पणजी : विधानसभा अधिवेशनात विरोधी सदस्यांना बोलू दिले जात नाही, असा आरोप तीन अपक्ष आमदार तसेच काँग्रेसचे विधिमंडळ प्रवक्ते आमदार रेजिनाल्ड लॉरेन्स यांच्याकडून केला जात आहे. सत्ताधाऱ्यांकडून विरोधकांचा आवाज दाबण्याचाच हा प्रकार असल्याचा आरोप करण्यात येत आहे. विधानसभा कामकाजाचा पहिला आठवडा संपला. या आमदारांनी अनेक महत्त्वाचे प्रश्न राहून गेल्याची खंतही व्यक्त केली. आमदार रोहन खंवटे यांनी सरकार विरोधकांचा आवाज दाबू पाहात असल्याचा आरोप केला. ते म्हणाले, ‘गेल्या बुधवारी किनारा सफाई कंत्राट घोटाळ्याचा महत्त्वाचा प्रश्न कामकाजात येणार होता. पाचव्या क्रमांकावर हा (पान २ वर)
विरोधकांना दाबण्याचाच प्रकार
By admin | Updated: August 3, 2015 01:56 IST