शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र सरकारच्या महात्मा फुले आरोग्य योजनेचे कार्ड दाखवून गोव्यातील रुग्णालयात घेता येणार उपचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2018 19:38 IST

महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग वगैरे भागात महात्मा ज्योतीबा फुले जन आरोग्य योजना सरकारतर्फे राबविली जात असून, गोव्यातील गोवा वैद्यकीय महाविद्यालयीन रुग्णालय (गोमेकॉ) हे आता प्रथमच या योजनेचा भाग होणार आहे.

पणजी  - महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग वगैरे भागात महात्मा ज्योतीबा फुले जन आरोग्य योजना सरकारतर्फे राबविली जात असून, गोव्यातील गोवा वैद्यकीय महाविद्यालयीन रुग्णालय (गोमेकॉ) हे आता प्रथमच या योजनेचा भाग होणार आहे. परिणामी महाराष्ट्रातील लोकांना या योजनेच्या लाभाचे कार्ड वापरून गोव्यातील गोमेकॉ  रुग्णालयात उपचार घेता येतील.

गोमेकॉ हे सरकारी रुग्णालय असले तरी, पूर्ण कोकणपट्टय़ात खासगी रुग्णालयकडे देखील ज्या सुविधा नाहीत, त्या सगळ्य़ा गोमेकॉ रुग्णालयमध्ये आहेत. हृदयरोगावरील उपचार येथे केले जातात. बायपाससह हृदयावरील अन्य सर्व प्रक्रिया आणि श क्रिया गोमेकॉत केल्या जातात. गोमंतकीयांसाठी ह्या सगळ्य़ा सेवा व उपचार मोफत दिले जातात. परप्रांतीयांकडून 20 टक्के शूल्क आकारावे असे प्रथमच ठरले व गेल्या जानेवारी महिन्यापासून अंमलबजावणी सुरू झाली. अनेक विदेशी पर्यटक तसेच कारवार ते सिंधुदुर्गर्पयतचे लोक गोमेकॉत येऊन उपचार घेतात. त्यांना थोडे शुल्क लागू झाल्यामुळे नाराजीची भावना सिंधुदुर्गमधून येणे सुरू झाली. दीपक केसरकर, नितेश राणे आदी अनेकांनी सिंधुदुर्गमधील लोकांकडून गोव्यात शुल्क आकारणी केली जाऊ नये अशी मागणी सुरू केली. मात्र गोवा सरकार ठाम राहिले.

आम्ही कुणालाच कधी उपचार नाकारले नाही. परप्रांतांमध्ये जे वाहन अपघात होतात, त्या अपघातांमधील रुग्णांवर तातडीने गोव्याच्या रुग्णालयात मोफतच उपचार केले जातात, असे आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांनी अलिकडे वारंवार सांगितले. मात्र सर्वच प्रकारच्या रुग्णांवर गोमेकॉत उपचार मोफत केले जावे, अशी मागणी येऊ लागली. गोमेकॉमध्ये मुंबईतील डॉक्टरांच्या सहाय्याने किडनी रोपणाच्याही शस्त्रक्रिया पार पडतात. आतापर्यंत सोळा गोमंतकीय रुग्णांवर मूत्रपिंड रोपणाच्या शस्त्रक्रिया झालेल्या आहेत. गोमेकॉत यापुढे कॅन्सर रुग्णांवरील उपचार सुविधाही सुरू केली जाणार आहे. केंद्र सरकारने त्यासाठी गोव्याला 45 कोटींचा निधी मंजुर केला आहे.

दरम्यान, गोव्याचे आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांनी बुधवारी रात्री पावणे अकराच्या सुमारास मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. गोवा व महाराष्ट्रातही भाजप सरकार अधिकारावर आहे. सिंधुदुर्गमधील रुग्णांवर गोमेकॉ रुग्णालयात पैसे खर्च करण्याची वेळ येऊ नये, या मागणीविषयी राणे व फडणवीस यांच्यात चर्चा झाली. त्यासाठी ज्योतीबा फुले जन आरोग्य योजनेखाली गोमेकॉ रुग्णालय रुग्णांना मोफत सुविधा देईल, असे ठरले. म्हणजेच या योजनेच्या लाभाचे कार्ड गोमेकॉत रुग्णांनी स्वाईप करावे. थेट पैसे जमा होतील. महाराष्ट्र सरकार खर्चाचा भार उचलेल. यामुळे गोमेकॉचाही महसूल वाढणार आहे. गोमेकॉत आम्ही स्वाईप यंत्रे उपलब्ध करणार आहोत. सिंधुदुर्गमधील रुग्णांचा प्रश्न आता सुटला आहे, असे मंत्री राणे पत्रकारांशी बोलताना म्हणाले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसgoaगोवाsindhudurgसिंधुदुर्गhospitalहॉस्पिटल