शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

मापा पंचवाडी येथे झालेल्या अपघातात दोन ठार पाच गंभीर जखमी

By आप्पा बुवा | Updated: May 22, 2023 20:00 IST

नातेवाईकांना घरी सोडायला जाताना गाठले काळाने 

अप्पा बुवा, लोकमत न्यूज नेटवर्क, फोंडा: रिवण सांगे येथे नातेवाईकांना सोडायला जाताना कारने बाजूच्या झाडाला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोन ठार झाले आहेत तर पाच जण गंभीर जखमी होण्याची घटना मापा पंचवाडी येथे सोमवारी सकाळी पावणेअकरा वाजता घडली आहे.

सविस्तर वृत्तानुसार पाज शिरोडा येथील महादेव नाईक हे आपल्या काही नातेवाईक व मित्रमंडळींबरोबर दोन दिवसापूर्वी शिर्डी येथे देवदर्शनासाठी गेले होते. काल रात्री उशिरा शिर्डीहून ते पाज शिरोडा येथे घरी पोहोचले. रिवण सांगे येथील त्यांचे काही नातेवाईक सुद्धा त्यांच्याबरोबर शिर्डीला गेले होते.रात्री सगळेजण पाज शिरोडा येथे झोपले. सदर नातेवाईकांना सोमवारी सकाळी सोडायला म्हणून महादेव नाईक  जात होते. यावेळेस महादेव नाईक यांचे कुटुंबीय गाडीत बसले.वळणा वळणाच्या रस्त्यावर मापा येथे गाडीवरील त्यांचा ताबा सुटला व गाडीने सरळ बाजूला असलेल्या सागवानच्या झाडाला धडक दिली. ही धडक एवढी जोरदार होती की गाडीचा चक्काचूर झाला.  

अपघात झाला त्यावेळी महादेव नाईक हे गाडी चालवत होते तर  त्यांचा मुलगा सिद्धम महादेव नाईक (वय 11) हा पुढे बसला होता. सदर अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला .रेशम राजेंद्र नाईक (वय 18 ,राहणार रिवण) ही सुद्धा सदर अपघातात गंभीर जखमी झाली होती. गोवा मेडिकल कॉलेजमध्ये तिच्यावर उपचार चालू असतानाच  तिला मृत्यू आला . सदर अपघातात महादेव नाईक ( शिरोडा), पूर्वा महादेव नाईक( शिरोडा), सौम्या  महादेव नाईक( वय सात शिरोडा.), राधिका राजेश नाईक ( वय 52,रिवण सांगे), रोहिणी नाईक (वय 22,रिवण सांगे) हे पाच जण ह्या अपघातात गंभीर जखमी झाले आहेत.

त्यापैकी राधिका नाईक यांच्यावर जी एम सी मध्ये उपचार चालू आहेत तर इतर चार जणांवर मडगाव येथील अस्पिसिओ ईस्पितळात उपचार चालू आहेत. हवालदार अजित गावडे यांनी सदर अपघाताचा पंचनामा केला असून, पोलीस निरीक्षक विजयकुमार चोडणकर हे पुढील तपास करत आहेत.

टॅग्स :goaगोवाAccidentअपघात