शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यातील प्रदूषण वाढू नये यासाठी वाहतूक खाते उपाययोजना करणार- सुदिन ढवळीकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2019 22:01 IST

प्रदूषणाच्या समस्येचा सामना करण्यासाठी तंत्रज्ञानाची मदत घेणार असल्याचे ढवळीकर यांनी सांगितले.

पणजी : दिल्लीत ज्या प्रमाणे वाहनांची संख्या प्रचंड वाढली व प्रदुषणही वाढले, त्याच पद्धतीने नजिकच्या भविष्यात गोव्यातही प्रदूषण वाढू शकते. ते वाढू नये म्हणून गोवा सरकारचे वाहतूक खाते उपाययोजना करेल, असे वाहतूक मंत्री सुदिन ढवळीकर यांनी लोकमतला दिलेल्या मुलाखतीवेळी सांगितले.गोव्याची लोकसंख्या पंधरा लाख आहे. वाहनांची संख्या बारा लाख झाली आहे. याशिवाय मालवाहू ट्रकसह प्रचंड संख्येने वाहने परप्रांतांमधून येतात. या सर्व वाहनांची यापुढील काळात प्रदूषणाच्या दृष्टीकोनातून काटेकोरपणे तपासणी केली जाईल, असे मंत्री ढवळीकर यांनी सांगितले. गोव्याची स्थिती आम्हाला दिल्लीसारखी होऊ द्यायची नाही. प्रदूषणामुळे दिल्लीत जास्त दिवस राहणेही अनेकजण टाळतात. गोवा हा सुंदर प्रदेश आहे. येथील निसर्ग सौंदर्य जगात प्रसिद्ध आहे. आम्ही गोव्यातील सर्व वाहन प्रदूषण चाचणी केंद्रांचे ऑडिट करून घेऊ, असे मंत्री ढवळीकर यांनी जाहीर केले.वाहतूक खात्याने नुकतेच गोव्यातील सर्व वाहन ड्रायव्हिंग स्कूल्सचे ऑडिट करून घेतले. पस्तीस स्कूल्स केवळ कागदावरच असल्याचे ऑडिटवेळी आढळून आले. काही ड्रायव्हिंग स्कूल्सचे तर ऑडिटदेखील करता आले नाही. अनेक ड्रायव्हिंग स्कूल्सना कारणे दाखवा नोटिसाही बजाविण्यात आल्या आहेत. नियमांचे पालन न करणाऱ्या ड्रायव्हिंग स्कूल्सचे परवाने निलंबित केले जातील. प्रदूषणाची चाचणी करणाऱ्या केंद्रांचे ऑडिट करून घेतल्यानंतर त्याविषयीचे निष्कर्ष जाहीर केले जातील, असे मंत्री ढवळीकर यांनी स्पष्ट केले. गोव्यात कोणतेही तंत्रज्ञान हे प्रथम आणले जात असते. जर्मनीहून तंत्रज्ञान आणून साळगाव येथे आधुनिक असा कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात आला. फोंडय़ात देखील आधुनिक पद्धतीचे वाहन तपासणी केंद्र उभे केले जाणार आहे. तेही तंत्रज्ञान जर्मनीचे आहे, असे मंत्री ढवळीकर यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :goaगोवा