शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

बेराेजगारी ठरतेय गाेव्याची मुख्य समस्या; नोटाबंदी, मजुरांची पायपीट अजूनही स्मरणात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2022 08:06 IST

गोव्याची राजधानी पणजी शहरातील अनेक व्यापाऱ्यांना ‘भाजप सरकारची गेल्या दहा वर्षांतील कामगिरी’ या विषयावर बोलते केले असता त्यांच्या मनातील नोटाबंदीबाबतचा राग उफाळून आला. या नोटाबंदीमुळे उद्योग-व्यवसायांची कशी वाट लागली याचा पाढाच व्यापाऱ्यांनी वाचला.

राजेश निस्तानेपणजी : नोटाबंदी होऊन आता ६ वर्षे लोटली; परंतु नोटाबंदी करणाऱ्या केंद्रातील भाजप सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील व्यापारी-व्यावसायिकांचा राग अद्याप शमलेला नसल्याचे चित्र गोव्यातही पाहायला मिळत आहे.गोव्याची राजधानी पणजी शहरातील अनेक व्यापाऱ्यांना ‘भाजप सरकारची गेल्या दहा वर्षांतील कामगिरी’ या विषयावर बोलते केले असता त्यांच्या मनातील नोटाबंदीबाबतचा राग उफाळून आला. या नोटाबंदीमुळे उद्योग-व्यवसायांची कशी वाट लागली याचा पाढाच व्यापाऱ्यांनी वाचला. नोटाबंदीने उद्योग, व्यापार, व्यवसाय आधीच जर्जर झालेले असताना त्यात कोरोनाचा मार पडला.कोरोनाकाळात मजुरांना पायी आपले गाव गाठावे लागल्याची आठवण परप्रांतीय व्यावसायिकांनी यावेळी करून दिली. श्रीमंतांना आणण्यासाठी विमाने पाठविणाऱ्या भाजप सरकारला स्थानिक मजुरांसाठी रेल्वे, ट्रक, बसची व्यवस्था करता येऊ नये या दुजाभावाने परप्रांतीयांच्या मनात घर केेलेले दिसले. या आठवणी ताज्या झाल्या की त्याचा फटका गोवा विधानसभा निवडणुकीत भाजपला बसणार असे व्यापारी स्पष्ट बोलत आहेत. एवढेच नव्हे तर मते मागायला येणाऱ्या कार्यकर्त्यांनाही ‘आम्ही अजून नोटाबंदी आणि मजुरांच्या पायी स्थलांतराचे ते दिवस विसरलेलो नाही’ याची आठवण करून देत असल्याचे सांगण्यात आले.दोन हजारांची नोटदाखविली अन् मार खाल्लाएका भांडे विक्रेत्याने सांगितले की, नोटाबंदी काळात मला दोन हजारांची नोट मिळाली म्हणून मी जाम खुश होतो. हॉटेलात जाऊन नास्ता केला. ७० रुपयांचे बिल देण्यासाठी दोन हजारांची नोट दिली असता एवढी चिल्लर कोठून आणू असे म्हणत हॉटेल मालकाने वाद घालून मला मारहाण केली. दोन हजारांच्या नोटेने मार खावा लागल्याचे हे अनोखे उदाहरण गोव्यात पुढे आले.

मुले घरात बसून; वडील चिंतित- भाजप सरकारने गेल्या १० वर्षांत रोजगारनिर्मितीसाठी कोणतीही पावले उचलली नसल्याचे बापलेक सांगतात. - चांगले शिक्षण घेऊनही मुले रोजगाराशिवाय घरात बसून आहेत. - बेरोजगारी ही गोव्यातील सुशिक्षित तरुणांसाठी प्रमुख समस्या बनली आहे. त्याचा परिणाम भाजपला भोगावा लागण्याची चिन्हे दिसत आहेत. 

टॅग्स :Goa Assembly Election 2022गोवा विधानसभा निवडणूक २०२२ElectionनिवडणूकgoaगोवाBJPभाजपा