शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीने पत्ते उघडले; शिक्षक मतदारसंघासाठी सुनिल तटकरेंनी केली उमेदवाराच्या नावाची घोषणा
2
रवींद्र धंगेकर यांचा भाजपवर आणखी एक गंभीर आरोप; ९९६ कोटींचा निधी घेतला आणि...
3
उत्तर कोरियाच्या हेरगिरी उपग्रहाचं प्रक्षेपण अपयशी, उड्डाण करताच काही सेकंदात उडाल्या रॉकेटच्या ठिकऱ्या
4
‘’हवे तेवढे पैसे घ्या, पण मला मारू नका’’, अपघातानंतर ‘बाळा’ने दाखवला पैशांचा माज, प्रत्यक्षदर्शीचा दावा  
5
राजकोट अग्नितांडव! गेम झोनच्या मालकाचाही जळून मृत्यू, आईच्या DNA मुळे पटली ओळख...
6
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीच्या हत्येचे गूढ उकलले; जवळच्याच लोकांकडून दगाफटका, ३ आरोपींना अटक!
7
"युवासेनेच्या पदाधिकाऱ्याला कोस्टल रोडचे काम"; आदित्य ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर भाजपचे प्रत्युत्तर
8
आणखी एका फॅक्टरीमध्ये बॉयलरचा स्फोट, ४० कामगार होरपळले, ८ जणांची प्रकृती गंभीर
9
 प्रचारसभेवेळी राहुल गांधी झाले उकाड्याने त्रस्त, भरसभेत डोक्यावर ओतलं पाणी   
10
'कान्स'मधलं वातावरण भारावून टाकणारं होतं - छाया कदम
11
शालिमार-मुंबई एलटीटी एक्स्प्रेसमधील बंद एसीवरून प्रवाशांचा संताप
12
राज्यातील दुष्काळाच्या मुद्द्यावर काँग्रेस आक्रमक, परिस्थितीच्या पाहणीसाठी विभागवार समित्यांची स्थापना
13
कोस्टल रोडच्या टनेलला गळती, व्हिडिओ समोर येताच CM शिंदे 'इन अॅक्शन'; कायमस्वरुपीच्या दुरुस्तीचे आदेश!
14
WhatsApp युजर्सना खुशखबर! आता मोठे Voice मेसेज पाठवता येणार, जाणून घ्या कसे?
15
घरातून एकत्रच पळाल्या ३ मुली; पत्र वाचून कुणीही शोधण्याची हिंमत केली नाही, अखेर...
16
AAP नेत्या आतिशी यांच्याविरोधात कोर्टाने बजावले समन्स, केजरीवालही आहेत आरोपी, जाणून घ्या प्रकरण
17
ट्रेनमध्ये सीट बुक केली, तरीही उभे राहून करावा लागला प्रवास; रेल्वेला ठोठावला १३ हजारांचा दंड!
18
"यामिनी जाधवांकडून सापळेंवर कमिशनचे आरोप"; चौकशीचा ड्रामा कशासाठी म्हणत ठाकरे गटाची टीका
19
अमेरिकेतील संकट बनलं भारतासाठी संधी?; औषध उत्पादक कंपन्यांना मोठा फायदा
20
अमेरिकेत कारच्या धडकेत भारतीय विद्यार्थिनीचा मृत्यू; शिक्षण पूर्ण करुन नोकरीच्या होती शोधात

Manohar Parrikar Death: स्वतःच्या शेवटच्या ट्विटमध्ये पर्रीकर म्हणतात...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2019 8:33 AM

एक आयआयटीयन इंजिनीअर असलेले गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर शेवटपर्यंत सोशल मीडियावर सक्रिय होते.

पणजी- एक आयआयटीयन इंजिनीअर असलेले गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर शेवटपर्यंत सोशल मीडियावर सक्रिय होते. ट्विटरवरून ते नेहमीच कार्यरत असायचे. त्यांनी शेवटचं ट्विट पाच दिवसांपूर्वी केलं होतं. विशेष म्हणजे शेवटच्या ट्विटमध्येही पर्रीकरांनी भाऊसाहेब नावानं प्रसिद्ध असलेले गोव्याचे पहिले मुख्यमंत्री दयानंद बांदोडकर यांची आठवत काढत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली होती.भाऊसाहेबांच्या जयंतीनिमित्त पर्रीकरांनी लिहिलं होतं की, गोव्याचे पहिले मुख्यमंत्री दयानंद(भाऊसाहेब) बांदोडकरांना जयंतीनिमित्त श्रद्धांजली अर्पण करतो. गोव्याच्या प्रगतीचा मजबूत पाया रचण्यासाठी भाऊसाहेब यांनी अमूल्य योगदान दिलं आहे. भाऊसाहेब हे महाराष्ट्रवादी गोमांतक पार्टीचे नेते होते, ते 1963मध्ये गोव्याचे पहिले मुख्यमंत्री झाले. त्यानंतर 1973पर्यंत लागोपाठ तीन वेळा ते गोव्याचे मुख्यमंत्री राहिले. भाऊसाहेब यांच्या निधनानंतर त्यांची मुलगी शशिकला काकोडकर यांना मुख्यमंत्री करण्यात आलं. ज्या गोव्याचे एकमेव महिला मुख्यमंत्री राहिल्या आहेत.गोव्याचे मुख्यमंत्री व भारताचे माजी संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी रविवारी संध्याकाळी अखेरचा श्वास घेतला. ते स्वादुपिंडाशी संबंंधित कर्करोगाशी झुंज देत होते. त्यांचे वय ६३ वर्षे होते. काही वर्षांपूर्वीच त्यांच्या पत्नीचेही कर्करोगाने निधन झाले होते. त्यांच्या मागे दोन पुत्र, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या निधनामुळे सोमवारी राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी, सरचिटणीस प्रियांका गांधी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, भाजपाध्यक्ष अमित शहा, उपाध्यक्ष विनय सहस्रबुद्धे, उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक, काँग्रेसचे लोकसभेतील नेते मल्लिकार्जुन खरगे, शिवसेना नेते संजय राऊत यांच्यासह विविध पक्षांच्या नेत्यांनी त्यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले आहे.

टॅग्स :Manohar Parrikarमनोहर पर्रीकरTwitterट्विटर