घडले होते. आता प्रथमच मोले येथील भगवान महावीर राष्ट्रीय उद्यानात वन खात्याला पट्टेरी वाघाचे दर्शन घडले. एकूण 240 चौरस किलोमीटर क्षेत्रफळात वन खात्याचे अधिकारी परेश परोब व त्यांच्या टीमने गेले महिनाभर लक्ष ठेवले होते. खात्याकडे कॅमे-यांची संख्या कमी आहे. त्यामुळे सगळीकडे कॅमेरे लावले नाहीत पण महावीर अभयारण्यात महत्त्वाच्या ठिकाणी कॅमेरे लावून स्थिती न्याहाळली गेली. तसेच सगळा 240 चौरस किलोमीटरचा भाग हा वन खात्याच्या टीमने फिरून पाहिला. कुठे पट्टेरी वाघाच्या पाऊलखुणा दिसतात काय याचा अंदाज घेतला गेला. भगवान महावीर अभयारण्यात एके ठिकाणी कॅमे-यात वाघाचे दर्शन गेल्या 14 रोजी झाले. मात्र खात्याने ते जाहीर केले नव्हते. त्याची वाच्यता अभ्यासाअंती शनिवारी केली गेली. सरकारलाही खात्याने या घटनेची कल्पना दिली आहे. ती मादी असणे शक्य  पूर्ण वाढ झालेला पट्टेरी वाघ कॅमे-यात दिसतो. त्याबाबतचे छायाचित्रही वन खात्याचे अधिकारी परोब यांनी जारी केले आहे. आपल्या टीमने घेतलेल्या कष्टांचे चिज झाले, असे परोब लोकमतशी बोलताना म्हणाले. ती नर की मादी हे स्पष्ट झालेले नसले तरी, अभ्यास सुरू आहे. पण ती मादीच असावी असे खात्यातील काही अधिका-यांना वाटते. भगवान महावीर अभयारण्यातील कॅमे-यात अनेक गवेरेडे, सांबर आदी प्राणी टीपले गेले आहेत. बिबटेही आहेत. 2013 साली प्रथम म्हादई अभयारण्यात पट्टेरी वाघ सापडला होता. मग तीन वाघ कॅमे-यांमध्ये तिथे आढळून आले होते. कर्नाटकमधून हे वाघ गोव्याच्या हद्दीत आले असावेत, असा युक्तिवाद त्यावेळी काहीजणांनी केला होता. म्हादई अभयारण्यात एका वाघाच्या हत्त्येची घटनाही प्रचंड गाजली होती.

टॅग्स :Tigerवाघgoaगोवाforestजंगलforest departmentवनविभाग