शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात मोडी लिपीतील पुरातन दस्तऐवजांचे होणार लिप्यंतरण, सरकारी पातळीवर तज्ज्ञांची लवकरच विशेष समिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2017 13:29 IST

गोव्यातील पुरातत्त्व, पुराभिलेख खात्याकडे असलेले शेकडो वर्षांपूर्वीचे मोडी मराठी लिपीतील दस्तऐवजांचे लिप्यंतरण करण्याचे महत्त्वाचे काम लवकरच हाती घेण्यात आले आहे.

पणजी : गोव्यातील पुरातत्त्व, पुराभिलेख खात्याकडे असलेले शेकडो वर्षांपूर्वीचे मोडी मराठी लिपीतील दस्तऐवजांचे लिप्यंतरण करण्याचे महत्त्वाचे काम लवकरच हाती घेण्यात आले आहे. सरकारी पातळीवर त्यासाठी तज्ज्ञांची विशेष समिती स्थापन केली जाणार आहे.पुणे येथील भारत इतिहास संशोधक मंडळाच्या सहा तज्ज्ञांनी मळा, पणजी येथील पुरातत्त्व खात्यातील या दस्तऐवजांवर काम सुरु केले आहे. पोर्तुगीज काळातील कायदेविषयक महत्त्वाच्या दस्तऐवजांचा यात समावेश आहे.

हे दस्तऐवज पुणे येथे हलविल्यास नष्ट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे येथेच या दस्तऐवजांच्या लिप्यंतरणाचे काम केले जात आहे. हे कागदोपत्री दस्तऐवज अत्यंत पुरातन असल्याने फाटण्याच्या स्थितीत आहेत. त्यामुळ त्यावर काम करण्यासाठी तज्ज्ञांनाच येथे बोलावल्याचे खात्यातील अधिकारी बालाजी शेणई यांनी सांगितले. या कामासाठी ४ लाख रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात आली आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

गोव्याच्या पुरातत्त्व, पुराभिलेख विभागाकडे शेकडो वर्षांपूर्वीची ५ हजारांहून अधिक पुरातन हस्तलिखिते आहेत. मोडी लिपीत लिहिलेल्या नोंदीचे दस्तऐवजही आहेत. काही पेशवेकालीन दस्तऐवज आहेत. त्या काळी गोवा आणि सावंतवाडीचे सावंत, कोल्हापूरचे राजे, सौंदे राजे, हैदर अली, पेशवे यांच्यामधील पत्रव्यवहार मोडी लिपीतून होत असत. अशा प्रकारचे काही दस्तऐवज यात आहेत.

सरकारी समिती करणार शहानिशापुण्याचे सहा तज्ज्ञ दर महिन्याला आठवडाभर या दस्तऐवजांच्या लिप्यंतरणाचे काम करतात. काही दस्तऐवजांमध्ये कोकणी तसेच पोर्तुगीज शब्द मोडी लिपीतून आलेले आहेत. हे काम पूर्ण झाल्यानंतर सरकारची समिती या लिप्यंतरणाची शहानिशा करणार आहे. या समितीवर मोडी लिपीचे तज्ञ असतील. महाराष्ट्रातील काही तज्ञांनाही या समितीवर स्थान दिले जाईल. समितीने प्रमाणीकरण केल्यानंतर सर्व तपशीलाचे संकलन केले जाईल आणि हे लिप्यंतरण जनतेसाठी तसेच संशोधकांसाठी खुले केले जाईल.

गोव्यात केवळ पुरातत्त्व आणि पुराभिलेख विभागाकडेच मोडी लिपीतील दस्तऐवज आहेत, असे नव्हे तर खासगी मालकीचेही असे काही दस्तऐवज आहेत. ‘आर्कायव्हो हिस्तोरिनो दि इस्तादो दा इंडिया’ या नावाने पोर्तुगीज जुने कायदे, आर्थिक तसेच राजकीय विषयातील पत्रव्यवहार आहेत. मोडी लिप्यंतरणाच्या सरकारच्या या निर्णयाचे सर्व थरातून स्वागत होत आहे. ही लिपी कशी वाचावी हे लोकांना शिकविले पाहिजे. भाषातज्ञांकडून जुन्या लिपीचा अभ्यास व्हायला हवा, शिक्षकांनीही ही लिपी शिकून घ्यावी. या लिपीतून धावती अक्षरे लिहिली जात असल्याने टाइपसेटरनाही प्रशिक्षित करावे, असे मत काहीजणांनी व्यक्त केले. डिजिटलायझेशन ही काळाची गरज आहे. नवशिक्या टेक्नॉलॉजी सेव्हींना अ‍ॅपव्दारे मोडी लिपी शिकणे सोयीचे होईल, असे या क्षेत्रातील जाणकारांचे मत आहे.

टॅग्स :goaगोवा