शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

स्मार्ट सिटीकडून तुळशी वृंदावनालाही नुकसान; इतिहास अभ्यासकांकडून निषेध

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2024 13:39 IST

पणजीत सुरु असलेल्या स्मार्ट  सिटीच्या या बेजबाबदार कामांमुळे सांतिनेज येथे असलेल्या कदंबकालीन तुळशी वृंदावनाला नुकसान केले.

नारायण गावस

पणजी: पणजीत सुरु असलेल्या स्मार्ट  सिटीच्या या बेजबाबदार कामांमुळे सांतिनेज येथे असलेल्या कदंबकालीन तुळशी वृंदावनाला नुकसान केले. याचा इतिहास अभ्यासक प्रा. प्रजल साखरदांडे, तसेच महेश म्हांबरे व पणजी महानगर पालिकेचे माजी नगरसेवक ॲल्ड्रीन बासालियो यांनी निषेध केला. पणजीच्या ऐतिहासिक वारसा स्थळांचे संवर्धन करण्यासाठी पूर्ण स्मार्ट सिटीच्या कामाचे ऑडिट होणे गरजेचे आहे, अशी मागणी यावेळी त्यांनी केली. 

पणजीत सुरु असलेल्या स्मार्ट  सिटीच्या कामाचे कुठेच याेग्य नियोजन केले जात नाही. सर्वत्र रस्ते खाेदले आहेत. या अगोदर एका युवकाचा या खड्ड्यात पडून मृत्यू झाला होता. तसेच अनेक वेळा रस्त्यावरील खड्ड्यात लाेकांच्या गाड्या पडून अपघात झाले आहेत. सर्वत्र बेशिस्तपणे रस्ते खाेदले आहेत. आता वारसा स्थळांचेही नुकसान केले जात आहे. सांतिनेज येथे असलेले हे तुळशी वृंदावन १२ व्या  शतकातील आहे. प्रत्येक तुळशीविवाह दिवशी हिंदू तसेच काही ख्रिस्त बांधवही एकत्र येऊन तुळशी विवाह साजरा करतात. पण स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांनी येथे काम करताना या वृंदावनालाही न  पाहता त्याचे नुकसान केले. या तुळशी वृंदावनाचा इतिहास खूप मोठा आहे, असे प्रा. प्रजल साखरदांडे यांनी सांगितले. 

 संपूर्ण स्मार्ट सिटीचे ऑडिट गरजेचे : महेश म्हांबरे

पणजीतील सर्व वारसास्थळांचे संवर्धन करण्यासाठी पणजी स्मार्ट सिटीच्या सुरु असलेल्या कामांचे संपूर्ण ऑडिट हाेणे गरजेच आहे.  पणजीत स्मार्ट सिटीचे काम करतात तेथे कुठेच योग्य नियोजन केले जात नाही. मिळेल तिथे खाेदले जात असून त्यांना लाेकांचे काही पडलेले नाही. या कामाच्या स्थळी स्मार्ट सिटीचे अधिकाऱ्यांकडूनही याेग्य पाहणी केली जात नाही. येथे सर्वत्र अंदाधुंद काम येथे सुरु आहे. पणजीतील लोकांना तसेच पणजीत येणाऱ्या लोकांना याचा त्रास सहन करावा लागत  आहे. आता त्यांच्यांकडून पणजीतील वारसा स्थळ असलेल्या तुळशी वृंदावनाचे नुकसान केेले याचा आम्ही निषेध करतो, असे महेश म्हांबरे म्हणाले.