शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
2
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
3
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
4
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
5
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
6
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
7
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
8
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
9
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
10
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
11
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
12
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
13
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
14
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
15
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
16
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
17
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
18
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
19
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
20
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 

जुन्या काळातील गाजलेल्या दोन ट्रम्पेट वादकांना गोव्यात मानाचा मुजरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2019 20:29 IST

पाश्र्चिमात्य संगीताचे गोव्यातून धडे गिरविलेले आणि नंतर मुंबईत जाऊन बॉलिवूड काबीज केलेले दोन समकालीन संगीतकार क्रिस पेरी व फ्रँक फर्नाड या दोन दिग्गज ट्रम्पेट वादकांचा मरणोत्तर सन्मान होण्याची आगळीवेगळी घटना या आठवडय़ात गोव्यात होणार आहे.

 - सुशांत कुंकळयेकर मडगाव -  पाश्र्चिमात्य संगीताचे गोव्यातून धडे गिरविलेले आणि नंतर मुंबईत जाऊन बॉलिवूड काबीज केलेले दोन समकालीन संगीतकार क्रिस पेरी व फ्रँक फर्नाड या दोन दिग्गज ट्रम्पेट वादकांचा मरणोत्तर सन्मान होण्याची आगळीवेगळी घटना या आठवडय़ात गोव्यात होणार असून महान ट्रम्पेट वादक क्रिस पेरी यांचे नाव मडगावातील रस्त्याला देण्याचा कार्यक्रम 2 मे रोजी होणार आहे. तर फिल्म निर्माते व ट्रम्पेट वादक फ्रँक फर्नाड यांची जन्मशताद्बी 3 मे रोजी पणजीत साजरी केली जाणार आहे.2 मे पासून मडगावात चार दिवसांचा वारसा महोत्सव आयोजीत करण्यात आला असून याच महोत्सवाचा एक भाग म्हणून ज्या भागात क्रिस पेरी यांचा जन्म झाला त्या भागातील रस्त्याला या महान संगीतकाराचे नाव देण्यात येणार आहे. तर फ्रँक फर्नाड यांच्या जन्मशताब्दी कार्यक्रमानिमित्त पणजीत होणा:या कार्यक्रमात त्यांच्या कार्याला उजाळा देण्यात येणार आहे.पोतरुगीज काळात गोव्यात अनेक दिग्गज संगीतकार निर्माण झाले. मात्र त्यातल्या ब:याच जणांनी मुंबईत जाऊन आपले नशिब अजमावले. क्रिस पेरी व फ्रँक फर्नाड हे त्यापैकीच एक. या दोघांचाही प्रवास गोव्यात लोकप्रिय असलेल्या तियात्र रंगमंचावरुन झाला. मात्र मुंबईत गेल्यावर त्यांनी आपल्या वादनांतून बॉलिवूड क्षेत्रवर वकूब गाजवला.यातील क्रिस पेरी यांचे नाव त्यांनी ह्यकभी कभीह्ण व ह्यत्रिशूलह्ण या गाजलेल्या हिंदी चित्रपटांना दिलेल्या संगीतामुळे सर्वाच्या मुखी झाले. एक उत्कृष्ट ट्रम्पेटवादक म्हणून प्रसिद्ध असलेले क्रिस पेरी (क्रिस्तीवाव परेरा) हे सेक्साफोन, बासरी, कि-बोर्ड पियानो व गितार ही वाद्येही कुशलतेने हाताळायचे. त्यांनी संगीत दिलेली कित्येक कोंकणी कातारे लॉर्ना यांच्यामुळे संपूर्ण जगात जिथे जिथे कोंकणी माणूस आहे तिथर्पयत पोहोचली आहेत.यंदा जन्मशताब्दी वर्ष असलेले फ्रँक फर्नाड (फ्रँकलिन फर्नाडिस) हे कुडचडे गावातील असून कुडचडेच्या चर्च स्कूलमध्ये व्हायोलिन व ट्रम्पेटचे धडे घेऊन नंतर मुंबईत गेले. बॉलिवूडमध्ये जुन्या काळातील गाजलेले संगीतकार सचिनदेव बर्मन, अनिल बिस्वास, राजेश रोशन, सी. रामचंद्र, कल्याणजी आनंदजी यांच्या वाद्यवृंदात त्यांनी आपला कला पेश केली. फर्नाड यांनी निर्माण केलेले आणि स्वत: संगीतबद्ध केलेले आमचे नशिब, निर्मोण आणि म्हुजी घोरकान्न या चित्रपटातून कोंकणी संगीताला एक वेगळीच उंची मिळवून दिली होती. फर्नाड यांच्याशी क्रिस पॅरी यांचीही समानता असून कोंकणीतील पहिला रंगीत चित्रपट असलेला ह्यभुंयेरांतलो मुनीसह्ण हा चित्रपट क्रिस पॅरी यांनी निर्माण केला होता. आशा भोसले यासारख्या गायिकेला त्यांनी प्रथमच कोंकणीत आणून त्यावेळी एक विक्रमच केला होता. 

टॅग्स :goaगोवा