शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

मडगावात तीन दिवसांत सहा छाप्यात 13 लाखांचा चिनी माल जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2017 17:14 IST

मडगाव : ख्रिसमस सणनजीक येऊन ठेपला असताना गोव्यातील बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात चिनी मालांची रेलचेल दिसून येत असून, वजन माप खाते तसेच पोलिसांनी आता हा माल ठेवणा-या व्यापा-यावर कारवाईचे सत्र सुरू केले आहे.

मडगाव : ख्रिसमस सणनजीक येऊन ठेपला असताना गोव्यातील बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात चिनी मालांची रेलचेल दिसून येत असून, वजन माप खाते तसेच पोलिसांनी आता हा माल ठेवणा-या व्यापा-यावर कारवाईचे सत्र सुरू केले आहे. गेल्या तीन दिवसांत दक्षिण गोव्यातील मडगावात सहा छापा टाकले असून, 13 लाखांचा माल जप्त केला आहे. यातील पाच छापे वजनमापे खाते तर एक छापा मडगाव पोलिसांनी टाकला आहे.बुधवारी वजन माप खात्याने मडगावातील भालभाट परिसरात एका दुकानावर छापा टाकून दोन लाखांचा माल जप्त केला होता. ख्रिसमससाठी रोषणाई व अन्य उपकरणे जप्त करण्यात आली होती. त्याच दिवशी मडगाव पोलिसांनी बेकायदा सिगारेट व्यवसायावर कारवाई करताना हिराराम उर्फ शाम रावत मिर्धा याला अटक करून तब्बल तीन लाख सोळा हजार रुपये किमतीच्या सिगारेट्स जप्त केल्या होत्या. चीन तसेच मध्य आशियाई देशातून या सिगारेटची आयात होत असल्याचा पोलिसांना संशय आहे.वजन माप खात्याने गुरुवारी आके - मडगाव व नावेली येथे दोन दुकानांवर छापा टाकून तीन लाखांचा माल जप्त केला होता. चिनी बनावटीचा माल येथे विकला जात होता. आज शुक्रवारी या खात्याने मडगाव - कोलवा मार्गावरील जैन इलेक्ट्रिकल या दुकानावर छापा टाकून पाच लाखांचा माल जप्त केला. चिनी बनावटीचा हा माल असून, मालावर किंमत तसेच अन्य छापील बाबींचा उल्लेख नव्हता. एका गि-हाईकाने यासंबंधी तक्रार केल्यानंतर वजन माप खात्याने या दुकानावर छापा मारला.

टॅग्स :chinaचीन