पणजी : युक्रेनचे पहिले चार्टर विमान ३३ रशियन पर्यटकांना घेऊन शुक्रवारी दाबोळी विमानतळावर उतरले. यामुळे आता राज्याचा पर्यटन मोसम खऱ्या अर्थाने सुरू झाला आहे. विकेंडला गांधी जयंतीची सुट्टी आल्याने सरकारी कर्मचाऱ्यांना सलग तीन दिवस सुट्टी मिळाली. त्यामुळे शेजारी महाराष्ट्र, कर्नाटक तसेच गुजरात राज्यामधून देशी पर्यटकही मोठ्या संख्येने दाखल झाले असून किनाऱ्यांवर त्याची झलक दिसत आहे. पुढील काळात वेगवेगळ्या देशांची चार्टर विमाने येऊ लागतील. या मोसमात १२00 चार्टर विमानांचे उद्दिष्ट सरकारने ठेवले आहे. या वर्षी पर्यटन मोसम १५ दिवस आधीच सुरू झालेला आहे. मिनार एअरलाइन्सचे वरील चार्टर विमान युक्रेनहून दुबईमार्गे पहाटे ४.३९ वाजता गोव्यात दाखल झाले. आठवड्यातून बुधवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार असे चार दिवस हे विमान येईल. दरम्यान, स्वदेश दर्शन योजनेखाली ४00 ते ५00 कोटींचा निधी केंद्राकडून मिळेल, याबाबत पर्यटनमंत्री दिलीप परुळेकर यांनी खात्री व्यक्त केली आहे. (प्रतिनिधी)
युक्रेनचे पहिले चार्टर विमान दाखल
By admin | Updated: October 3, 2015 03:36 IST