शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

Goa: वार्का येथे कारने धडक दिल्याने दुचाकी चालक ठार: फरार कारचालकाला फाेंडयात पकडले

By सूरज.नाईकपवार | Updated: February 8, 2024 11:45 IST

Goa Accident News: नुवेगाळ वार्का येथे  बुधवारी मध्यरात्री कारच्या धडकेने दुचाकीवरील एक युवक ठार झाला. आशित साहा (२९) असे मयताचे नाव असून, तो बाणवाली येथे रहात होता. अपघातानंतर कारचालकाने घटनास्थळाहून पोबारा केला होता. नंतर त्याला फोंडा पोलिस ठाण्यानजिक तेथील पोलिसांनी पकडले.

- सूरज नाईकपवार मडगाव - नुवेगाळ वार्का येथे  बुधवारी मध्यरात्री कारच्या धडकेने दुचाकीवरील एक युवक ठार झाला. आशित साहा (२९) असे मयताचे नाव असून, तो बाणवाली येथे रहात होता. अपघातानंतर कारचालकाने घटनास्थळाहून पोबारा केला होता. नंतर त्याला फोंडा पोलिस ठाण्यानजिक तेथील पोलिसांनी पकडले. राघवेंद्र परशुराम साळुके (२४) असे या संशयिताचे नाव असून, तो मूळ कर्नाटकातील बेळगाव येथील असल्याची माहिती कोलवा पोलिसांनी दिली.

मयत आशित हा पश्चिम बंगाल राज्यातील असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. या पत्ताची खातरजमा पोलिस सदया करीत आहेत. तो एका पंचतारांकीत हॉटेलात काम करीत होता. बुधवारी त्याची सुटटी होती.रात्री पावणे एकच्या दरम्यान तो दुचाकीवरुन वार्का येथून बाणावलीला जात होता तर इनोवा कार विरुध्द दिशेने येत होती. या कारची जोरदार धडक दुचाकीला बसली व आशित हा गंभीर जखमी झाला. त्याच स्थितीत त्याला सोडून कारचालकाने वाहनासह धूम ठोकली.

अपघाताची माहिती मिळाल्यानंतर कोलवा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक थॅरन डिकॉस्ता यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सुभाष गावकर व पोलिसांनी घटनास्थळी जाउन पंचनामा केला. अपघातस्थळी कारचे बंपर पडले होते. त्यावर वाहनाचा क्रमांक होता. पोलिसांनी लागलीच यासबंधी बिनातरी संदेश राज्यातील सर्व पोलिस ठाण्यात पाठवून दिले होते. सीमेवरील चेकनाक्यालाही सतर्क करण्यात आले होते.

संशयित कार चालकने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार तो कारवर चालक म्हणून काम करत आहे. त्याच्या मालकाने काहीजणांना माजोर्डा येथे सोडण्यास सांगितले होते. या कार चालकावर पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.

जखमी आशितला येथील दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात नेले असता, तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले. मृतदेह या इस्पितळातील शवागारात ठेवला आहे. मयत ज्या हॉटेलमध्ये कामाला होता तेथून त्याच्या कुटुंबीयाची माहिती पोलिस गोळा करीत आहेत. उपनिरीक्षक सुभाष गावकर पुढील तपास करीत आहेत.

टॅग्स :Accidentअपघातgoaगोवा