शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
2
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
3
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
4
Paetongtarn Shinawatra: कोण आहे 'ती' व्यक्ती; जिच्याशी फोन कॉल 'लीक' झाल्याने गेलं शिनावात्रा यांचं पंतप्रधानपद
5
“नाना पटोलेंना चर्चेत येण्यासाठी PM मोदी यांच्या नावाचा आधार लागतोय”; एकनाथ शिंदेंचा टोला
6
५०-१०० नव्हे, पाकिस्तानच्या तुरुंगात तब्बल 'इतके' भारतीय कैद! पहिल्यांदाच झाला मोठा खुलासा
7
"हार्डवेअर चांगलं होतं पण सॉफ्टवेअर खराब...", शेफाली जरीवालाच्या मृत्यूबाबत रामदेव बाबांचं वक्तव्य
8
धक्कादायक! प्रेमी युगुलाने ऑटोत घेतला गळफास; तरुणीचे लग्न ठरल्याने उचलले टोकाचे पाऊल
9
महाराष्ट्रात आजपासून वाहनांवरील नवीन करप्रणाली लागू; सीएनजी असो की पेट्रोल किंवा डिझेल... एवढा कर...
10
मंडीमध्ये ढगफुटीमुळे प्रचंड नुकसान; घरं, रस्ते, पूल गेले वाहून, ४ जणांचा मृत्यू, १६ बेपत्ता
11
गॅस सिलेंडर घेताना या बाबींची करा पडताळणी, टळेल संभाव्य धोका
12
Viral Video: इंदूरचा सुवर्ण महाल!! वॉश बेसिन ते इलेक्ट्रिक स्विच... सारं काही २४ कॅरेट सोन्यानं मढवलेलं...
13
बाजारात शांतता! गुंतवणूकदारांची 'वेट अँड वॉच'ची भूमिका; रिलायन्स-एचडीएफसीसह 'हे' शेअर्स वधारले
14
भारतापासून १४ हजार किलोमीटर दूर 'या' देशात राहतात असंख्य भारतीय! दरवर्षी साजरी होते दिवाळी
15
ठरलं! 'या' दिवशी जाहीर होणार सीए २०२५ परीक्षेचा अंतिम निकाल; कधी आणि कुठे पाहायचा?
16
"शेतकऱ्यांसाठी खासदारकीचा राजीनामा तोंडावर फेकला तर निलंबनाचे काय, शेतकऱ्यांसाठी...’’, निलंबनानंतर नाना पटोले आक्रमक 
17
सावत्र बापच बनला हैवान! आईला जीवे मारण्याची धमकी देऊन मुलीवर करत होता बलात्कार; मुलगी गर्भवती होताच...
18
Photo: देशातील नंबर-१ इलेक्ट्रिक स्कूटरचे नवीन मॉडेल लॉन्च, एका चार्जवर १२१ किमी धावणार!
19
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न, ताफ्यावर फेकली बाटली, बाटलीत होतं... 
20
चातुर्मास कधीपासून सुरू होणार? व्रत-वैकल्ये, सण-उत्सवांची रेलचेल; पाहा, महात्म्य अन् मान्यता

कॅसिनो तूर्त मांडवीतच!

By admin | Updated: August 29, 2015 02:39 IST

पणजी : मांडवी नदीतील चारही कॅसिनो जहाजे पर्यायी जागा मिळेपर्यंत तरी मांडवीतच राहणार असल्याचे शुक्रवारी स्पष्ट झाले. कॅसिनोंच्या परवान्यांची मुदत संपण्यास शनिवार, २९ रोजी आरंभ होत आहे.

पणजी : मांडवी नदीतील चारही कॅसिनो जहाजे पर्यायी जागा मिळेपर्यंत तरी मांडवीतच राहणार असल्याचे शुक्रवारी स्पष्ट झाले. कॅसिनोंच्या परवान्यांची मुदत संपण्यास शनिवार, २९ रोजी आरंभ होत आहे. त्यामुळे चारही कॅसिनोंच्या परवान्यांची मुदत येत्या ३१ मार्च २०१६ पर्यंत वाढविण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने शुक्रवारी घेतला. मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक झाली. त्यानंतर पार्सेकर यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. ते म्हणाले की, मांडवीतून कॅसिनो जहाजे अन्यत्र हलविण्यासाठी सरकारचे बंदर कप्तान खाते पर्यायी जागा शोधत आहे. तूर्त चार पर्यायी जागा शोधल्या आहेत. सरकारने त्या अधिसूचितही केल्या व पंधरा दिवसांपूर्वी लोकांकडून सूचना मागविल्या. काही सूचना व आक्षेप लोकांनी सादर केले आहेत. ते म्हणाले, येत्या ३१ मार्च २०१६ पर्यंत जर पर्यायी जागा मिळाली तर जहाजे मांडवीतून पर्यायी जागांवर नेली जातील, अन्यथा आणखी काय उपाययोजना करता येईल ते सरकार पाहील. आम्ही एकदम कॅसिनो बंद करू शकत नाही; कारण त्यावर अडीच हजार लोकांचा रोजगार अवलंबून आहे. काहीजणांनी कॅसिनो मांडवीतच असू द्या, अशी देखील सूचना केली आहे. विद्यमान सरकार जसे लोकांचे आहे, तसेच ते गुंतवणूकदारांचेही आहे. कॅसिनो व्यावसायिकांनी प्रचंड गुंतवणूक केली आहे. आम्ही कोणताही चुकीचा निर्णय घेतला तर ते न्यायालयात जाऊन स्थगिती आणतील. ते म्हणाले, कॅसिनो जहाजांमुळे आता मांडवी नदी प्रदूषित होत नाही. त्याबाबत आम्ही उपाययोजना केली आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाने उपाय योजले आहेतच. शिवाय एनआयओ, एनआयटी व अन्य अधिकाऱ्यांचा, तज्ज्ञांचा समावेश असलेली समिती मांडवी नदी आणि कॅसिनोंची वारंवार पाहणी करत आहे. आम्ही अत्यंत खोल समुद्रात कॅसिनोंना पाठवू शकत नाही; कारण खोल समुद्रात फक्त मोठी जहाजेच राहू शकतात. आम्ही मांडवीतील कॅसिनोंना विविध ठिकाणच्या नद्यांमध्ये जागा देऊ पाहत आहोत. तथापि, तूर्त सूचना व आक्षेपांचा अभ्यास सुरू आहे. (खास प्रतिनिधी)