शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

"आपत्कालीन व्यवस्थापन कायदा भल्या कामासाठीही वापरा"; सरदेसाईंचा मुख्यमंत्र्यांना खोचक सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2022 13:15 IST

Goa News : विजय सरदेसाई यांनी रुडाल्फ यांच्या मताशी सहमती व्यक्त केली आणि सरकारला शक्य असल्यास सरकार कोणतेही काम तडीस नेऊ शकते असे सांगितले.

पणजी - सरकार काहीही करू शकते हे आतापर्यंत मोपा व इतर प्रकल्पाच्या बाबतीत आढळून आले आहे. आता आपत्कालीन व्यवस्थापन कायदा बोंडवाळ तळ्यालाही लावा असा खोचक सल्ला विजय सरदेसाई यांनी सरकारला दिला. सांताक्रूझचे आमदार रुडाल्फ फर्नांडीस यांनी बोंडवाल तळ्याचा प्रश्न उपस्थित केला होता. ही तळी फुटली तर मोठी पूर आपत्ती येणार आहे. 100 हून अधिक लोक त्यात बळी पडण्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली. त्यामुळे या तळ्याची दुरुस्ती करण्याची मागणी त्यांनी केली. या तळीच्या दुरुस्तीचे काम सुरूच झाले नसल्यामुळे त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

यावर उत्तर देताना जलस्रोत मंत्री सुभाष फळदेसी यांनी हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्यामुळे काम सुरू होऊ शकले नाही असे सांगितले. त्या जागेवर कूळहक्क असलेली हिराबाई कवळेकर हिने दुरुस्ती कामाला न्यायालयात आव्हान दिले. त्यामुळे काम रखडले. खालच्या न्यायालयाच्या आदेशाला खंडपीठात आव्हान दिले. खंडपीठाने खालच्या न्यायालयात पाठविले. खालच्या न्यायालयाने एक विशेष समिती करून सर्वेक्षण केले. सर्वेक्षण अहवाल न्यायालयाला सादर केला आहे. त्यामुळे सरकार तूर्त न्यायालयाच्या आदेशाच्या प्रतिक्षेत आहे. 

त्यावर रुडाल्फ बोलले की सरकारला हवे अस ल्यास सरकार काहीही करू शकते. ज्या पद्धतीने सरकारने मोपा अंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम पुढे नेले त्या पद्धतीने बोंडवाळ तळ्याचे कामही करून टाका अशी मागणी केली. त्यावर मंत्री शिरोडकर हे उभे राहून सरकारला कायदे पाळूनच काम करावे लागते असे रुडाल्फ यांना समजावत होते, परंतु त्यावेळी विजय सरदेसाई यांनी रुडाल्फ यांच्या मताशी सहमती व्यक्त केली आणि सरकारला शक्य असल्यास सरकार कोणतेही काम तडीस नेऊ शकते असे सांगितले. बोंडवाल तळीची दुरुस्ती न केल्यास त्या ठिकाणी पूरदुर्घटना होवू  शकते. त्यामुळे आपत्कालीन व्यवस्थापन कायदा लावून हे काम करून घ्या असे सांगितले. हे सांगतानाच अशा भल्या कामासाठीही आपत्कालीन व्यवस्थापन कायदा लागू करा असा खोचक सल्लाही दिला.

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंत