शहरं
Join us  
Trending Stories
1
मी यापुढे निवडणूक लढवणार नाही, पण...; एकनाथ खडसेंची राजकारणातून निवृत्ती?
2
...मग तुझ्या पोराला निवडून का आणला नाही?; जितेंद्र आव्हाडांचा अजित पवारांवर हल्लाबोल
3
Exclusive: काँग्रेसचे शहजादे माओवाद्यांची भाषा बोलत आहेत; PM मोदींनी सांगितला NDA आणि इंडी आघाडीतला फरक
4
अस्सी घाटावर पूजा, कालभैरवाचा आशीर्वाद...; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी PM मोदींचा वाराणसीत मेगा प्लॅन
5
"ठाकरेंना १९९९ मध्येच मुख्यमंत्री व्हायचं होतं, राणेंना रोखण्याची..."; फडणवीसांचा गौप्यस्फोट
6
Ashok Gehlot : राहुल गांधी स्मृती इराणींच्या विरोधात निवडणूक का लढवत नाहीत?; अशोक गेहलोत म्हणतात...
7
"आम्ही या हंगामात...", पराभवानंतर Hardik Pandya भावूक, दिली प्रामाणिक कबुली
8
माधुरीचा साधेपणा! 'साजन'मधील ड्रेस परिधान करुन पोहोचली पुरस्कार सोहळ्याला; 33 वर्ष जुना video viral
9
राहुल गांधी पंतप्रधान मोदींसोबत चर्चेसाठी तयार, भाजपाने दिले प्रत्युत्तर; म्हणाले, ...
10
PM Narendra Modi Interview: उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांचा वारसा सांगण्याचा अधिकार आहे का?; मोदींचा थेट सवाल
11
वीज आणि पिठाचे भाव गगनाला भिडले, PoK मध्ये संघर्ष; संतप्त जमाव रस्त्यावर, पोलिसाचा मृत्यू
12
Chandrashekhar Bawankule : "उद्धव ठाकरे यांच्यात हिंमत असेल तर..."; चंद्रशेखर बावनकुळे यांचं जाहीर आव्हान
13
तुम्ही औरंगजेबाचे फॅन आहात का?; संजय राऊतांच्या प्रश्नावर उद्धव ठाकरेंचा खोचक टोला
14
'धारावी मॉडेल मी यशस्वी केलं, एसीमध्ये बसलेल्यांनी बोलू नये'; राहुल शेवाळेंची ठाकरेंवर टीका
15
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना शुभदायी, लाभाच्या संधी; थकीत येणी मिळतील, सौभाग्याचा काळ!
16
Exclusive: 'बाळासाहेबांच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याची प्रतिष्ठा मी जपली…', पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं
17
'या' गोष्टींमुळे सुशांत सिंह राजपूत मृत्यूपूर्वी होता त्रस्त, मनोज वाजपेयी यांचा मोठा खुलासा, म्हणाले....
18
ओला ईलेक्ट्रीक स्कूटरवर वीज कोसळली, रस्त्यावर मोठा खड्डा पडला, एकाचा मृत्यू, दोन गंभीर
19
Exclusive:...म्हणून अजित पवार, एकनाथ शिंदे आमच्यासोबत आले; पंतप्रधान मोदींनी सांगितलं नेमकं काय घडलं!
20
Exclusive: राज ठाकरे आमच्यासाठी नवीन नाहीत, केवळ सत्तेसाठी एकत्र आलेलो नाही; पंतप्रधान मोदींची 'मन(से) की बात'

भांग पिऊन कैद्यांचा जेलमध्ये दंगा, दोन जणांना हॉस्पिटलमध्ये केलं दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2018 1:58 PM

उत्तर गोव्यात कोलवाळ येथे असलेल्या केंद्रीय मध्यवर्ती कारागृहात महाशिवरात्री दिवशी कर्मचा-यांनी व कैद्यांनी भांग पिऊन दंगामस्ती केल्याची घटना मंगळवारी (13 फेब्रुवारी) मध्यरात्री घडली आहे.

म्हापसा : उत्तर गोव्यात कोलवाळ येथे असलेल्या केंद्रीय मध्यवर्ती कारागृहात महाशिवरात्री दिवशी कर्मचा-यांनी व कैद्यांनी भांग पिऊन दंगामस्ती केल्याची घटना मंगळवारी (13 फेब्रुवारी) मध्यरात्री घडली आहे. अती प्रमाणात भांग प्राशन केल्यानंतर उलट्या सुरू झाल्याने एक जेलगार्ड तसेच दोन कैद्यांना तातडीने उपचारासाठी इस्पितळात दाखल करण्याची पाळी कारागृहाच्या प्रशासनावर आली. उत्तर गोव्यात कोलवाळ येथे गोवा-मुंबई राष्ट्रीय महामार्ग 17 वर असलेल्या केंद्रीय कारागृहात मंगळवारी रात्री कर्मचारी व कैद्यांनी भांग पिऊन दंगामस्ती केली.  मंगळवारी रात्री ११.४५ वाजण्याच्या सुमाराला हा प्रकार घडला. अती प्रमाणावर भांग प्राशन केल्याने जेलगार्ड व कैद्यांना नंतर उलट्या सुरु झाल्या. लागलीच त्यांना उपचारासाठी उत्तर गोवा जिल्हा इस्पितळात दाखल करण्यात आले. तेथे जेलगार्डला दाखल करुन घेण्यात आले तर इतर दोन कैद्याना गोवा वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तेथे त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती म्हापसा पोलिसांनी दिली. 

सदर प्रकारानंतर तुरुंग अधीक्षकांनी एक बाटली जप्त केली असून त्यात भांग असल्याचे आढळून आल्याची माहिती प्राप्त झाली आहे; पण उपलब्ध झालेल्या माहितीनुसार अधीक्षकांनी आपल्या अहवालात सापडलेल्या बाटलीत गोळ्या मिसळून त्यांना प्यायला दिल्याचे म्हटले आहे; पण त्या संदर्भात मात्र वृत्ताला दुजोरा मिळू शकलेला नाही. उपचारासाठी दाखल करण्यात आलेले दोन्ही गुन्हेगार सुर्वेश उर्फ बाबू आरोलकर व विनय गडेकर यांच्यावर  खूनाचा प्रयत्न केल्याचा आरोप ठेवण्यात आलेला आहे. म्हापसा पोलीस स्थानक परिसरातील या नामवंत गुंडाना गेल्याच महिन्यात अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांची रवानगी कारागृहात करण्यात आलेली. सुमारे दोन वर्षांपूर्वी सुरू करण्यात आलेल्या या कारागृहाच्या उद्घाटनानंतर अनेक घटना घडल्या आहे. अश्फाक बेंग्रे सारख्या नामवंत गुडांचा याच कारागृहात खून करण्यात आलेला. तसेच कैद्यांनी कारागृहात हैदास घालण्याचे अनेक प्रकारही इथे घडले आहेत. घडलेल्या प्रकाराची तपासणी सुरु करण्यात आली असून इस्पितळात दाखल करण्यात आलेल्या कैद्यांची जबानी नोंद करण्यात येणार असल्याची माहिती निरीक्षक तुषार लोटलीकर यांनी दिली. 

टॅग्स :jailतुरुंगgoaगोवा