शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

नेत्यांची तिरंगा यात्रा जोरात; जागृतीसाठी बाईक रॅली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2024 08:32 IST

काही भागांत खड्डेमय रस्त्यांचाही अनुभव

लोकमत न्यूज नेटवर्क पणजी: भारतीय जनता पक्षाने लोकांना १३ ते १५ ऑगस्टदरम्यान प्रत्येक घरावर तिरंगा फडकविण्याचे आवाहन केले आहे. येत्या स्वातंत्र्यदिनी किमान एक लाख घरांवर तिरंगा फडकणार आहे. यासाठीच्या जनजागृतीपर 'हर घर तिरंगा' मोहिमेसाठी राज्यातील काही भागात रविवारी मुख्यमंत्र्यांसह इतर नेत्यांनी कार्यकर्त्यांसह बाईक रॅली काढली. 

यानिमित्ताने भाजपाचे अनेक मंत्री, आमदार बुलेटवरून फिरले. यावेळी नेत्यांना रस्त्यांची सद्यस्थिती लक्षात आली. अनेक रस्त्यांवरील खड्डे आणि त्यातून वाट काढण्यासाठी जनतेला रोज करावी लागणारी कसरत याचेही दर्शन या निमित्ताने झाल्याच्या प्रतिक्रिया लोकांनी व्यक्त केल्या. अजून काही नेत्यांनी या यात्रा काढायच्या आहेत. या रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे त्यांनी त्या टाळल्याचे सांगितले जाते. मात्र पुढील दोन दिवसांत त्यांना त्या पूर्ण कराव्याच लागणार आहेत.

साखळी येथे मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे बाइक रॅलीत सहभागी झाले. पर्वरी मतदारसंघातील बाईक रॅलीत पर्यटनमंत्री तथा आमदार रोहन खंवटे समर्थकांसमवेत सहभागी झाले होते. तर वास्कोमध्ये आमदार संकल्प आमोणकर यांच्या उपस्थितीत निघालेल्या रॅलीमध्येही मुख्यमंत्र्यांचा समावेश होता. डिचोली येथे आमदार डॉ. चंद्रकांत शेटये हे कार्यकर्त्यांच्या बाईक रॅलीत सहभागी झाले. आमदार प्रेमेंद्र शेट यांनी मये मतदारसंघात हर घर तिरंगा जागृती रॅली काढली. दिगंबर कामत मडगावमधील रॅलीत सहभागी झाले होते. येत्या दोन दिवसांत इतर नेतेही आपापल्या भागात रॅली काढतील. 

टॅग्स :goaगोवाBJPभाजपाPramod Sawantप्रमोद सावंत