शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

आजचा भारत कुणापुढे न झुकणारा; अविनाश धर्माधिकारी यांचे प्रतिपादन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2025 14:03 IST

'ऑपरेशन सिंदूर'मधून भारत महाशक्तिशाली देश सिद्ध

लोकमत न्यूज नेटवर्क, फोंडा : आजचा भारत बदललेला आहे. बदललेले संपूर्ण तंत्रज्ञान, त्याहूनही युद्ध तंत्रज्ञानातही बदल झालेला आहे. ऑपरेशन सिंदूरच्या आधी एक कार्यकर्ता म्हणून मला नेहमीच एक चिंता लागून राहायची. बदलत्या काळातील युद्ध कसं असेल, बदलते ड्रोन, बदलती टेक्नॉलॉजी याबाबत भारत किती तयार आहे. त्याचे उत्तर 'ऑपरेशन सिंदूर'ने दिले. भारत केवळ पाकिस्तानला ठोकायला तयार झालेला नसून भारतामध्ये तयार झालेले तंत्रज्ञान आज अमेरिका आणि चिनी तंत्रज्ञानालाही मात करणारे आहे. आजचा भारत हा गप्प बसणारा, कोणापुढे झुकणारा नसून वेळ आल्यास अमेरिकेलाही चोख उत्तर देणारा महाशक्तिशाली देश आहे, असे उदगार माजी आयएएस अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांनी काढले.

फर्मागुडी येथील गोवा विद्याप्रसारक मंडळाच्या जीव्हीएम उच्च माध्यमिक विद्यालयाच्या सभागृहामध्ये चतुरंग प्रतिष्ठान गोवा शाखेतर्फे श्रवणानंद या उपक्रमाच्या अंतर्गत धर्माधिकारी यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. शनिवारी धर्माधिकारी यांनी 'ऑपरेशन सिंदूर' या विषयावर आपले विचार मांडले.

हिंदू-मुस्लिम बांधवात फूट पाडण्याचे षड्यंत्र

धर्माधिकारी पुढे म्हणाले की, पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी लोकांना धर्म विचारून गोळीबार केला. हे पाकिस्तानचे ठरवून केलेले षडयंत्र असून भारतातील हिंदू व मुस्लिम यांच्यामध्ये फूट घालण्याचे षडयंत्र होते.

मात्र, भारतातील कोणत्याच हिंदू लोकांनी मुसलमान लोकांना मारले नाही. देशातील हिंदू व मुस्लिम हे एकमेकाचे विरोधक बनले नाही. ही आपली खरी संस्कृती आहे. उलट भारत एक ठोस निर्णय घेऊन पाकिस्तानला योग्य धडा शिकवणार याचा विश्वास प्रत्येक भारतीयाला होता व हा विश्वास ऑपरेशन सिंदूरमधून दिसून आला.

सैनिकाने पाकिस्तानमध्ये जाऊन बदलत्या तंत्रज्ञानाच्या जोरावर आपल्या हवाई दहशतवाद्यांचे नऊ तळ उद्ध्वस्त केले. आधुनिक तंत्रज्ञानातून आपली युद्धातील क्षमता दाखवून दिली. भारतीय सैन्य दलाने आपली सक्षमता संपूर्ण जगाला ऑपरेशन सिंदूरच्या यशातून दाखवून दिली आहे. यापुढे अशा हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देण्यास भारतीय सैन्य सतर्क असल्याचे धर्माधिकारी म्हणाले.

..तर देशाचे बळ वाढेल

भारताला यापुढेही महाशक्तिशाली बनवण्यासाठी देशातील प्रत्येक नागरिकाने जागृत राहून हातभार लावण्याची आवश्यकता आहे. आपल्या अवतीभवती कोणत्या गोष्टी घडत आहे यावर गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे. कोणत्याही घडामोडीकडे उघड डोळ्यांनी पाहून सावध राहिले तर देशाचे बळ वाढेल, असे माजी आयएएस अधिकारी अविनाश धर्माधिकारी म्हणाले. यावेळी कार्यक्रमात गोवा विद्या प्रसारक मंडळाचे कृष्णा शेट्ये हे उपस्थित होते.

आज दुसरे व्याख्यान

अविनाश धर्माधिकारी यांचे दुसरे व्याख्यान आज रविवारी २२ रोजी संध्याकाळी स्पर्धात्मक परीक्षा आणि गोव्याचा सहभाग यावर असणार आहे.

 

टॅग्स :goaगोवाPoliticsराजकारण