शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

महापौरपदासाठी उदय मडकईकर यांचे नाव, 15 नगरसेवकांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2018 20:08 IST

पणजी : येथील महापालिकेच्या महापौर व उपमहापौर पदासाठी येत्या दि. 15 मार्चर्पयत निवडणूक होणार आहे. सत्ताधारी सतरा सदस्यीय गटापैकी पंधरा नगरसेवकांनी बुधवारी सायंकाळी मिरामार येथील एका क्बलमध्ये बैठक घेतली व नगरसेवक उदय मडकईकर यांचे नाव महापौरपदासाठी उमेदवार म्हणून निश्चित केले आहे. या गटाचे प्रमुख असलेले माजी मंत्री बाबूश मोन्सेरात हे ...

पणजी : येथील महापालिकेच्या महापौर व उपमहापौर पदासाठी येत्या दि. 15 मार्चर्पयत निवडणूक होणार आहे. सत्ताधारी सतरा सदस्यीय गटापैकी पंधरा नगरसेवकांनी बुधवारी सायंकाळी मिरामार येथील एका क्बलमध्ये बैठक घेतली व नगरसेवक उदय मडकईकर यांचे नाव महापौरपदासाठी उमेदवार म्हणून निश्चित केले आहे. या गटाचे प्रमुख असलेले माजी मंत्री बाबूश मोन्सेरात हे अंतिम निर्णय घेणार आहेत.

महापौरपदी सध्या सुरेंद्र फुर्तादो हे आहेत. फुर्तादो व त्यांची नगरसेवक पत्नी वगळता अन्य पंधराही नगरसेवकांची बैठक पार पडली. उपमहापौर लता पारेख यांनीही या बैठकीत भाग घेतला. उपमहापौरपदासाठी यापूर्वी अस्मिता केरकर यांचे नाव ठरविण्यात आले आहे. महापौर बदलण्याचे गट प्रमुख मोन्सेरात यांनी ठरविले व पंधराही नगरसेवकांनी मिळून अगोदर महापौर पदासाठी एखादे नाव ठरवावे, अशी सूचना मोन्सेरात यांनी केली होती. त्यानुसार बुधवारी झालेल्या बैठकीत सर्व नगरसेवकांनी मडकईकर यांचे नाव सूचविले. मोन्सेरात यांना हे नाव मान्य आहे की नाही ते शेवटी मोन्सेरात यांच्या निर्णयावरूनच कळून येईल पण महापौरपदावर सध्या तरी आणखी कुणी दावा केलेला नाही. मडकईकर यांचे नाव एकमताने ठरल्याचे काही नगरसेवकांनी लोकमतला सांगितले.

महापौरपदाच्या निवडणुकीसाठी महापालिकेतील विरोधी भाजप गटाकडूनही आपला उमेदवार उभा केला जाणार आहे. उपमहापौरपदासाठीही भाजपचा उमेदवार असेल. मुख्यमंत्री मनोहर र्पीकर हे सध्या आजारी असल्याने त्याना महापालिकेच्या राजकारणात लक्ष घालताच आलेले नाही. पुंडलिक राऊत देसाई यांचे नाव भाजपच्या गटातून तूर्त ऐकू येत आहे. पणजीचे माजी आमदार सिद्धार्थ कुंकळ्ळ्य़ेकर यांना

राऊत देसाई हे महापौर झालेले हवे आहेत, अशी चर्चा भाजप समर्थक नगरसेवकांमध्ये सुरू आहे. मात्र महापौरपदासाठी भाजपमध्ये आणखीही एक-दोन नगरसेवक इच्छुक आहेत. तिस सदस्यीय पणजी महापालिकेत भाजपकडे एकूण तेरा नगरसेवकांचे संख्याबळ आहे. महापौर फुर्तादो व त्यांच्या पत्नीच्या मताला खूप महत्त्व आहे. प्रत्यक्ष निवडणुकीवेळी जर महापालिकेत दोन्ही गटांकडे प्रत्येकी पंधरा नगरसेवक असे संख्याबळ झाले तर ड्रॉ काढून महापौर ठरवावे लागतील. मोन्सेरात यांची खेळी यशस्वी की अयशस्वी होईल ते प्रत्यक्ष निवडणुकीवेळीच कळेल. विद्यमान महापौर व उपमहापौरांची मुदत येत्या दि. 15 मार्चला संपुष्टात येत आहे.

टॅग्स :goaगोवा