शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

गोवा - मुरगाव बंदरात आश्रयास आलेले ट्रॉलर्स त्यांच्या राज्यात परतू लागले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2017 14:26 IST

मुरगाव बंदरात आश्रयास आलेले गुजरात,  केरळ, कर्नाटकचे ट्रॉलर्स वादळाची तीव्रता कमी झाल्यानंतर आपापल्या राज्यात परतू लागले आहेत. वादळाच्यावेळी समुद्रात पाण्याची पातळी वाढल्याने तसेच उंच लाटा आणि वाऱ्याचा वेगही वाढला  त्यामुळे सुमारे दोनशेहून अधिक परप्रांतीय ट्रॉलर्स गोव्याच्या मुरगाव बंदरात आश्रयास आले होते.

पणजी : मुरगाव बंदरात आश्रयास आलेले गुजरात,  केरळ, कर्नाटकचे ट्रॉलर्स वादळाची तीव्रता कमी झाल्यानंतर आपापल्या राज्यात परतू लागले आहेत. वादळाच्यावेळी समुद्रात पाण्याची पातळी वाढल्याने तसेच उंच लाटा आणि वाऱ्याचा वेगही वाढला  त्यामुळे सुमारे दोनशेहून अधिक परप्रांतीय ट्रॉलर्स गोव्याच्या मुरगाव बंदरात आश्रयास आले होते. हवामान आता सुधारल्याने हे ट्रॉलर्स त्यांच्या राज्यात परतू लागले आहेत. मुरगाव मंदिराचे उपाध्यक्ष जी पी राय म्हणाले की, निश्चितपणे किती ट्रॉलर्स  परतले हे सांगता येणार नाही. परंतु दोनशेहून अधिक ट्रॉलर्स  वादळाच्या काळात मुरगाव बंदरात आश्रयास आले होते. महाराष्ट्र, तमिळनाडूचे ट्रॉलर्स मोठ्या प्रमाणात आले होते. खलाशांना त्यांच्या येथील वास्तव्याच्या काळात तांदूळ, औषध,  अन्नपदार्थ पुरविण्यात आले . मुरगाव बंदर प्रशासनाने आणीबाणीच्या उपायोजना केल्या.  ट्रॉलर्स वाल्यांना योग्यरीत्या ट्रॉलर्स नांगरता यावे यासाठी सुविधा उपलब्ध करून दिल्या. मुरगाव बंदराचे चेअरमन जयकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम हाती घेण्यात आले.   मच्छीमारांना योग्य ती मदत पुरवण्यासाठी वेदांता ग्रूप तसेच जिंदाल साउथ वेस्ट पोर्ट लिमिटेड आधी कंपन्यांची मदत घेण्यात आली.  अनेक ट्रॉलर्स बंदरातून बाहेर पडले. आज सायंकाळी उशिरापर्यंत सर्व ट्रॉलर्स आपापल्या राज्यात  जातील , असे येथील मच्छीमारी खात्याचे अधिकारी म्हणाले.वास्कोचे उपजिल्हाधिकारी महादेव आरोंदेकर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की , या काळात मुरगाव बंदरात अडकलेल्या 40 खलाशांवर निम वैद्यकीय पथकाने उपचार केले.  सुमारे 2000 हून अधिक मच्छीमार बंदरात अडकले होते. दरम्यान या काळात परप्रांतीय मच्छीमारांना त्यांच्या राज्यातील येथील संघटनांच्यावतीने  आवश्यक ती मदत करण्यात आली. गोव्यातील मल्याळी केरळ असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी काही मच्छीमारांची रेल्वेने तिरुअनंतपुरम पर्यंत जाण्याची व्यवस्था केली. संघटनेचे सचिव पी सी प्रसाद की,  केरळच्या येथे अडकलेल्या मच्छीमारांना आम्ही सर्वतोपरी सहकार्य करीत आहोत. त्यांना त्यांच्या मायभूमीत पाठवण्याची योग्य ती व्यवस्था केली जाईल.

टॅग्स :Ockhi Cycloneओखी चक्रीवादळgoaगोवा