शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

गोव्याचा पोर्तुगीजकालीन तुरूंग बनणार पर्यटन स्थळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2017 12:59 IST

अरबी समुद्राच्या काठावर वसलेल्या गोव्यातील आग्वाद तुरुंगाचे पर्यटन स्थळामध्ये रुपांतर केले जाणार आहे. गोवा पर्यटन विकास महामंडळाने त्यासाठी कागदोपत्री सोपस्कार पार पाडण्याचे काम सुरू केले.

पणजी : अरबी समुद्राच्या काठावर वसलेल्या गोव्यातील आग्वाद तुरुंगाचे पर्यटन स्थळामध्ये रुपांतर केले जाणार आहे. गोवा पर्यटन विकास महामंडळाने त्यासाठी कागदोपत्री सोपस्कार पार पाडण्याचे काम सुरू केले. मुख्यमंत्री पर्रीकर यांनी या कामाचा आढावा घेऊन कोणत्या तांत्रिक अडचणी येत आहेत हे नुकतेच जाणून घेतले.सिकेरी येथे एकाबाजूने आग्वादचा किल्ला आहे आणि दुसर्‍याबाजूला आग्वाद तुरूंग आहे. पोर्तुगीज राजवट गोव्यात असताना सतराव्या शतकात हे बांधकाम करण्यात आले होते. पोर्तुगीज भाषेत आग्वाद म्हणजे पाणी असलेली जागा. आग्वाद किल्ल्यावर 1864 साली पोर्तुगीजांनी बांधलेला चार मजली दिपस्तंभही आहे. आशिया खंडातील सर्वात जुना दिपस्तंभ म्हणून तो ओळखला जातो.आग्वाद किल्ल्याच्या एका टोकाच्या बाजूला टाटांचे हॉटेल आहे. दुसरीकडे असलेल्या तुरूंगात एकेकाळी गोवा मुक्ती लढ्यातील स्वातंसैनिकांना ठेवले जात होते. गोवा 1961 साली मुक्त झाला आणि मग कैदी आणि गुन्हेगारांना या तुरूंगात ठेवले जाऊ लागले. मे 2015 सालापर्यंत तुरूंगाचा वापर झाला. आता तो पूर्ण रिकामा आहे. कैद्यांना कोलवाल येथे बांधण्यात आलेल्या नव्या तुरूंगात स्थलांतरीत करण्यात आले आहे.आता जुन्या आग्वाद किल्ल्याचे रुपांतर पर्यटन स्थळात करण्याची योजना सरकारचे पर्यटन विकास महामंडळ मार्गी लावू पाहत आहे. या कामात कोणत्या अडचणी येतात हे मुख्यमंत्र्यांनी महामंडळाचे अध्यक्ष निलेश काब्राल व अधिकाऱ्यांकडून जाणून घेतले.किल्ल्यावर वस्तूसंग्रहालय तयार करावे. तिथे गोवा मुक्ती लढ्याचा इतिहास साकारावा आणि ध्वनी व लेजर शोद्वारे पर्यटकांची मने रिझवावी असे पर्यटन विकास महामंडळाने ठरवले आहे.

टॅग्स :goaगोवा