शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात पर्यटक संख्या घटतेय; भाजपच्याच आमदाराकडून धोक्याचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2019 20:55 IST

पर्यटन व्यवसाय अडचणीत येईल अशा प्रकारच्या धोक्याचा इशारा तिकलो यांनी दिला.

पणजी : राज्यात खनिज खाणी अगोदरच बंद झाल्या आहेत आणि आता पर्यटकांची संख्याही दर महिन्याला पंधरा ते सोळा लाखांनी कमी होत आहे, असे सत्ताधारी भाजपचेच हळदोणोचे आमदार ग्लेन तिकलो यांनी बुधवारी विधानसभेत सांगितले. पर्यटन व्यवसाय अडचणीत येईल अशा प्रकारच्या धोक्याचा इशारा तिकलो यांनी दिला.प्रश्नोत्तराच्या तासावेळी पर्यटन मास्टर प्लॅन व पर्यटन धोरणाच्या मसुद्याच्या विषयाबाबत आमदार अ‍ॅलिना साल्ढाणा, तिकलो, प्रतापसिंग राणो, विजय सरदेसाई आदींनी काही प्रश्न उपस्थित केले. मूळ प्रश्न श्रीमती साल्ढाणा यांचा होता. पर्यटन मास्टर प्लॅन व धोरणाच्या मसुद्याबाबत सरकारने सादरीकरण केले तेव्हा किती आमदार उपस्थित राहिले, तसेच हे धोरण तयार तरी कधी होणार अशा प्रकारचे प्रश्न आमदारांनी केले. फक्त चार आमदार उपस्थित होते. तरी आम्ही सर्वानाच विश्वासात घेऊन शक्य तेवढय़ा लवकर धोरण तयार करू, असे पर्यटन मंत्री बाबू आजगावकर यांनी उत्तरादाखल बोलताना सांगितले. श्रीमती साल्ढाणा यांनी लेखी सूचनाही केल्या असून त्या विचारात घेतल्या जातील, असे आजगावकर यांनी नमूद केले. यावेळी आमदार तिकलो यांनी आपला मुद्दा मांडत सरकारला काही प्रश्न विचारले. चार्टर पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी होत आहे. पंधरा-सोळा लाख पर्यटक दर महिन्यास कमी संख्येने येतात. मास्टर प्लॅन व पर्यटन धोरण अजून तयार होत नाही. पर्यटन व्यवसायाला याचा मोठा फटका बसेल. मास्टर प्लॅन तयार नसताना सरकारने केपीएमजी या यंत्रणोला तीन कोटी रुपये देऊन टाकले असेही तिकलो यांनी सांगितले. तीन कोटींच्या विषयाची चौकशी करावी, अशी मागणी आमदार विजय सरदेसाई यांनी केली व आजगावकर यांनी प्रसंगी चौकशी करू, अशी ग्वाही दिली. सरकारकडे पर्यटन खाते आहे, पर्यटन विकास महामंडळही आहे व तरीही आणखी पर्यटन मंडळ का स्थापन केले जाणार आहे अशी विचारणाही सरदेसाई यांनी केली. 

टॅग्स :tourismपर्यटनgoaगोवाBJPभाजपा