शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात लोकसभा निवडणुकीत पर्यटन उद्योगाची घसरण मुख्य मुद्दा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2019 19:09 IST

गोव्यात पर्यटन उद्योगाची झालेली घसरण हादेखिल लोकसभा निवडणुकीत महत्त्वाचा मुद्दा ठरणार आहे.

पणजी  - गोव्यात पर्यटन उद्योगाची झालेली घसरण हादेखिल लोकसभा निवडणुकीत महत्त्वाचा मुद्दा ठरणार आहे. पर्यटन व्यवसायाशी निगडित घटकांनी तसे बोलून दाखवले. पर्यटन उद्योगाच्या बाबतीत सरकारचे व्यवस्थापन कमी पडले असा आरोप केला जात आहे. 

पर्यटनमंत्री बाबू आजगांवकर यांनी मात्र हा आरोप फेटाळून लावताना या व्यवसायासाठी आवश्यक ते सर्व काही सरकार करीत असल्याचा दावा केला. राज्यात पर्यटकसंख्या घटल्याच्या वृत्ताला मंत्र्यांनी दुजोरा दिला.  टूर अ‍ॅण्ड ट्रॅव्हल असोसिएशन आॅफ गोवा (टीटीएजी) या संघटनेचे अध्यक्ष सावियो मेशियस म्हणाले की, ‘ विदेशी पर्यटकांच्या संख्येत ४0 टक्क्यांनी घट झालेली आहे. हॉटेलांच्या खोल्यांना ग्राहक नाहीत. केवळ बैठका, परिषदा, प्रदर्शने यासाठीच हॉटेल्सचा वापर होताना दिसतो.

अखिल गोवा शॅकमालक संघटनेचे अध्यक्ष क्रुझ कार्दोझ यांनीही सरकार पर्यटकसंख्या घटली असतानाही गंभीर नसल्याचा आरोप केला. किनाºयांवरील कचºयाची समस्या हासुध्दा मोठा प्रश्न आहे. गोव्याच्या पर्यटनात वृध्दी व्हावी यासाठी केंद्र सरकारने काहीच केले नाही. आमच्या समस्या दूर करणाºया उमेदवारांबरोबरच आम्ही राहणार आहोत, असे ते म्हणाले. 

उत्तर गोवा टॅक्सीमालक संघटनेचे सरचिटणीस विनायक नानोस्कर म्हणाले की, ‘यापूर्वी लोकसभा निवडणुकीत कधीच पर्यटनाचा मुद्दा नव्हता, मात्र यावेळी हा मुद्दा बनलेला आहे. पर्यटन उद्योगाच्या अस्तित्त्वाबाबत लोक चिंतेत आहेत.’ उबेर, ओला आदी परप्रांतीय टॅक्सी कंपन्यांना संघटनेचा विरोध आहे.

टॅग्स :goaगोवाGoa Lok Sabha Election 2019गोवा लोकसभा निवडणूक 2019tourismपर्यटन