शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

‘एक्सावेटर’च्या चाकाखाली सापडून ३७ वर्षीय व्यक्तीचा जागीच दुर्दैवी अंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2019 22:33 IST

दुचाकीवरून ‘एसीसी प्लांट’ मधून जात असताना खडी, माती इत्यादी वस्तू उपसणाऱ्या ‘एक्सावेटर’ च्या पुढच्या चाकाखाली सापडून झालेल्या अपघातात त्याचा जागीच दुर्दैवी अंत झाला.

वास्को: दक्षिण गोव्यातील सडा, मुरगाव भागात राहणारा ३७ वर्षीय मृत्युंजय बारीक हा तरुण मंगळवारी (३१) संध्याकाळी दुचाकीवरून ‘एसीसी प्लांट’ मधून जात असताना खडी, माती इत्यादी वस्तू उपसणाऱ्या ‘एक्सावेटर’ च्या पुढच्या चाकाखाली सापडून झालेल्या अपघातात त्याचा जागीच दुर्दैवी अंत झाला. बोगदा, सडा येथे असलेल्या ‘एसीसी प्लांट’ च्या आतील रस्त्यावर सदर अपघात घडला असून ‘एक्सावेटर’ चालक राम गौडा (वय २४) याच्याविरुद्ध याबाबत गुन्हा नोंद करण्यात आल्याची माहीती मुरगाव पोलीस निरीक्षक प्रवीण पोवार यांनी दिली.मुरगाव पोलीस निरीक्षक प्रवीण पोवार यांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी संध्याकाळी ४.४५ च्या सुमारास सदर अपघात घडला. सडा येथे राहणारा मृत्युंजय हा तरुण ‘एक्टीव्हा’ दुचाकीने बोगदा, सडा येथील त्या ‘प्लांट’ च्या आत असलेल्या रस्त्यावरून जात असताना अचानक ‘एक्सावेटर’ च्या पुढच्या चाकाखाली दुचाकीसहीत पडल्यानंतर ‘एक्सावेटर’ चे चाक त्याच्या डोक्यावरून गेल्याने तो जागीच ठार झाला. हा अपघात घडल्याची माहीती पोलीसांना मिळताच त्यांनी त्वरित घटनास्थळावर दाखल होऊन अपघाताचा पंचनामा केला.मृत्युंजयच्या दुचाकीची धडक त्या ‘एक्सावेटर’ ला बसल्यानंतर तो पुढच्या चाकाखाली सापडून मरण पोहोचला असावा असा प्रथम अंदाज पोलीसांनी व्यक्त केला असून या अपघाताचे नेमक्या कारणाचा तपास चालू आहे. अपघात घडलेल्या ठिकाणी असलेली खडी उपसून दुसºया ठिकाणी हलवण्याचे काम करण्यासाठी सदर ‘एक्सावेटर’ येथे आणण्यात आला होता अशी माहीती पोलीसांनी देऊन या वेळीच मृत्यूंजय चा अपघात घडून त्याचा अंत झाल्याचे निरीक्षक पोवार यांनी माहीतीत सांगितले.मंगळवारी संध्याकाळी अपघात होऊन मरण पोचलेला मृत्यूंजय त्याच ‘एसीसी प्लांट’ च्या कंपनीत ‘स्टोर किपर’ म्हणून कामाला असल्याची माहीती निरीक्षक पोवार यांनी पुढे दिली. पोलिसांनी सदर अपघाताचा पंचनामा करून मयत मृत्यूंजय याचा मृतदेह मडगाव येथील हॉस्पिसीयो इस्पितळाच्या शवगृहात पाठवलेला आहे. एक्सावेटर चालक राम गौडा (रा: सडा - मुरगाव) याच्याविरुद्ध पोलिसांनी भादस ३०४ (ए) कलमाखाली गुन्हा नोंद केला असल्याची माहिती निरीक्षक पोवार यांनी दिली. सदर अपघाताचा अधिक तपास चालू आहे.