शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पुतळाप्रश्नी तीन पक्षांची युती, भाजपाचा विरोध कायम, राजकारण रंगणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2018 18:26 IST

स्वर्गीय जॅक सिक्वेरा यांच्या पुतळ्य़ाच्या विषयावरून तीन राजकीय पक्षांची अलिखित युती झालेली आहे

पणजी : स्वर्गीय जॅक सिक्वेरा यांच्या पुतळ्य़ाच्या विषयावरून तीन राजकीय पक्षांची अलिखित युती झालेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार चर्चिल आलेमाव यांनी पुतळा व्हायलाच हवा अशी भूमिका घेत ठरावाची नोटीस विधिमंडळ खात्याला सादर केली आहे. काँग्रेस पक्षानेही ठराव मांडण्याचे ठरवले आहे. भाजपने मात्र यापूर्वी ठरावाद्वारे घेतलेली भूमिका कायम ठेवली आहे.विधानसभेसमोर जॅक सिक्वेरा यांचा पुतळा उभा करायला हवा अशी राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका असल्याचे आमदार चर्चिल आलेमाव आणि प्रदेशाध्यक्ष जुङो फिलिप डिसोझा यांनी शनिवारी येथे संयुक्त पत्रकार परिषदेत सांगितले. जनमत कौल चळवळीचे सिक्वेरा हे एकमेव नेते होते. त्यामुळे त्यांचा पुतळा स्वर्गीय भाऊसाहेब बांदोडकर यांच्या पुतळ्य़ाच्या शेजारी विधानसभेसमोर उभा रहायला हवा, असे चर्चिल म्हणाले. सिक्वेरा यांनी गोव्याला विलीनीकरणाविरुद्ध नेतृत्व दिले नसते तर गोवा हा महाराष्ट्र राज्याचा एक अतिशय छोटा भाग बनून राहिला असता. जनमत कौल घ्यावी ही कल्पनाच मुळी सिक्वेरा यांची होती, असा दावा आलेमाव यांनी केला. महाराष्ट्रात गोव्याचे विलीनीकरण करण्याच्या विरोधात केवळ ािस्ती मतदारांनीच मतदान केले असे मुळीच नाही तर पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त हिंदू मतदारांनीही विलीनीकरणाविरुद्ध मतदान केले आहे. म्हणूनच गोव्याचे स्वतंत्र अस्तित्व राहिले, असे आलेमाव म्हणाले.पर्रीकर पाठिंबा देतील काँग्रेस पक्षाच्या सोळा आमदारांनी सिक्वेरा यांच्या पुतळ्य़ासाठी विधानसभेत ठराव आणण्याचे ठरविले आहे पण आपण गेल्या 2क् रोजीच विधिमंडळ खात्याला ठरावाबाबतची नोटीस सादर केली आहे. आपण ठराव मांडणार आहे. आपल्याला सर्वानी पाठींबा द्यावा. भाजपने कुणाचाच पुतळा विधानसभेसमोर नको, असा ठराव पक्षाच्या बैठकीत घेतलेला असला तरी, मुख्यमंत्री मनोहर र्पीकर हे सिक्वेरा यांचा पुतळा उभा करायला हवा या आमच्या भूमिकेला विधानसभेत पाठींबा देतील, असा दावा आलेमाव यांनी केला. मुख्यमंत्री र्पीकर यांनी स्वत: सिक्वेरा यांच्या पुतळ्य़ाविरुद्ध भूमिका घेतलेली नाही, असे आलेमाव म्हणाले.मंत्री विजय सरदेसाई यांचा गोवा फॉरवर्ड पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांची भूमिका समान आहे. तिन्ही पक्षांना सिक्वेरा यांचे योगदान मान्य असून तिन्ही पक्षांना पुतळा उभा राहिलेला हवा आहे. आमदार मायकल लोबो यांचाही पाठींबा आहे. गोवा फॉरवर्ड पक्षाने पुतळ्य़ासाठी आपण सर्व ते प्रयत्न करू असे यापूर्वी म्हटलेले आहे. आता चर्चिल आलेमाव यांच्या ठरावाला सरदेसाई यांच्यासह सर्वानी पाठींबा द्यावा, असे जुङो फिलिप म्हणाले. या विषयावरून सरकार मात्र पडण्याची शक्यता नाही, असे आलेमाव यांनी पत्रकारांच्या प्रश्नादाखल सांगितले.दरम्यान, भाजपचे दक्षिण गोव्याचे खासदार नरेंद्र सावईकर यांनी शनिवारी येथे भाजपच्या कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. त्यांच्या पत्रकार परिषदेचा विषय हा केंद्रीय अर्थसंकल्प हा होता. तथापि, सिक्वेरा यांच्या पुतळ्य़ाविषयी काँग्रेसने केलेल्या मागणीबाबत काय वाटते असे पत्रकारांनी विचारले असता, भाजपची भूमिका तिच आपली भूमिका असल्याचे सांगितले.

भाजपने ठरावाद्वारे पुतळ्य़ांबाबत जी भूमिका घेतली आहे, त्या भूमिकेशी मी सहमत आहे. भाजपने ठराव्दारे स्पष्टपणो भूमिका मांडली आहे. तिच माझीही भूमिका घेतली आहे. काँग्रेसच्या ठरावाविषयी मंत्री विजय सरदेसाई यांनी कोणती भूमिका घेतली आहे, ते आम्हाला ठाऊक नाही. फक्त वर्तमानपत्रंमध्ये थोडेफार वाचले आहे. विधानसभेत भाजपने कोणती भूमिका घ्यावी ते भाजप विधिमंडळ पक्ष ठरवील.- नरेंद्र सावईकर, भाजपचे दक्षिण गोवा खासदार